Pausha Amavasya: वर्षातली शेवटची अमावस्या आज, काय आहे या अमावस्येचे महत्व?

उदयतिथीनुसार पौष अमावस्या 23 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच आज आहे.

Pausha Amavasya: वर्षातली शेवटची अमावस्या आज, काय आहे या अमावस्येचे महत्व?
अमावस्या Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Dec 23, 2022 | 8:43 AM

मुंबई, पौष अमावस्येला हिंदू धर्मात विशेष महत्व आहे. यावर्षी पौष अमावस्या (Pausha Amavasya) 23 डिसेंबर म्हणजेच आज आहे. ही वर्षातील शेवटची अमावस्या आहे. पौष महिन्यातील कृष्ण पक्षाच्या शेवटच्या तिथीला पौष अमावस्या म्हणतात. धनुसंक्रांती पौष महिन्यात येते आणि सूर्य धनु राशीत प्रवेश करतो तेव्हा खरमास सुरू होते. या महिन्यात शुभ आणि मंगल कार्य वर्ज्य आहेत, त्यामुळे या महिन्यात पितरांची पूजा आणि धार्मिक कार्य करण्याचा नियम आहे. धार्मिक आणि आध्यात्मिक चिंतनासाठी हा महिना सर्वोत्तम मानला जातो. शास्त्रानुसार या महिन्याला ‘छोटा श्राद्ध पक्ष’ असेही म्हणतात. या महिन्यात तर्पण, पितरांसाठी पिंडदान, भगवान विष्णू आणि सूर्यपूजेलाही विशेष महत्त्व आहे. पौष अमावस्येचा शुभ मुहूर्त आणि उपासना पद्धत जाणून घेऊया.

पौष अमावस्या मुहूर्त

उदयतिथीनुसार पौष अमावस्या 23 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच आज आहे. पौष अमावस्या तिथीची सुरुवात 22 डिसेंबर 2022 रोजी म्हणजेच काल संध्याकाळी 07.13 वाजता झाली आहे. 23 डिसेंबर रोजी सायंकाळी 03.46 वाजता संपेल.

पौष अमावस्या पूजा विधी

या दिवशी सकाळी उठून स्नान करावे. यानंतर देवघरात दिवा लावावा. त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण करा. जर तुम्ही उपवास करू शकत असाल तर या दिवशीही उपवास ठेवा. या दिवशी पितरांशी संबंधित कार्य करावे आणि पितरांसाठी पिंडदान करावे. भगवंताचे चिंतन करावे. अमावस्येच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा करण्याचे अधिक महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराचीही विधीपूर्वक पूजा केली जाते. या दिवशी गरीब लोकांना दान करावे.

हे सुद्धा वाचा

पौष अमावस्येच्या दिवशी हे नियम पाळा

  1.  या दिवशी रात्री एकटे बाहेर पडू नये कारण अमावस्या ही काळी रात्र मानली जाते.
  2.  या दिवशी गरीब व्यक्तीचा अपमान करू नये.
  3.  पौष अमावस्येच्या दिवशी इतरांच्या घरी अन्न नेऊ नये. त्यापेक्षा या दिवशी आपल्या घरी भोजन करावे.
  4.  अमावस्येच्या दिवशी तुळशी आणि बेलपत्र तोडू नये.
  5.  अमावस्येच्या दिवशी मांस, मद्य आणि तामसी अन्न खाऊ नये.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट
म्हणून राममंदिर प्रतिष्ठापणेला काँग्रेस नव्हती, मोदीनी केला गौप्यस्फोट.
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?
'उद्धव ठाकरेंनी मला कितीही शिव्या दिल्या तरी..', मोदींनी काय म्हटलं?.
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?
जे कुटुंबाला संभाळू शकत नाही. ते महाराष्ट्राला...,मोदींचा रोख कुणावर?.
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?
ये ट्रेलर है...पिक्चर बाकी है.., मोदींचा इशारा, पण या पिक्चरमध्ये काय?.
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?
देशाने कुणाच्या गॅरंटीवर विश्वास ठेवायचा? मोदी की राहुल गांधी?.
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला
सर्व शिव्या संपल्या, आता बिचारे... टीका करणाऱ्यांना मोदींचा खोचक टोला.
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य
देशाला मी सांगतोय येस... हे होऊ शकतं, निवडणुकीबद्दल मोदींच मोठ वक्तव्य.
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल
'ही त्यांची स्टाईल...', शरद पवारांनी केली नरेंद्र मोदी यांची नक्कल.
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व
उदय सामंत यांचे भाऊ किरण विधानसभा लढवणार, या मतदारसंघाच करणार नेतृत्व.
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?
VIDEO ताडोबातील वाघोबाच्या जोडप्याचा निवांत फेरफटका, बघा अद्भूत दृश्य?.