AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Tips for home: घरामध्ये कुठलाही बदल न करता ‘या’ सोप्या उपायांनी करा वास्तुदोष दूर

बऱ्याचदा घरामध्ये काही कारणांनी वास्तुदोष (Vastu Dosh)  निर्माण होतो. अनेकदा वास्तुशास्त्रातले नियम (Vastu tips) वाचले तर त्यात सुचविलेले बदल करणे अशक्य असते. यामागे अनेक करणं असू शकतात.  घर भाड्याचे असो वा स्वतःचे, वास्तुदोषामुळे कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. घराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तू शास्त्रामध्ये काही उपाय […]

Vastu Tips for home: घरामध्ये कुठलाही बदल न करता 'या' सोप्या उपायांनी करा वास्तुदोष दूर
Nitish Gadge
Nitish Gadge | Updated on: Jul 05, 2022 | 5:38 PM
Share

बऱ्याचदा घरामध्ये काही कारणांनी वास्तुदोष (Vastu Dosh)  निर्माण होतो. अनेकदा वास्तुशास्त्रातले नियम (Vastu tips) वाचले तर त्यात सुचविलेले बदल करणे अशक्य असते. यामागे अनेक करणं असू शकतात.  घर भाड्याचे असो वा स्वतःचे, वास्तुदोषामुळे कोणत्याही कामामध्ये सहजपणे यश प्राप्त होत नाही आणि आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागते. घराचे वास्तुदोष दूर करण्यासाठी वास्तू शास्त्रामध्ये काही उपाय सांगण्यात आले आहेत. त्याबद्दल जाणून घेऊया.

  1.  मुख्य दारासमोर रात्री पुरेसा प्रकाश राहील याची व्यवस्था करावी. यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढते.
  2.  शक्य असल्यास दरवाजाला उंबरा अवश्य बनवावा. यामुळे घरामध्ये कचरा येत नाही. कचऱ्यामुळे वास्तुदोष वाढतात.
  3.  मेनगेटवर श्रीगणेशाची मूर्ती किंवा फोटो लावू शकतात. दरवाजावर ऊँ लिहवे. दारावर शुभ चिन्ह काढल्याने देव-देवतांची घरावर कृपा राहते.
  4.  दरवाजाच्या ठीक समोर सुंदर फुलांचा फोटो लावावा.
  5.  घराच्या नैऋत्य (दक्षिण-पश्चिम) दिशेला अंधार ठेवू नये. वायव्य (उत्तर-पश्चिम) दिशेला लख्ख प्रकाशाचा बल्ब लावू नये.
  6.  घरामध्ये कायम शांतता ठेवावी. कोणत्याही प्रकारचा क्लेश नकारात्मकता वाढवतो. कुटुंबातील वादामुळे वास्तुदोष वाढतो.
  7.  घराच्या जवळपास वाळून गेलेले झाड असल्यास ते लगेच काढून टाकावे. यामुळे वास्तुदोष वाढतात.
  8.  अडचणी दूर करण्यासाठी रोज सकाळी लवकर उठावे आणि स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अवश्य द्यावे.
  9.  दररोज सकाळ-संध्याकाळ थोडावेळ घरामध्ये मंत्र जप करावा. जपामुळे वातावरणातील सकारात्मकता वाढते.
  10.  रोज सकाळच्या आणि रात्रीच्या स्वयंपाकातील पहिली पोळी गायीसाठी काढून ठेवावी.

(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक...
TMC पक्षचिन्ह प्रकरणी मोठी अपडेट समोर; सुप्रीम कोर्टाकडून निवडणूक आयोगाला अंतिम मुदत
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी..
शेतकऱ्यांना बांधावरून चालावं लागतं, मंत्र्यांसाठी रॅम्प कशाला? पाहणी दरम्यान बावनकुळे संतापले
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्
राष्ट्रवादी विलीनीकरणाच्या चर्चेवर शरद पवारांची भूमिका; सुनील तटकरे म्हणाले...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत...
दुष्काळग्रस्तांसाठी मीरा-भाईंदर पालिकेचा मोठा निर्णय; 1 कोटींची मदत जाहीर
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? रघुवंशींच्या विधानाने खळबळ
शिंदे नसते तर भाजपचं काय झालं असतं? बड्या नेत्याच्या विधानाने खळबळ
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं..
ठाणे कोपरी पोलीस ठाण्यात सिद्धू अभंगे यांना महिलांकडून मारहाण; नेमकं कारण काय?
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदार...
दुष्काळातून तालुका वगळला, आता लोक... कार्यकर्त्याचा थेट भाजप खासदाराला फोन; नेत्याच्या उत्तराने सगळेच अवाक्
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला...
धर्मेंद्र प्रधान यांच्यानंतर ज्ञानेश कुमारांची विकेट पडणार? महिला नेत्याच्या विधानाने खळबळ!
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार
केंद्र सरकार 2000 वरील यूपीआय व्यवहारांवर शुल्क आकारणार. सर्वोच्च न्यायालयाने मागवले प्रतिज्ञापत्र
35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय
Solapur : शेती उद्ध्वस्त, तरुण बेरोजगार अन्...; 30-35 वर्षांच्या पाणी संघर्षानंतर तुळशी गावकऱ्यांनी घेतला टोकाचा निर्णय...