AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Skanda Sashti 2021 : स्कंद षष्ठी, भगवान कार्तिकेय यांची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि या दिवसाचं महत्व काय? जाणून घ्या

भगवान कार्तिकेय यांना स्कंद देखील म्हणतात. म्हणूनच या दिवसाला स्कंद षष्ठी म्हटले जाते. मान्यता आहे की, या दिवशी कार्तिकेय यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात. या व्रताचे पालन केल्याने आयुष्यात आनंद मिळतो. स्कंद षष्ठी व्रताशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेऊया. Skanda Sashti 2021

Skanda Sashti 2021 : स्कंद षष्ठी, भगवान कार्तिकेय यांची पूजा कशी करावी, शुभ मुहूर्त आणि या दिवसाचं महत्व काय? जाणून घ्या
Bhagvan Kartikeya
| Edited By: | Updated on: Jun 16, 2021 | 8:17 AM
Share

मुंबई : हिंदू धर्मात उपवास आणि सणांना विशेष महत्त्व आहे. हिंदू कॅलेंडरनुसार, प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या षष्ठी तिथीला स्कंद षष्ठी व्रत ठेवले जाते. आज स्कंद षष्ठी आहे. या दिवशी भगवान शिव यांचे पुत्र कार्तिकेय यांची पूजा केली जाते. स्कंद षष्ठी या दिवशी कार्तिकेयाचा जन्म झाला असे मानले जाते. भगवान कार्तिकेय यांना स्कंद देखील म्हणतात. म्हणूनच या दिवसाला स्कंद षष्ठी म्हटले जाते. मान्यता आहे की, या दिवशी कार्तिकेय यांची पूजा केल्याने जीवनातील सर्व त्रास दूर होतात. या व्रताचे पालन केल्याने आयुष्यात आनंद मिळतो. स्कंद षष्ठी व्रताशी संबंधित महत्वाची माहिती जाणून घेऊया (Skanda Sashti 2021 Know The Importance Of This Day And How To Worship Lord Kartikeya) –

– स्कंद षष्ठी शुभ मुहूर्त

ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाची षष्ठी तिथी 15 जून 2021 मंगळवारी रात्री 10 वाजून 56 मिनिटांपासून बुधवार, 16 जून 2021 संध्याकाळी 10 वाजून 45 मिनिटांनी संपेल.

– स्कंद षष्ठीला पूजा कशी करावी?

? स्कंद षष्ठीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि देवाचे ध्यान करताना व्रताचा संकल्प करावा

? भगवान शिव आणि देवी गौरी आणि भगवान कार्तिकेय यांच्या मूर्ती पूजास्थळावर स्थापित करा

? यानंतर तुपाचा दिवा लावा आणि हंगामी फुले, फळे, मेवा, कलावा, चंदन, हळद इत्यादी वस्तू अर्पण करा

? या पूजेनंतर भगवान शिव, माता पार्वती आणि कार्तिकेय यांची पूजा करा

? शेवटी आरती करा

? या दिवशी उपवास ठेवला पाहिजे आणि संध्याकाळी पूजा झाल्यानंतर फळे खावे.

– स्कंद षष्ठीचे महत्त्व

स्कंद षष्ठी पूजेच्या दिवशी भगवान शिवपुत्र कार्तिकेय यांची पूजा केल्यामुळे ग्रहातील अडथळे दूर होतात. जर तुमच्या कुंडलीत कोणत्याही प्रकारचे ग्रह दोष असतील तर हे व्रत करणे अत्यंत फलदायी आहे. या दिवशी विधावत पूजा केल्याने आनंद आणि समृद्धी मिळते.

हा उत्सव विशेषतः दक्षिण भारतात साजरा केला जातो. दक्षिणेस भगवान कार्तिकेय सुब्रह्मण्यम म्हणून ओळखले जातात. भगवान कार्तिकेयांचे आवडते पुष्प म्हणजे चंपा, म्हणून या दिवसाला चंपा षष्ठी देखील म्हणतात. पौराणिक कथेनुसार या दिवशी भगवान कार्तिकेय यांनी तारकासुरचा वध केला होता.

Skanda Sashti 2021 Know The Importance Of This Day And How To Worship Lord Kartikeya

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Mithun Sankranti 2021 : ‘मिथुन संक्रांती’, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि महत्त्व…

सोमवारी महादेवाला प्रसन्न करण्यासाठी महामृत्युंजय मंत्राचा जप करा, जाणून घ्या नियम आणि फायदे

Vinayak Chaturthi 2021 | विनायक चतुर्थी, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि पूजा विधी

कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत
कोकाटेंचं मंत्रिपद गेलं, राजीनामा मंजूर, अटकेसाठी पोलीस 3 तास लिलावतीत.
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा
एपस्टिन कांडामुळं भारतात राजकीय उलथापालथ होणार,सामनातून सरकारवर निशाणा.
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?
...तर बीडमध्ये उपोषण करणार, सुप्रिया सुळे यांनी का दिला टोकाचा इशारा?.
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?
प्रज्ञा सातव भाजपवासी, एकाच प्रवेशात BJP कडून 2 शिकार?.
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!
पुणे निवडणुकीसाठी धंगेकरांना ठेवलं दूर, BJPच्या बैठकीत बोलवलंच नाही!.
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी
निवडणुकीत दोन्ही NCPच्या एकत्र येण्यास ठाकरेंचा विरोध, 'मविआ'त ठिणगी.
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!
दादांनंतर शिंदे आमदारामागे कोर्ट कचेरी, कोकाटेंनंतर कुडाळकर गोत्यात!.
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!
INTIMASIA 2025 एक्झिबिशनमध्ये फ्लोरेटच्या आधुनिक उत्पादनांचे प्रदर्शन!.
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना
राजीनामा स्वीकारताच कोकाटेंच्या अटकेसाठी पोलीस रवाना.
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं
फलटण प्रकरणी राजकारण नको! फडणवीसांनी स्पष्टच सांगितलं.