Gita Jayanti 2021| जाणून घ्या गीता जयंतीचे महत्त्व, शुभ काळ ,आणि अर्चना

Gita Jayanti 2021| जाणून घ्या गीता जयंतीचे महत्त्व, शुभ काळ ,आणि अर्चना
geeta

Gita Jayanti 2021 Date and Time : दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गीतेची शिकवण दिली असे मानले जाते.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: मृणाल पाटील

Dec 14, 2021 | 8:55 AM

मुंबई : हिंदू धर्मात श्रीमद भगवदत गीता हा एक महत्त्वाचा ग्रंथ मानला जातो. पुराणात अशी मान्यता आहे की भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून निघाली आहे. या ग्रंथाला विशेष महत्त्व देण्यात आले आहे. दरवर्षी मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी ही गीता जयंती म्हणून साजरी केली जाते. या दिवशी भगवान श्रीकृष्णाच्या मुखातून गीतेची शिकवण दिली असे मानले जाते.

गीतेची शिकवण माणसाला वास्तवाची जाणीव करून देऊन त्याला जन्म-मृत्यूच्या बंधनातून मुक्त करते म्हणूनच मार्गशीर्ष महिन्यातील एकादशीला हा सण साजरा केला जातो, म्हणून या एकादशीला मोक्षदा एकादशी असे म्हणतात.यावेळी गीता जयंती आणि मोक्षदा एकादशी मंगळवार, १४ डिसेंबर रोजी साजरी होणार आहे. गीता जयंतीच्या दिवशी श्रीमद्भगवद्गीतेशिवाय भगवान श्रीकृष्ण आणि वेद व्यास यांचीही पूजा केली जाते.

हा शुभ काळ आहे
मार्गशीर्ष महिन्यातील शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 13 डिसेंबरच्या रात्री 09:32 वाजता सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी 14 डिसेंबर रोजी रात्री 11:35 वाजता समाप्त होईल.

अशी पूजा करा
गीताजयंतीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर पहाटे लवकर उठून स्नान करुन पुजा करावी. यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद्भगवद्गीतेची पुजा करावी यानंतर भगवान श्रीकृष्ण आणि श्रीमद् भगवद्गीतेला पाणी, अक्षत, पिवळी फुले, धूप-दीप नैवेद्य इत्यादी अर्पण करा.

गीतेचे महत्त्व समजून घ्या
भगवान श्रीकृष्णांनी गीतेच्या शिकवणीतून जीवनाचे संपूर्ण सार सांगितले आहे. गीतेमध्ये लिहिलेल्या गोष्टी समजून घेतल्या आणि अंमलात आणल्या तर आपण अगदी सहजरीत्या आयुष्य जगत असतो.

टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.

संबंधित बातम्या

Flat Vastu Rules | नवीन वर्षात घर घेताय? मग हे वास्तू नियम लक्षात ठेवा भरभराट नक्की होणार

Chanakya Niti | भरपूर पैसा, सुखी आयुष्याच्या शोधात आहात, मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 5 गोष्टी कधी विसरु नका


Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें