शुभ कार्यापूर्वी घरोघरी स्वस्तिक का रेखाटतात, लाल रंगालाच महत्त्व का? जाणून घ्या कारण

शुभ कार्यापूर्वी घरोघरी स्वस्तिक का रेखाटतात, लाल रंगालाच महत्त्व का? जाणून घ्या कारण
swastika-sign

हिंदू धर्मात स्वस्तिक काढणे (Swastika Sign) याला अत्यंत पवित्र आणि खूप शुभ मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे.

Nupur Chilkulwar

|

May 31, 2021 | 9:48 AM

मुंबई : हिंदू धर्मात स्वस्तिक काढणे (Swastika Sign) याला अत्यंत पवित्र आणि खूप शुभ मानले जाते. कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी स्वस्तिक काढण्याची परंपरा आहे. याशिवाय, जैन आणि बौद्ध धर्मातही स्वस्तिक महत्त्वाचे मानले जाते. या शब्दातील सु म्हणजे शुभ आणि अस्ति म्हणजे होणे. या शब्दाचा अर्थ शुभ होणे, कल्याणकारी असणे असा आहे. कोणतेही काम करण्यापूर्वी भगवान गणेशाच्या पूजेसह स्वस्तिक बनवले जाते (Know The Importance And Reason Behind Drawing Swastika Sign).

स्वस्तिकात बनवलेल्या चार रेखांविषयी वेगवेगळ्या संकल्पना आहेत. काही लोकांचा असा विश्वास आहे की स्वस्तिकातील चार रेखा पूर्व, पश्चिम, उत्तर आणि दक्षिण दिशेला निर्देशित करतात. काही लोकांचा असा विश्वास आहे की या चार ओळी चार वेदांचे प्रतीक आहेत. या व्यतिरिक्त काहींची अशी मान्यता आहे की, या चार ओळी भगवान ब्रह्माच्या चार मुखांचे प्रतिनिधित्व करतात.

स्वस्तिक हे नेहमी लाल रंगानेच का बनवले जाते, याचा कधी विचार केला आहे का? कारण हिंदू धर्मात लाल रंगाला विशेष महत्त्व आहे. पूजेत लाल रंग वापरतात. चला तर स्वस्तिकच्या महत्त्वाबद्दल जाणून घेऊया –

वास्तुदोष दूर करण्यासाठी –

मान्यता आहे की, वास्तुदोषातून मुक्त होण्यासाठी स्वस्तिक बनवले जाते. त्या चार रेखा चार दिशांचे प्रतीक आहेत. म्हणून कोणत्याही प्रकारचे वास्तू दोष दूर करण्यासाठी आपण घराच्या मुख्य द्वारावर स्वस्तिक बनवू शकता. याने आपले सर्व त्रास दूर होतात आणि सर्व चार दिशांना शुद्ध करते. याशिवाय स्वस्तिक बनवल्याने घरात आनंद आणि समृद्धी येते.

व्यवसायात लाभ व्हावा यासाठी –

ज्योतिषशास्त्रानुसार, व्यवसायात नुकसान कमी करण्यासाठी सलग 7 गुरुवारी इशान्य कोपऱ्यात कोरड्या हळदीने स्वस्तिक चिन्हे बनविणे फायद्याचे ठरेल. जर तुम्हाला एखाद्या कामात यश हवे असेल तर घराच्या उत्तरेकडील दिशेने कोरडी हळद घेऊन स्वस्तिकची बनवा.

वाईट नजरेपासून वाचण्यासाठी –

घराला वाईट नजरेपासून वाचवण्यासाठी काळ्या रंगाच्या सतीया लावला जातो. मान्यता आहे की काळा रंगाच्या कोळशापासून बनविलेल्या स्वस्तिकमुळे घरातील नकारात्मक शक्ती दूर होते.

Know The Importance And Reason Behind Drawing Swastika Sign

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Garuda Purana | या तीन सवयी कुटुंबात भांडणे आणि मतभेदांचे कारण ठरु शकतात

Vastu Tips | वास्तुदोष दूर करण्यासाठी घरात हनुमानजींचा फोटो लावा, सर्व समस्या होतील दूर

Astro Tips Shoes | साधे बुटंही तुमचं नशीब बदलू शकतात, या गोष्टींची नेहमी काळजी घ्या

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें