Durgashtami : आज मासिक दुर्गाष्टमी, देवीच्या कृपेने दूर होतील सर्व समस्या
Durgashtami या दिवशी दुर्गादेवीची पूजा करून काही खास उपाय केल्याने, विवाह इच्छुकांचे लग्नाचे योग जुळून येण्यास मदत होते. याशिवाय विवाहीतांच्या नात्यात आनंद कायम राहतो. मुलांचे कल्याण होते, करिअरला चांगली गती मिळेते.

मुंबई : आज 24 ऑगस्ट रोजी दुर्गाष्टमी (Durgashtami) आहे. दुर्गाष्टमी व्रत प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमी तिथीला पाळले जाते. या दिवशी माता दुर्गेची पूजा केली जाते. ज्याप्रमाणे गणपतीला चतुर्थी तिथीचे आद्य देवता मानले जाते, त्याचप्रमाणे दर महिन्याच्या शुक्ल पक्षातील अष्टमीला दुर्गा देवीची पूजा केली जाते. त्यामुळे आज दुर्गा देवीच्या पूजेचा दिवस आहे. या दिवशी दुर्गा मातेची उपासना केल्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. देवीच्या आराधनेने तुमच्या सर्व समस्या दूर होतील.
दुसरीकडे, या दिवशी दुर्गादेवीची पूजा करून काही खास उपाय केल्याने, विवाह इच्छुकांचे लग्नाचे योग जुळून येण्यास मदत होते. याशिवाय विवाहीतांच्या नात्यात आनंद कायम राहतो. मुलांचे कल्याण होते, करिअरला चांगली गती मिळेते. देवीची नित्य आराधना केल्याने कुटुंबात सुरू असलेल्या अडचणी दूर होतात आणि घरात सुख-शांती नांदते. आरोग्याशी संबंधित समस्यांपासूनसुटका मिळवण्यासाठी ही अष्टमी तिथीला देवीची आराधना करणे लाभदायक मानले जाते.
आज दुर्गाष्टमीला हे उपाय अवश्य करा
- जर तुम्हाला काही दिवसांपासून काही कामामुळे अस्वस्थ वाटत असेल तर या दिवशी चंद्रदेवाच्या मंत्राचा 108 वेळा जप करावा. चंद्रदेवाचा मंत्र पुढीलप्रमाणे आहे – पुत्र सोमयाय नमः। अशा प्रकारे या दिवशी मंत्राचा जप केल्याने तुमची अस्वस्थता लवकरच दूर होईल.
- कोणत्याही प्रकारची भीती इत्यादीपासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी मंदिरात पाण्याने भरलेले मातीचे भांडे दान करावे आणि देवाचा आशीर्वाद घ्यावा. असे केल्याने तुमची भीतीपासून लवकरच सुटका होईल.
- कोणत्याही प्रकारच्या मानसिक तणावापासून मुक्ती मिळवायची असेल तर या दिवशी 2 मुखी रुद्राक्ष धारण करावेत. 2 मुखी रुद्राक्ष चंद्राचा प्रभाव असतो आणि मानसिक तणावाचे कारण देखील चंद्र आहे. या दिवशी 2 मुखी रुद्राक्ष धारण केल्याने मानसिक तणावातून लवकरच आराम मिळेल.
- जर तुम्हाला तुमच्या वैवाहिक नात्यात आनंद टिकवून ठेवायचा असेल तर या दिवशी स्नान करून देवीला फुलांची माळा अर्पण करावी. यानंतर दुर्गा चालिसाचे पठण करावे. या दिवशी दुर्गा चालिसाचे पठण केल्याने तुमच्या वैवाहिक जीवनात आनंद येईल.
- जर तुम्हाला तुमच्या जीवनाची गती सुरळीत बनवायची असेल आणि तुमचे जीवन आनंदाने भरून टाकायचे असेल, तर या दिवशी तुम्ही देवीच्या मंदिरात जाऊन तिला वस्त्रे अर्पण करावीत. असे केल्याने तुमच्या जीवनाची गती सुरळीत होईल आणि तुमचे जीवन आनंदाने भरले जाईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
