Vastu Tips: घराच्या बाहेर गणपतीचा फोटो लावणे योग्य की अयोग्य? वास्तूशास्त्र काय सांगते?

धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते. गणेशाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतात.

Vastu Tips: घराच्या बाहेर गणपतीचा फोटो लावणे योग्य की अयोग्य? वास्तूशास्त्र काय सांगते?
वास्तूशास्त्रImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 22, 2023 | 3:11 PM

मुंबई, वास्तुशास्त्रात (Vastu tips) घराचा मुख्य दरवाजा हा अत्यंत महत्त्वाचा भाग मानला जातो. म्हणूनच मुख्य दरवाजा स्वच्छ ठेवला पाहिजे. वास्तूशास्त्राच्या दृष्टीनेदेखील याला विशेष महत्व आहे. बऱ्याचदा वास्तूदोष दुर करण्यासाठी घराच्या मुख्य दारावर देवी देवतांचे फोटो लावण्याचा सल्ला देण्यात येतो, मात्र प्रत्येकच देवी देवतांचे फोटो घराच्या मुख्य दारावर लावणे योग्य मानले जात नाही.  म्हणूनच वास्तूनुसार काही गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे. धार्मिक मान्यतेनुसार गणपतीला पहिले पूजनीय देवता मानले जाते. गणेशाची पूजा केल्याने घरात सुख, समृद्धी आणि आशीर्वाद प्राप्त होतात. परंतु अनेकजण आपल्या घराच्या मुख्य दारात बाहेरील आणि आतील बाजूस गणेशाची मूर्ती किंवा फोटो चिकटवतात  पण वास्तुशास्त्रात याच्या उलट असल्याचे मानले जाते.

गणपतीची मुर्ती आणि वास्तूशास्त्र

वास्तुशास्त्रानुसार, घराच्या मुख्य दरवाजावर बाहेर  गणेशाची मुर्ती किंवा फोटो लावणे योग्य मानले जात नाही. मानले जात नाही. अनेक वेळा लोकांना असे वाटते की मुख्य दरवाजावर गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावणे शुभ असते, परंतु वास्तुशास्त्रानुसार या दोन्ही स्थिती चुकीचे आणि अशुभ परिणाम देणारी मानली जातात. त्यामुळे ही चुक अवश्य टाळावी.

हे सुद्धा वाचा

मुख्य दरवाजावर चुकूनही गणेशाची मूर्ती किंवा चित्र लावू नये. द्वारपालाची भूमिका घराच्या मुख्य दारात असल्याने बाप्पाचे चित्र किंवा मूर्ती ठेवणे हा त्यांचा अपमान समजला जातो. याशिवाय बाथरूम किंवा टॉयलेटला जोडल्या जाणाऱ्या भिंतीवर गणपतीचे चित्र कधीही लावू नये. यामुळे वास्तूदोष निर्माण होऊ शकतो. म्हणूनच गणपतीची पूजा घरात म्हणजेच देवघरात करावी.

आर्थीक सुबत्ता लाभण्यासाठी काही उपाय

  1. खोल्यांचा रंग- वास्तुशास्त्रानुसार खोलीच्या पूर्व दिशेला हलका निळा रंग निवडा. उत्तरेला हिरवा, पूर्वेला पांढरा, पश्चिमेला निळा आणि दक्षिणेला लाल रंग निवडावा.असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा वाढते.
  2. जलाशयाची दिशा- वास्तुशास्त्रानुसार पाण्याचा नळ उत्तर, ईशान्य दिशेला ठेवा. घराच्या दक्षिण, आग्नेय किंवा नैऋत्य दिशेला पाण्याची टाकी ठेवा. या दिशेला पाण्याची टाकी ठेवल्याने पैसा मिळतो.
  3. तिजोरी ठेवण्याची दिशा – वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये तिजोरी दक्षिण किंवा नैऋत्य दिशेला ठेवावी. वास्तुशास्त्रानुसार तिजोरीचा दरवाजा उत्तर दिशेला ठेवावा. असे केल्याने धनलाभ होण्याचे योग आहेत.
  4. घर व्यवस्थित ठेवा- घर नेहमी स्वच्छ ठेवले पाहिजे. देवी लक्ष्मीचा वास स्वच्छ ठिकाणीच असतो. वास्तुशास्त्रानुसार घराची उत्तर दिशा व्यवस्थित ठेवावी. असे केल्याने घरात धनसंपत्ती वाढते असे म्हणतात.
  5. घराचे दरवाजे किंवा खिडक्या – वास्तुशास्त्रानुसार घराचे दरवाजे किंवा खिडक्या स्वच्छ ठेवाव्यात. असे म्हटले जाते की, असे केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा राहते.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Non Stop LIVE Update
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान
बीडमध्ये जातीचं कार्ड कोण खेळतंय? कुणबीपत्रावरून धनंजय मुंडेंचं विधान.
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.