AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mohini Ekadashi 2023 : या दिवशी ठेवले जाणार मोहिनी एकादशीचे व्रत, जाणून घ्या पुजा विधी

पौराणिक मान्यतेनुसार एकदा दानव आणि देवांच्या समुद्रमंथनातून अमृत  बाहेर पडल्यावर ते पिऊन अमर होण्याची स्पर्धा दोन्ही बाजूंनी लागली होती. अशा स्थितीत राक्षसांपासून अमृताचे भांडे वाचवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचे स्त्री रूप धारण केले.

Mohini Ekadashi 2023 : या दिवशी ठेवले जाणार मोहिनी एकादशीचे व्रत, जाणून घ्या पुजा विधी
मोहिनी एकादशीImage Credit source: Social Media
| Updated on: Apr 25, 2023 | 5:30 PM
Share

मुंबई : हिंदू धर्मात एकादशी तिथीला भगवान श्री विष्णूच्या उपासनेसाठी अत्यंत शुभ मानले जाते. असे मानले जाते की प्रत्येक महिन्याच्या कृष्ण पक्ष आणि शुक्ल पक्षातील एकादशी तिथीला भगवान श्री विष्णूची पूजा केल्यास त्यांचा आशीर्वाद लवकर प्राप्त होतो. वैशाख महिन्याच्या शुक्लपक्षात आल्यावर एकादशी तिथीचे महत्त्व अधिकच वाढते. हिंदू मान्यतेनुसार या शुभ तिथीला भगवान विष्णूंनी आपला मोहिनी (Mohini Ekadashi 2023) अवतार घेतला होता, म्हणून या एकादशीला मोहिनी एकादशी म्हणतात. मोहिनी एकादशी व्रताची पूजा पद्धत आणि शुभ मुहूर्त याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.

मोहिनी एकादशी व्रतासाठी शुभ मुहूर्त

पंचांगानुसार, भगवान विष्णूचा आशीर्वाद देणारे मोहिनी एकादशी व्रत यावर्षी 01 मे 2023 रोजी साजरे केले जाणार आहे. पंचांगानुसार, वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षातील एकादशी तिथी 30 एप्रिल 2023, रविवारी रात्री 08:28 वाजता सुरू होईल आणि 01 मे 2023 रोजी रात्री 10:09 पर्यंत राहील. 02 मे 2023 रोजी पहाटे 05:40 ते 08:19 या दरम्यान मोहिनी एकादशीचे व्रत करणे शुभ राहील, ज्यामुळे पूर्ण पुण्य प्राप्त होईल.

मोहिनी एकादशी व्रताचे धार्मिक महत्त्व

पौराणिक मान्यतेनुसार एकदा दानव आणि देवांच्या समुद्रमंथनातून अमृत  बाहेर पडल्यावर ते पिऊन अमर होण्याची स्पर्धा दोन्ही बाजूंनी लागली होती. अशा स्थितीत राक्षसांपासून अमृताचे भांडे वाचवण्यासाठी भगवान श्री विष्णूंनी मोहिनीचे स्त्री रूप धारण केले. हिंदू मान्यतेनुसार, ज्या दिवशी भगवान विष्णूंनी मोहिनी अवतार घेतला, ती वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाची एकादशी होती. तेव्हापासून या शुभ तिथीला श्री हरीची पूजा करण्याचे विशेष महत्त्व अधिकच वाढले आहे.

मोहिनी एकादशीचे व्रत कसे करावे

भगवान श्री विष्णूंचा आशीर्वाद देणार्‍या मोहिनी एकादशी तिथीचे व्रत आणि उपासना करण्यासाठी साधकाने पहाटे लवकर उठून स्नान करून ध्यान करावे. यानंतर सूर्यनारायणाला जल अर्पण करावे. सूर्यदेवाची पूजा केल्यानंतर हातात थोडे पाणी घेऊन मोहिनी एकादशीचे व्रत पाळण्याची प्रतिज्ञा घ्यावी.

व्रत आणि उपासनेचा संकल्प घेतल्यानंतर घराच्या ईशान्य कोपर्‍यात पिवळे वस्त्र पसरून भगवान श्री विष्णू आणि माता लक्ष्मी यांना बसवावे आणि त्यांना पिवळी फुले, पिवळे चंदन अर्पण करावे. यानंतर शुद्ध तुपाचा दिवा लावून साधकाने मोहिनी एकादशी व्रताची कथा पाठ करावी किंवा कोणाकडून तरी ऐकावी. पूजेच्या शेवटी, साधकाने श्री हरीची आरती केली पाहिजे आणि दुसर्‍या दिवशी शुभ मुहूर्तावर उपवास केला पाहिजे.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला
मरेपर्यंत काँग्रेसमध्ये...प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये, पंजा हाती घेतला.
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली
नाद अन् दहशत या शब्दांवरून महायुतीच्या दोन मंत्र्यांमध्ये जुंपली.
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग
महापालिका निवडणुकीत घराणेशाहीचं वाढतं प्रस्थ, कुटुंबासाठी लॉबिंग.
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट
बीएमसी निवडणुकीसाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीसमोर मोठी अट.
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं...
लाल किल्ल्या स्फोट प्रकरणात महाराष्ट्र कनेक्शन उघड, आरोपीनं....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात....
प्रशांत जगताप काँग्रेसमध्ये येताच म्हणाले, माझी लढाई भाजप विरोधात.....
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश
प्रशांत जगतापांचा हर्षवर्धन सपकाळांच्या उपस्थितीत काँग्रेसमध्ये प्रवेश.
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या
पुण्यात शिंदे सेनेत नाराजीनाट्य, नीलम गोऱ्हेंच्या घराबाहेर ठिय्या.
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?
...तर त्यांच्यासोबत नसू, दोन्ही NCP एकत्र येण्यावर दानवे काय म्हणाले?.
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य
फडणवीसांकडून ठाकरे बंधूंना पुतीन-झेलेन्स्की उपमा अन् जागावाटपावर भाष्य.