AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mahashivratri 2025: पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी ‘या’ गोष्टी दान करा….

Mahashivratri Daan Upay: हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला अत्यंत महत्त्वाचे मानले जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाची आणि माता पार्वतीची पूजा केली जाते. महाशिवरात्रीला अनेक शिवभक्त मंदिरात जाऊन काही गोष्टी दान करतात. महाशिवरात्रीला काही विशेष गोष्टी दान केल्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये सकारात्मक गोष्टी घडतात.

Mahashivratri 2025: पितृदोषापासून मुक्ती मिळवण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी 'या' गोष्टी दान करा....
mahashivratri 2025
| Edited By: | Updated on: Feb 24, 2025 | 12:11 PM
Share

हिंदू धर्मामध्ये महाशिवरात्रीला विशेष महत्त्व दिले जाते. महाशिवरात्रीला महादेवाची पूजा केली जातो. या दिवशी व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील सर्व अडथळे कमी होण्यास मदत होते. महाशिवरात्री संपूर्ण वर्षातील सर्वात मोठ्या सणांपैकी एक आहे. प्रत्येक वर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्री साजरा केली जाते. या दिवशी शिवभक्त मोट्या प्रमाणात महादेवाची पूजा करतात आणि त्याना पाहिजेल असलेल्या गोष्टी मागतात. यंदा 2025 मध्ये 26 फेब्रुवारी रोजी साजरा केली जाणार आहे. या दिवशी देवी पार्वती आणि महादेवाची पूजा केली जाते. महाशिवरात्रीच्या दिवशी महादेवाचे व्रत केल्यामुळे तुमच्या आयुष्यातील महत्त्वाची कामे पूर्ण होण्यास मदत होते.

उज्जैनचे आचार्य आनंद भारद्वाज यांच्या मते, महाशिवरात्रीला काही वस्तू दान केल्यामुळे महादेव तुमच्यावर प्रसन्न होतात आणि भक्तावर अपार आशीर्वादाचा वर्षाव करतात. महाशिवरात्रीच्या दिवशी या गोष्टी दान केल्यामुळे तुमच्या पापांचा नाश होतो आणि तुमच्या आयुष्यामध्ये चांगल्या गोष्टी घडतात. या दिवशी दान केल्यामुळे आणि महादेवाच्या कृपेमुळे तुमचे नशिब चमकू शकते. आचार्य पुढे म्हणतात की, दानधर्म केल्यामुळे देवी देवता तुमच्यावर प्रसन्न होतात. जर तुम्हाला आयुष्यामध्ये सकारात्मकता हवी असेव तर तुम्ही महाशिवरात्रीच्याा दिवशी या विशेष गोष्टी दान करा.

महाशिवरात्रीच्या दिवशी ‘या’ गोष्टी दान करावे….

कपड्यांचे दान – महाशिवरात्रीला गरजूंना कपडे दान केल्याने महादेव प्रसन्न होतात आणि त्यांना धन आणि समृद्धीचा आशीर्वाद देतात. महाशिवरात्रीच्या दिवशी कपडे दान केल्याने आर्थिक स्थिती सुधारते.

पाण्याचे दान – महाशिवरात्रीला महादेवाचे अपार आशीर्वाद मिळविण्यासाठी, या दिवशी पाणी अर्पण करावे. महाशिवरात्रीला पाणी दान केल्यास तुम्हाला पुण्य प्राप्ती होते. शास्त्रांमध्ये, पाणी पिण्यास देणे आणि ते दान करणे याला अत्यंत शुभ मानले जाते.

तूप दान – मान्यतेनुसार, महाशिवरात्रीला गाईच्या दुधापासून बनवलेले शुद्ध देशी तूप दान केले पाहिजेल. या दिवशी तुपाचे दान केल्यामुळे तुमच्या घरातील आर्थिक चणचण दूर होण्यास मदत होते. या दिवशी तूपाचे दान केल्यामुळे तुम्हाला ज्ञान आणि निरोगी आरोग्याची प्राप्ती होते.

कच्च्या दुधाचे दान – महाशिवरात्रीला शिवलिंगाला कच्चे गाईचे दूध अर्पण केल्याने अनेक फायदे होतात. त्याचबरोबर, या दिवशी दान केल्याने घरात समृद्धी आणि आनंद येतो. कच्च्या दुधाचे दान केल्याने कुंडलीत चंद्रही मजबूत होतो.

काळ्या तीळाचे दान – महाशिवरात्रीला काळे तीळ दान केल्याने महादेवाची कृपा प्राप्त होते. पितृदोषाने ग्रस्त असलेल्या लोकांना आराम मिळतो. तिथे या दोषाचा परिणाम बऱ्याच प्रमाणात कमी होतो. शास्त्रांनुसार, महाशिवरात्रीला तीळ दान केल्याने शनिदोषही दूर होतो, कारण महादेव शनिदेवाचे गुरु आहेत.

महाशिवरात्रीला ‘या’ गोष्टी करू नका….

  • महाशिवरात्रीच्या दिवशी तामसिक पदार्थांचे सेवन करू नये.
  • महाशिवरात्रीला दान केलेली गोष्टी खावू नका यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये नकारात्मकता वाढते.
  • महाशिवरात्रीच्या दिवशी नवीन कपडे घाला त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये अडथळे येणार नाही.
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.