Shravan Month 2021 | ‘देऊळ बंद’! श्रावण महिन्याला सुरुवात, सलग दुसऱ्या वर्षी शिव मंदिरं बंद असल्याने भाविक दर्शनाला मुकले

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: |

Updated on: Aug 09, 2021 | 9:07 AM

सध्या महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे अद्याप प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाही शिवभक्त त्यांच्या प्रिय आराध्य देवतेच्या दर्शनाला मुकणार आहे. राज्यातील भगवान शंकराची सर्व मुख्य मंदिरं सामान्यांसाठी दर्शनासाठी बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी शिवमंदिरं भाविकांविना दिसणार आहेत.

Shravan Month 2021 | 'देऊळ बंद'! श्रावण महिन्याला सुरुवात, सलग दुसऱ्या वर्षी शिव मंदिरं बंद असल्याने भाविक दर्शनाला मुकले
महाराष्ट्रातील शिव मंदिरं बंद

मुंबई : भगवान महादेवांच्या अत्यंत प्रिय अशा पवित्र श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात होत आहे. श्रावणातील पहिला सोमवारही आज आहे. त्यामुळे शिवभक्तांसाठी आजचा दिवस अत्यंत खास आहे. मात्र, सध्या महाराष्ट्रात कोरोना संकटामुळे अद्याप प्रार्थनास्थळं बंद ठेवण्यात आली आहेत. त्यामुळे यंदाही शिवभक्त त्यांच्या प्रिय आराध्य देवतेच्या दर्शनाला मुकणार आहे. राज्यातील भगवान शंकराची सर्व मुख्य मंदिरं सामान्यांसाठी दर्शनासाठी बंद असल्याने सलग दुसऱ्या वर्षी शिवमंदिरं भाविकांविना दिसणार आहेत. जाणून घेऊया पहिल्या श्रावणी सोमवारी राज्यातील कुठली कुठली मंदिरं बंद आहेत ते –

श्रावण महिन्याचे महत्त्व

श्रावण महिना भगवान शिव यांना अत्यंत प्रिय आहे. यामुळेच या काळात महादेवाची पूजा करण्याचं विशेष महत्त्व आहे. मान्यता आहे की श्रावण महिन्यातील सोमवारी महादेवांची विशेष पूजा आणि व्रत केल्याने महादेव लवकर प्रसन्न होतात आणि इच्छित फळ देतात. भगवान शिव आणि माता पार्वती यांची एकत्र पूजा केल्याने सौभाग्य लाभते आणि आर्थिक समस्या दूर होतात अशी मान्यता आहे.

त्रंबकेश्वर मंदिर बंद, कळसाचं दर्शन घेऊन भाविकांना परतावं लागतंय

श्रावण महिन्याला आजपासून सुरुवात होत असली, तरी बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले त्रंबकेश्वर मंदिर बंद असल्याने भाविकांना कळसाचं दर्शन घेऊन परत जावे लागत आहे. मंदिराबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, मंदिरात दैनंदिन पूजा करणाऱ्या पुजाऱ्यांव्यतिरिक्त इतरांना प्रवेश बंद ठेवण्यात आला आहे.

परळीतील प्रभू वैद्यनाथ मंदिर बंद

प्रभू वैद्यनाथ मंदिर

प्रभू वैद्यनाथ मंदिर

कोरोनामुळे यंदा देखील भाविकांना प्रभू वैद्यनाथाचे दर्शन घेता येत नाहीये. पहिल्या श्रावणी सोमवारच्या मध्यरात्रीपासून मंदिर भाविकांसाठी खुलं असतं. मात्र, सलग दुसऱ्या वर्षी सगळेच मंदिरं बंद आहेत. त्यामुळे आता परळीतील प्रभू वैद्यनाथाच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली असली तरी भाविकांना केवळ पायरीचे दर्शन घेता येत आहे. केवळ पुजारी मंदिराच्या गाभाऱ्यात जाऊ शकता आणि त्यांच्या कडून पूजा केली जातेय.

बाबुलनाथ मंदिरात भाविकांना प्रवेश बंद

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे बाबुलनाथ मंदिर बंद आहे. अशा परिस्थितीत, येथे येणारे सर्व भक्त बाहेरून मंदिरासमोर हात जोडून प्रार्थना करत आहेत. चोख पोलीस सुरक्षा मंदिराच्या बाहेर ठेवण्यात आला आहे. कोणालाही आत जाऊ दिले जात नाही. भाविकांनी सांगितले की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर बंद करण्यात आले आहेत, आम्हाला आत जाण्याची परवानगी नाही, म्हणून आम्ही बाहेरुन पूजा करणार आहोत.

12 वे ज्योतिरर्लिंग घृष्णेश्वर मंदिरही बंद

औरंगाबाद जिल्ह्यातील वेरुळ येथील घृष्णेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील पहिल्या सोमवारी मंदिर बंद असले तरी भाविक सकाळपासून दर्शनासाठी येत आहेत. घृष्णेश्वर मंदिर हे देशातील 12 ज्योतिरर्लिंगांपैकी शेवटचे 12 वे ज्योतिरर्लिंग आहे. सध्या कोरोना प्रादुर्भाव असल्याने सर्व मंदिर बंद आहेत. हे ही मंदिर बंद असले तरी भाविक मात्र दर्शन घेण्यासाठी येत आहेत.

भीमाशंकर मंदिर परिसरात श्रावणी सोमवारी शुकशुकाट

भिमाशंकर मंदिर पूजा

भिमाशंकर मंदिर पूजा

आज श्रावणातील पहिला श्रावणी सोमवार असून लाखो भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या बारा ज्योतिर्लिंगा पैकी एक असलेल्या ज्योर्तिलिंग भीमाशंकर येथे भक्तांनी गजबजलेल्या या मंदिर परिसरात सलग दुसऱ्या वर्षीही कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे शुकशुकाट पहायला मिळत आहे. कोरोनामुळे भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्यात आले. जिल्हा आणि मंदिर प्रशासनानाने घेतलेल्या निर्णयात श्रावणातील भीमाशंकर यात्रा उत्सव ही रद्द करण्यात आला असून पहाटे 5 वाजताच्या आरतीनंतर मंदिर पुन्हा बंद करण्यात आले असून मंदिरातील पाच पुजाऱ्यांच्या हस्ते ही महापूजा आणि आरती करण्यात आली.

यावर्षी श्रावण महिन्यात 5 सोमवार असतील

💠 पहिला श्रावण सोमवार – 09 ऑगस्ट 2021

💠 दुसरा श्रावण सोमवार – 16 ऑगस्ट 2021

💠 तिसरा श्रावण सोमवार – 23 ऑगस्ट 2021

💠 चौथा श्रावण सोमवार – 30 सप्टेंबर 2021

💠 पाचवा श्रावण सोमवार – 06 सप्टेंबर 2021

कुठल्या दिवशी शिवाला कुठली मूठ वाहावी?

❇️ पहिला श्रावणी सोमवार – 9 ऑगस्ट 2021 – तांदूळ शिवमूठ

❇️ दुसरा श्रावणी सोमवार – 16 ऑगस्ट 2021 – तीळ शिवमूठ

❇️ तिसरा श्रावणी सोमवार – 23 ऑगस्ट 2021 – मूग शिवमूठ

❇️ चौथा श्रावणी सोमवार – 30 ऑगस्ट 2021 – जव शिवमूठ

❇️ पाचवा श्रावणी सोमवार – 6 सप्टेंबर 2021 – सातू शिवमूठ

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण

Shrawan Month 2021 | सर्वमनोकामना पूर्ण करणारा पवित्र श्रावण महिना कधीपासून सुरु होतोय, जाणून घ्या

Non Stop LIVE Update

Follow us on

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI