Shani Jayanti 2021 | शनि जयंती कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त

शनिदेवाच्या क्रोधापासून कुणाला वाचयचे नाहीये? (Shani Jayanti) ज्यावर शनिदेवाची दृष्टी ज्यांच्यावर पडते त्यांची परिस्थिती काय होते याची जाणीव सर्वांनाच आहे आणि ज्यावर त्यांची कृपा असते त्यांच्या जीवनात आनंद येतो आणि प्रगतीचे सर्व दारे उघडतात.

Shani Jayanti 2021 | शनि जयंती कधी आहे? जाणून घ्या या दिवसाचं महत्त्व आणि शुभ मुहूर्त
Lord-ShaniDev

मुंबई : शनिदेवाच्या क्रोधापासून कुणाला वाचयचे नाहीये? (Shani Jayanti 2021) ज्यावर शनिदेवाची दृष्टी ज्यांच्यावर पडते त्यांची परिस्थिती काय होते याची जाणीव सर्वांनाच आहे आणि ज्यावर त्यांची कृपा असते त्यांच्या जीवनात आनंद येतो आणि प्रगतीचे सर्व दारे उघडतात. शनिदेवाची नियमितपणे पूजा केली पाहिजे जेणेकरुन तुमच्यावर घरी सुख-समृद्धीची कायम राहावी आणि जीवनात कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये (Shani Jayanti 2021 Know The Importance Of This Day ).

हिंदी पंचांगानुसार, येत्या 10 जून रोजी म्हणजेच अमावस्या तिथीला शनि जयंती साजरी केली जाते. असे म्हणतात की या दिवसाला शनि अमावस्या म्हणून देखीलही ओळखले जाते. चांगली गोष्ट म्हणजे वर्षाचे पहिले सूर्यग्रहण देखील याच दिवशी होत आहे. धार्मिक मान्यतेनुसार, भगवान शनिचा जन्म ज्येष्ठ अमावस्येच्या दिवशी झाला होता. मान्यता आहे की, शनिदेव हे भगवान सूर्य आणि देवी छाया यांचे पुत्र आहेत.

शनिदेवच्या शांतीच्या उपायासाठी ज्यांना काही करायचे असेल त्यांच्यासाठी ज्येष्ठ अमावस्येचा दिवस सर्वोत्तम मानला जातो. म्हणून या दिवशी शनिदेवाची प्रकारे पूजा करावी.

शनि जयंती 2021 चा मुहूर्त

हिंदू दिनदर्शिकेनुसार या दिवशी शुभ तिथी 9 जून 2021 रोजी बुधवारी दुपारी 1 वाजून 57 मिनिटांनी सुरु होईल आणि 10 जून 2021 रोजी गुरुवारी संध्याकाळी 4 वाजून 22 मिनिटांनी होईल. उदयाची तिथी 10 जून रोजी प्राप्त होत आहे, म्हणूनच शनि जयंती केवळ 10 जून रोजी साजरी केली जाईल.

शनि जयंतीचे महत्त्व

शनि जयंतीच्या दिवशी शनिदेवाची पूजा केल्यावर लोकांना त्यांची कृपा होते. लोक त्यांच्या वाईट दृष्टीपासून वाचतात. शनिच्या साडेसाती किंवा ढैय्याने ज्यांना त्रास होतो, त्यांनाही या दिवशी पूजा केल्याने त्रासातून जरा दिलासा मिळतो. जर तुम्ही शनिदेवाची पूजा केली तर तुम्हाला तुमच्या कर्माप्रमाणे फळही मिळेल. शनिदेव लोकांना त्यांच्या कर्मांनुसार फळ देण्यासाठी ओळखले जातात.

या दिवशी सूर्यग्रहण

या दिवशी एक चांगला योगायोग आहे की शनि जयंतीच्या दिवशी सूर्यग्रहण देखील लागणार आहे. ज्योतिषशास्त्रात, सूर्य आणि शनि यांना एकमेकांचे शत्रू मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार शनिदेवाच्या जन्म तिथीला अमावस्येला सूर्यग्रहण होणे अशुभ परिणाम देणारे मानले जाते. या वर्षाचे पहिले सूर्यग्रहण भारतीयांवर परिणाम करणार नाही, परंतु नैसर्गिक आपत्तीची शक्यता तीव्र आहे.

Shani Jayanti 2021 Know The Importance Of This Day

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Lord Shanidev | शनिदेवांच्या प्रकोपापासून वाचायचं असेल तर दशरथकृत शनिस्तोत्राचं पठण करा, जाणून घ्या याबाबतची माहिती

Shanidev | ‘या’ लोकांवर शनिदेव राहतात प्रसन्न, पूर्ण होतात सर्व मनोकामना…

Shanidev | शनिदेवाला तेल का अर्पण करतात? जाणून घ्या या परंपरेमागील पौराणिक कथा…

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI