Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या राशीनुसार दान करा, घरात समृद्धी नांदेल

वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयावर दरवर्षी साजरा होणारा अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) या वेळी 14 मे रोजी साजरा केला जाईल. अक्षय्य तृतीयेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप पवित्र मानले जाते.

Akshaya Tritiya 2021 | अक्षय्य तृतीयेच्या दिवशी आपल्या राशीनुसार दान करा, घरात समृद्धी नांदेल
Astrology
Follow us
| Updated on: May 14, 2021 | 8:50 AM

मुंबई : वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीयावर दरवर्षी साजरा होणारा अक्षय्य तृतीया (Akshaya Tritiya 2021) या वेळी 14 मे रोजी साजरा केला जाईल. अक्षय्य तृतीयेला धार्मिक दृष्टिकोनातून खूप पवित्र मानले जाते. या दिवशी सोने खरेदी करणे आणि दान करण्याला विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की या दिवशी खरेदी केलेल्या वस्तूंचा आणि कामांचा क्षय होत नाही. त्यांचे पुण्य अनेक जन्मांपर्यंत सोबत राहाते. या अक्षय्य तृतीयेवर आपल्या राशीनुसार वस्तू दान करा म्हणजे तुमचे दु:ख दूर होईल आणि आयुष्यात खूप आनंद येईल (Donate These Things On Akshaya Tritiya 2021 According To Your Zodiac Signs For Prosperity And Happiness).

मेष राशी –

मेष राशीच्या लोकांनी या दिवशी लाडू दान करावे. परंतु हे लाडू लाल कपड्यात ठेवून दान करा. याने तुमचे कष्ट दूर होतील आणि देवी लक्ष्मी प्रसन्न होतील.

वृषभ राशी –

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी माठात पाणी भरुन दान करणे चांगले मानले जाते. यामुळे घरात समृद्धी येईल आणि कुंडलीतील शुक्राचे स्थान मजबूत होईल.

मिथुन राशी –

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मिथुन राशीच्या दिवशी हिरवी मूग डाळ दान करा. शक्य असल्यास कोणत्याही गरजूंना कपडे दान करा. यामुळे कुटुंबात समृद्धी येईल.

कर्क राशी –

कर्क राशीच्या लोकांनी या दिवशी दूध आणि तांदूळ दान करावं. दूध हे समृद्धीचे सूचक मानले जाते. असे केल्याने कौटुंबिक संकट दूर होईल आणि घरात समृद्धी येईल. शक्य असल्यास चांदीमध्ये मोती घालून अक्षय्य तृतीयेच्या दिवशी धारण करा.

सिंह राशी –

सिंह राशीच्या लोकांनी लाल मसूर, गूळ, लाल कपड्यांचे दान करावे. यामुळे त्यांचा सूर्य मजबूत होईल आणि सर्व त्रास दूर होतील. सूर्यालाही अर्घ्य अर्पण करा.

कन्या राशी –

कन्या राशीच्या लोकांनी या दिवशी पन्ना धारण करावा आणि मूगाची डाळ विकत घ्यावी. ती डाळ दान करताना प्लेटमध्ये एक चिमूटभर डाळ वाचवून ठेवा आणि त्यांला घरातील धान्यात मिसळा. यामुळे घरात नेहमीच समृद्धी राहील.

तूळ राशी –

तूळ राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी पांढरे कपडे, दूध, दही, तांदूळ, साखर, खीर इत्यादी गोष्टी दान कराव्यात.

वृश्चिक राशी –

वृश्चिक राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी तहानलेल्यांना पाणी किंवा सरबत द्यावे. इच्छा असल्यास, आपण या दिवशी प्याऊ देखील बसवू शकता. त्याशिवाय मुंगा धारण करा. यामुळे घरातल्या अनेक समस्या दूर होतील आणि कुटुंबात आनंद येईल.

धनु राशी –

धनु राशीच्या लोकांनी या दिवशी नारायण पूजेच्यावेळी पिवळ्या कपड्यात हळद लपेटून पूजास्थळावर ठेवा. तसेच, पिवळ्या वस्तू पिवळे तांदूळ, पिवळी डाळ, केळी इत्यादी गोष्टी दान करा. यामुळे गुरु बृहस्पतिची स्थिती मजबूत होईल आणि बिघडेली सर्व कामे पूर्ण होतील.

मकर राशी –

अक्षय्य तृतीयेच्या दिवशी एका पात्रात तिळाचे तेल ठेवून घराच्या पूर्वेकडील बाजूला ठेवा. याशिवाय काळी तीळ, काळी डाळ वगैरे दान करा.

कुंभ राशी –

कुंभ राशीच्या लोकांनी अक्षय्य तृतीयेच्या दिवशी मोहरीचे तेल, काळी तीळ, लोह, काळी डाळ, नारळ इत्यादींचे दान करावे. समस्यातून मुक्तता मिळेल.

मीन राशी –

पिवळ्या रंगाच्या कपड्यात पिवळे फुल बांधून घराच्या पूर्व दिशेने ठेवा. हळद आणि हरभऱ्याची डाळ विकत घेऊन घरात आणून दान करा.

Donate These Things On Akshaya Tritiya 2021 According To Your Zodiac Signs For Prosperity And Happiness

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

May Festival 2021 | ‘या’ आठवड्यात अक्षय तृतीया, ईदसह अनेक सण, जाणून घ्या कधी कुठला सण येणार…

Parshurama Jayanti 2021 | राम ते भगवान परशुराम कसे बनले? जाणून घ्या त्यांच्या जीवनातील काही महत्त्वाच्या गोष्टी

Akshaya Tritiya 2021 | अक्षय तृतीयेच्या दिवशी ही कामं नक्की करा, देवी लक्ष्मी प्रसन्न होईल

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.