Vastu Tips : घराच्या दरवाजावर लावा ‘या’ चार वस्तू; सर्व नकारात्मक शक्ती क्षणात होतील दूर
हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अनन्यसाधारण महत्त्व आहे. वास्तुशास्त्रामध्ये असे काही उपाय सांगण्यात आले आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते, त्याबाबत आज आपण जाणून घेणार आहोत.

हिंदू धर्मशास्त्रामध्ये वास्तुशास्त्राला अत्यंत महत्त्व आहे. जर तुमच्या वास्तुची रचना ही वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुम्हाला आयुष्यात अनेक अडचणी येऊ शकतात अशी मान्यता आहे. जर तुमचं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे नसेल तर तुमच्या घरात नेहमीच नकारात्मक ऊर्जेचा वास राहातो. त्यामुळे त्याचा त्रास तुम्हाला होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं.
त्यामुळे लोकं घर खरेदी करताना नेहमी वास्तुशास्त्राचा विचार करतात. आपलं घर हे वास्तुशास्त्राप्रमाणे आहे का? म्हणजे घराचा मुख्य दरवाजा कोणत्या दिशेला आहे? घराचं बेडरूम कोणत्या दिशेला आहे, स्वयंपाक घर कोणत्या दिशेला आहे, या सर्व गोष्टी लक्षात घेतल्या जातात. महत्त्वाचं म्हणजे वास्तुशास्त्रात केवळ घर कसं असावं हेच सांगण्यात आलेलं नाही तर घरात तुम्ही ज्या वस्तु ठेवतात त्या वस्तुची दिशा कोणती असावी याबाबत देखील मार्गदर्शन करण्यात आलं आहे.
दरम्यान वास्तुशास्त्रामध्ये अशा काही वास्तुटीप्स सांगण्यात आल्या आहेत, ज्यामुळे तुमच्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होऊन घरात सदैव सकारात्मक ऊर्जा राहाते. ज्यामुळे तुमच्या घरात सुख समाधान आणि आनंदी वातावरण राहाते, त्याबद्दल आज आपण जाणून घेऊयात.
घराच्या दरवाजावर तोरण लावा – घराच्या दरवाजावर नेहमी तोरण असावं असं वास्तुशास्त्र सांगतं. तोरण हे कशाचंही असू शकतं, शक्यतो आंब्याच्या पानापासून बनवलेलं तोरण हे शुभ मानलं जातं. सोबतच तुम्ही झेंडूच्या फुलांपासून देखील तुमच्या घराला सुंदर असं तोरण करू शकता, त्यामुळे तुमच्या घरामध्ये नकारात्मक ऊर्ज प्रवेश करू शकणार नाही.
घोड्याची नाल – घोड्याची नाल देखील शुभ मानली जाते. तुम्ही घोड्याची नाल तुमच्या घराच्या उंबऱ्याला ठोकू शकतात. त्यामुळे तुमचं नकारात्मक शक्तींपासून संरक्षण होतं.
स्वस्तिक चिन्ह – घरावर स्वस्तिक चिन्ह असणं देखील शुभ मानलं जातं. यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा प्रवेश करत नाही.
देवी -तेवतांची प्रतिमा – तुम्ही तुमच्या मुख्य दरवाजावर कोणत्याही देवी -देवतांची प्रतिमा लावू शकता. त्यामुळे नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही. घरात सकारात्मक वातावरण राहातं.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)
