AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastushastra : घराला बरबाद करतात ही झाडं, कुटुंबातील सुख शांतीला लागतं ग्रहण

अनेकांना आपल्या घरात झाडं लवण्याची आवड असते, झाडांमुळे घरात प्रसन्न वातावरण राहतं. परंतु वास्तुशास्त्रानुसार काही झाडं ही दिसायला खूप सुंदर असतात मात्र त्यामुळे घरात प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते. अशी झाडं घरात लावू नयेत, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. आज आपण अशाच काही झाडांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत.

Vastushastra : घराला बरबाद करतात ही झाडं, कुटुंबातील सुख शांतीला लागतं ग्रहण
Vastu Shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: May 16, 2026 | 8:54 PM
Share

अनेकांना आपल्या घरात झाडं लावण्याची आवड असते. घर चांगलं दिसावं, घरात प्रसन्न वातावरण राहावं यासाठी अनेकजण घरात झाडं लावतात. वास्तुशास्त्रानुसार या झाडांचा देखील तुमच्या घरावर, कुटुंबावर परिणाम होत असतो. काही झाडं ही घरात लावणं अत्यंत शुभ माण्यात आलं आहे. जसं की मनी प्लॅन, स्नेक प्लॅंट, रबर प्लँट परंतु अशी देखील काही झाडं असतात जी दिसायला खूप सुंदर असल्यामुळे आपण आपल्या घरात लावतो, आणि मोठी चूक करतो. या झाडांमुळे घरात सतत नकारात्मक ऊर्जा तयार होते, ज्याचा प्रभाव हा घरातील कुटुंब प्रमुखावर आणि इतर सदस्यांवर होतो. तुम्ही जेव्हा अशी झाडं घरात लावतात तेव्हा तुम्हाला आर्थिक समस्या जाणवतात. घरातील वातावरण कायम तणावपूर्ण राहतं, तसेच तुमचं मन देखील अस्थिर बनतं, त्यामुळे अशी झाडं घरात लावू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. चला तर मग जाणून घेऊयात घरात कोणती झाडं नसावीत, आणि ही झाडं जर तुमच्या घरात असतील तर त्याचा तुमच्या आयुष्यावर काय परिणाम होऊ शकतो? याबद्दल वास्तुशास्त्रात काय सांगितलं आहे, त्याबद्दल.

काटेरी झाडं – वास्तुशास्त्रानुसार घरात गुलाब सोडून इतर एकही काटेरी झाडं नसावं. जर तुमच्या घरात कॅक्टस, निवडूंग या सारखी काटेरी झाडं असतील तर ती घरातून काढून टाकण्याचा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. कारण अशी झाडं ही नकारात्मक ऊर्जा निर्माण करतात. अशा झाडांमुळे घरातील तणाव वाढतो, काहीही कारण नसताना कुटुंबातील सदस्यांमध्ये वादविवादाचे प्रसंग निर्माण होतात. पती-पत्नीचं पटत नाही. स्वभाव चिडचिडा होतो, त्यामुळे अशी झाडं घरात लावू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

बोनसाय झाडं – वास्तुशास्त्रामध्ये झाडांना प्रगती आणि यशाचं प्रतिक मानलं जातं. झाडं ही उंच उंच वाढतात तसंच तुमचं यश देखील दिवसेंदिवस वाढत जातं. तुम्हाला प्रगतीच्या संधी मिळतात. परंतु हे जरी खरं असलं तरी देखील घरात कधीही बोनसाय केलेलं झाडं लावू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं. बोनसाय केलेलं झाड हे दिसायला खूप सुंदर दिसतं, परंतु त्याची वाढ होत नसते, त्यामुळे तुमच्या प्रगतीला फटका बसतो, कामात अडथळे निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे. त्यामुळे घरात कधीही बोनसाय केलेलं झाड लावू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं.

चिंचेच झाडं – घरात किंवा घराच्या अंगणात चिंचेच झाड कधीही लावू नये, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे. कारण चिंचेच्या झाडामध्ये प्रचंड प्रमाणात नकारात्मक ऊर्जा असते. ज्याचा थेट परिणाम हा तुमच्या आर्थिक स्थितीवर होतो, असं वास्तुशास्त्र सांगतं. जर तुमच्या घरात चिंचेचं झाड असेल तर तुम्ही कितीही पैसे कमावले तरी देखील ते तुमच्या हातात टिकत नाहीत, अचानक काही आर्थिक संकटे निर्माण होतात. त्यामुळे चिंचेच झाडं हे नेहमी घरापासून थोड्या दूर अंतरावर लावावं, असा सल्ला वास्तुशास्त्रात देण्यात आला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट..
Devendra Fadnavis : दुष्काळग्रस्त महाराष्ट्रासाठी फडणवीसांची दिल्लीवारी; अमित शहांची भेट, केंद्राचं पथक 8 ऑक्टोबरपासून पाहणी करणार
रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही
Congress Protest : हातात संविधान, रस्त्यावर प्रियंका गांधी; पोलिसांनी उचलून बसमध्ये नेलं, राहुल गांधीही ताब्यात
जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस....
Delhi Congress Protest : जंतर-मंतरकडे जाणाऱ्या बसेस रोखल्या अन् हवा काढली; काँग्रेस कार्यकर्त्यांचा संताप, नेमकं काय घडलं?
ही काय पद्धत आहे? प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील...
Congress Protest : ही काय पद्धत आहे? आम्हाला मारहाण केली, खाली ढकललं; प्रियांका गांधी थेट रस्त्यावरच झोपल्या, दिल्लीतील वातावरण तापलं
जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका...
Delhi Congress Protest : जंतर-मंतरपासून काही मिनिटांवर बसेस रोखल्या; राहुल गांधी-प्रियंका गांधी खाली उतरले, रस्त्यावरच ठिय्या आंदोलन सुरू
मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा
Rahul Gandhi : मोदी, शाह, भागवत अन् ज्ञानेश कुमारांनी लोकशाही संपवली; राहुल गांधींचा थेट घणाघात, राहुल गांधी काय म्हणाले?
कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा
Shivsena Supreme Court Hearing : कोणत्याही आमदारानं राजीनामा दिलेला नाही; शिवसेना प्रकरणात नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात मोठा युक्तिवाद, पुढे म्हणाले...
आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या
Shivsena Supreme Court Hearing : आमदारांचे अधिकार, पक्षांतर्गत निवडणुका अन्...; शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीत नीरज कौलांनी मांडले मोठे मुद्दे, थेट...
शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात
Shivsena : शिवसेना पक्षचिन्हाच्या सुनावणीला सुरुवात; नीरज कौलांचा सुप्रीम कोर्टात जोरदार युक्तिवाद
राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या...
Congress Protest : राहुल गांधींच्या 9 तासांच्या ठिय्यानंतर आज पुन्हा रणशिंग? खरगेंच्या लंच डिप्लोमसीत पुढची रणनीती काय?