उत्पन्नाचे स्त्रोत वाढवायचे असेल तर मासिक शिवरात्रीला ‘हे’ उपाय नक्की करा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व

प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्रीचा उपवास (Masik Shivratri Upay) ठेवला जातो. वैशाख महिन्यातील शिवरात्र मासिक उपवास 9 मे रोजी येईल.

उत्पन्नाचे स्त्रोत वाढवायचे असेल तर मासिक शिवरात्रीला 'हे' उपाय नक्की करा, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्व
mahadev

मुंबई : प्रत्येक महिन्यात कृष्ण पक्षाच्या चतुर्दशी तिथीला मासिक शिवरात्रीचा उपवास (Masik Shivratri Upay) ठेवला जातो. वैशाख महिन्यातील शिवरात्र मासिक उपवास 9 मे रोजी येईल. मान्यता आहे की महाशिवरात्रीच्या मध्यरात्री महादेव शिवलिंगाच्या रुपात प्रकट झाले होते. त्यावेळी फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशी होती. तेव्हा पहिल्यांदी शिवलिंग स्वरुपाची पूजा भगवान ब्रह्मा आणि विष्णूंनी केली होती (Masik Shivratri Upay To Increase Income Know The Shubh Muhurat And Importance).

तेव्हापासून प्रत्येक महिन्यात, कृष्ण पक्षाची चतुर्दशी तिथी मासिक शिवरात्री आणि फाल्गुन महिन्यातील कृष्ण चतुर्दशीला महाशिवरात्री म्हणून साजरी केली जाते. अशा प्रकारे, वर्षभरात 11 मासिक शिवरात्री आणि एक महाशिवरात्री असतात. मान्यता आहे की, शिवरात्रीला श्रद्धा आणि भक्तीने भोलेनाथ यांची उपासना आणि उपवास केल्याने ते खूप प्रसन्न होतात आणि भक्ताचे दु:ख दूर करतो. मासिक शिवरात्रीच्या दिवशी काही विशेष अडचणी दूर करण्यासाठी काही उपाय प्रभावी ठरु शकतात. मासिक शिवरात्रीशी संबंधित खास माहिती जाणून घ्या.

शुभ काळ

वैशाख महिन्यातील शिवरात्रि रविवारी 9 मे रोजी सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांपासून सुरु होईल आणि सोमवारी 10 मे रोजी सकाळी 9 वाजून 55 मिनिटांनी संपेल. मासिक शिवरात्रीला प्रीति योग आणि आयुष्मान योग हे दोन शुभ योग बनत आहेत. मान्यता आहे की या दोन्ही योगांमध्ये केलेले कार्य विशेषतः फलदायी आहे. यावेळी शिवरात्रीत रात्री 8 वाजून 43 मिनिटांपर्यंत प्रिती योग असेल. यानंतर आयुष्मान योगाला प्रारंभ होईल.

या उपाययोजनांमुळे समस्यांमधून मुक्ती मिळेल

1. घरातील उत्पन्नाचे स्रोत वाढवण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी घरी पारद शिवलिंगाची स्थापना करा. याची नियमित पूजा करावी.

2. शिवरात्रीच्या दिवशी 21 बेलपत्रावर चंदनाने ‘ओम नमः शिवाय’ किंवा ‘जय श्री राम’ लिहावे. यानंतर हे बेलपत्र महादेवाला अर्पण करा. यामुळे भोलेनाथ प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील.

3. नंदी हे महादेवांचे आवडते गण आहेत, त्यांची पूजा केल्याने महादेव अत्यंत प्रसन्न होतात. शिवरात्रीच्या दिवशी बैलाला नंदी समजून हिररा चारा खायला द्या. यामुळे गरीबी दूर होते आणि जीवनात सुख-समृद्धी येते.

4. अनावधानाने केलेल्या पापांपासून मुक्त होण्यासाठी शिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगाला जल अर्पण करा. त्या पाण्यात जव आणि काळी तीळ घाला.

5. रोगांच्या मुक्तीसाठी महादेवाच्या पूजेच्या वेळी महामृत्युंजयाच्या मंत्राचा 101 वेळा जप करावा.

Masik Shivratri Upay To Increase Income Know The Shubh Muhurat And Importance

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

May Month Ekadashi 2021 | एकादशीला भात का खाऊ नये? जाणून घ्या धार्मिक महत्व

Vallabhacharya Jayanti 2021 | श्री वल्लभ आचार्य जयंती, या दिवशी भगवान कृष्णाची पूजा का केली जाते?