प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्याने स्वत:च्या लहान मुलांना पाहून घेतला संन्यास; लाखोंची कमाई, सुखी संसार सगळ्याचाच केला त्याग

सर्व सुखांचा त्याग करत सन्यास घेणाऱ्या अहमदाबादच्या एका जोडप्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 13 वर्षांपूर्वी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनी आता संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलांचं अनुसरण करुन वैराग्याचा मार्ग स्वीकारला आहे. प्रियांक वोहरा आणि भव्यता वोहरा असं या जोडप्याचं नाव आहे.

प्रेम विवाह करणाऱ्या जोडप्याने स्वत:च्या लहान मुलांना पाहून घेतला संन्यास; लाखोंची कमाई, सुखी संसार सगळ्याचाच केला त्याग
वनिता कांबळे

|

Jul 06, 2022 | 4:19 PM

माणसाचं सुख कशात असंत? असं कुणी विचारलं तर पैसा, संपत्ती, मनासारखा जोडीदार अशा अनेक गोष्टी डोळ्यासमोर येतील. मात्र एका जोडप्याने लाखोंची कमाई, सुखी संसार सगळ्याचाच त्याग करत सन्यास घेतला आहे. स्वत:च्या लहान मुलांचे अनुकरण करत त्यांनी संन्यास(sanyas) घेतला आहे. प्रियांक वोहरा(Priyank Vohara) आणि भव्यता वोहरा(Bhavyata Vohara) असं या जोडप्याचं नाव आहे.

सर्व सुखांचा त्याग करत सन्यास घेणाऱ्या अहमदाबादच्या एका जोडप्याची चांगलीच चर्चा रंगली आहे. 13 वर्षांपूर्वी यांचा प्रेमविवाह झाला होता. त्यांनी आता संन्यास घेण्याचा निर्णय घेतला. विशेष म्हणजे त्यांनी आपल्या मुलांचं अनुसरण करुन वैराग्याचा मार्ग स्वीकारला आहे.

प्रियांक वोहरा हे अहमदाबादचे मोठे व्यापारी आहेत. त्यांचा भव्यता वोहरा यांच्यासह प्रेमविवाह झाला होता. बिझनेसमध्ये ते सेटल आहेत. त्यांचा संसारही सुखात सुरु होता. मात्र, त्यांचा मुलगा सुर आणि मुलगी सिरी यांनी संन्यास्तव स्वीकारले आहे.

वोहरा यांच्या मुलांनी दोन वर्षांपूर्वी संन्यासत्व स्वीकारले आहे. यानंतर 70 लाख रुपयांपेक्षा जास्त वार्षिक उलाढाल असलेला त्यांचा ऑटो पार्ट्सचा व्यवसाय वोहरा यांची अवघ्या चार दिवसांत बंद करुन मुलांप्रमाणे संन्यासत्व स्वीकारण्याचा निर्णय घेतला.

वोहरा दाम्पत्याने बुधवारी सुरतमध्ये मुलांच्या उपस्थितीत दीक्षा घेतली. “आम्ही आमच्या मुलांचे अनुसरण करत आहोत. संन्यासत्व प्राप्त केल्यानंतर इतर कोणत्याही धर्मात पालक मुलांसोबत राहू शकत नाहीत परंतु जैन धर्मात हे शक्य आहे. आम्ही त्यांच्यासोबत राहू शकू” असे वोहराने सांगितले.

वयाच्या 12 व्या वर्षी माझ्या मनात दीक्षा घेण्याची इच्छा निर्माण झाली. मात्र, मी व्यवसायात सहभागी झाल्यानंतर आणि लग्न केले. यामुळे मी व्यवसाय आणि संसार यात अडकून पडलो. यामुळे तपस्वी मार्ग स्वीकारू शकलो नाही. दीक्षा घेणे आम्हा चौघांच्या नशिबात लिहिलेले आहे यामुळेच मुलांपाठोपाठ आम्ही देखील दीक्षा घेतल्याचे प्रियंक वोहरा यांनी सांगीतले.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें