AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : घरातील भांडणं थांबतच नाहीयेत? मग किचन आणि बेडरूममध्ये करा हा छोटासा बदल

अनेकदा काहीही कारण नसताना आपल्या घरात सतत भांडणं होत असतात. कितीही काळजी घेतली तरी वाद हे होताच. असे वाद टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दलच आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

Vastu Shastra : घरातील भांडणं थांबतच नाहीयेत? मग किचन आणि बेडरूममध्ये करा हा छोटासा बदल
vastushtra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Mar 27, 2026 | 8:30 PM
Share

वास्तुशास्त्रामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? याबद्दलच माहिती सांगण्यात आलेली नाहीये, तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात ज्या काही वस्तू असतील या सर्व वस्तुंचा सकारात्मक किंवा नकारात्मक ऊर्जेशी संबंध येत असतो. प्रत्येक वस्तू कोणत्या दिशेला ठेवावी, याबद्दल देखील वास्तुशास्त्रात माहिती देण्यात आली आहे. जर एखादी शुभ फळ देणारी गोष्ट असेल आणि तिला जर आपण चुकीच्या दिशेला ठेवलं तर त्याचा आपल्यावर उलटा परिणाम होऊ शकतो. त्यामुळे वास्तुशास्त्रात दिशेला देखील महत्त्व असतं. प्रत्येक वस्तू ही योग्य दिशेला ठेवली गेली पाहिजे, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. अनेकदा आपल्या घरात काहीही कारण नसताना सतत भांडणं होतात, ते टाळण्यासाठी वास्तुशास्त्रात काही उपाय सांगण्यात आले आहेत, त्याबद्दल आज आपण माहिती जाणून घेणार आहोत.

स्वयंपाक घरातील बदल – वास्तुशास्त्रानुसार जर तुमच्या घरात नेहमची भांडणं होत असतील तर सर्वात आधी तुमचं किचन कोणत्या दिशेला आहे, ते एकदा पहा. किचन हे नेहमी अग्नेय दिशेला असावं, असं वास्तुशास्त्र सांगतं. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे अग्नेय दिशा ही अग्नीदेवताशी संबंधित आहे, जर तुमचं किचन हे अग्नेय दिशेला असेल तर त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा तयार होते, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. तसेच तुमच्या घरातील डायनिंग टेबल हा नेहमी आयातकृतीच असावा तो इतर शेफमध्ये असू नये, असं देखील वास्तुशास्त्र सांगतं.

बेडरूममध्ये बदल – जर तुमची बेडरूम ही वास्तुशास्त्राच्या नियमानुसार तयार केलेली असेल तर तुमच्या अर्ध्या समस्या तिथेच संपतात असं म्हटलं जातं. तुमची बेडरूम ही नेहमी दक्षिण -पश्चिम अशी असावी. तसेच तुमचा बेड देखील याच दोन दिशांच्या मध्ये असावा, असं वास्तुशास्त्रामध्ये सांगण्यात आलं आहे. एवढंच नाही तर बेडरूमच्या भिंतीला कधीही जास्त भडक रंग देऊ नये, बेडरूमच्या भिंतीला नेहमी लाईट कलर असावेत असं देखील वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. बेडरूममध्ये राधा कृष्ण यांचा एक फोटो देखील असावा, तसेच एका गोष्टीची नेहमी काळजी घ्यावी की बेडरूममध्ये कधीही काटेरी झाडं ठेवू नयेत, कारण अशा या झाडांचा नात्यांवर नकारात्मक परिणाम होतो, घरात नकारात्मक ऊर्जा वाढते असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की...
Pune Nasrapur Case | नसरापूर अत्याचार प्रकरणाचा आज मोठा फैसला! भीमराव कांबळीला फाशी की जन्मठेप?; निकाल थोड्याच वेळात...
छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या..
Rohit Pawar | छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचे एल्गार आंदोलन; शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी सरकारला इशारा
सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच
Sindhudurg | सिंधुदुर्गात मुसळधार पावसाची एन्ट्री; तरीही नद्या-तलाव कोरडेच, शेतकरी चिंतेत!
विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....
Vilas Ghule Case | विलास घुले प्रकरणाला नवं वळण; ब्लॅकमेल, अत्याचार अन्....हत्येचं मूळ कारण आलं समोर
फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री!
Uddhav Thackeray | फुटीर खासदारांच्या बालेकिल्ल्यात उद्धव ठाकरेंची एंट्री! आज शिर्डीत मोठं शक्तिप्रदर्शन
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत
राऊतांचा ओमराजेंवर खळबळजनक आरोप, थेट पवनराजे निंबाळकर यांचं नाव घेत म्हणाले 500 कोटी...
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न
सिया अशी का वागली? तिच्या आई-वडिलांचं प्रमाणिक उत्तर ऐकून डोकंच सुन्न होईल; 12 तासाच्या चौकशीत...
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून
तीच जागा, डमी पुतळा, अन् सियानं... लोहगडावरील घटनेच्या रिक्रियेशनमधून डोकं चक्रावणारी माहिती समोर
ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळी
Big Breaking | ओमराजेंच्या बालेकिल्ल्यातील दौऱ्यापूर्वी मोठी अपडेट समोर; बीडच्या परळीतच...
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर,
मुख्यमंत्री हतबल दिसले, ठाकरेंच्या त्या टीकेला फडणवीसांचं दमदार उत्तर, म्हणाले, मला विमानात तर...