Rohit Sharma Injury Update : रोहित-शमी पुढच्या सामन्यात खेळणार का? इंजरीबद्दल महत्त्वाची अपडेट
Rohit Sharma Injury Update : भारत आणि पाकिस्तान सामन्यादरम्यान रोहित शर्मा आणि मोहम्मद शमीला इंजरीचा सामना करावा लागला. दोघे खेळाडू मैदानाबाहेर गेले होते. आता त्यांच्या दुखापतीबद्दल मोठी अपडेट आहे. श्रेयस अय्यरने हा खुलासा केलाय.

भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान बाबर आजम आऊट झाल्यानंतर कॅप्टन रोहित शर्माला दुखापतीची समस्या जाणवली. रिपोर्ट्नुसार हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित 10 ओव्हर मैदानाबाहेर होता. त्यानंतर तो परत आला. कॉमेंटेटर्स म्हणाले की, फिल्डिंग दरम्यान रोहित सहज वाटला नाही. त्याशिवाय भारताच्या वेगवान गोलंदाजीच नेतृत्व करणारा मोहम्मद शमी सुद्धा अँकलच्या दुखापतीमुळे त्रस्त दिसून आलेला. अनेकदा तो मैदानाबाहेर जाताना दिसला. आता दोघांच्या दुखापतीबद्दल अपडेट समोर आलीय.
मॅचनंतर रोहित शर्माने त्याच्या दुखापतीबद्दल खुलासा केला. पोस्ट-मॅच प्रेजेंटेशनमध्ये रोहितला त्याच्या हॅमस्ट्रिंग दुखापतीबद्दल विचारण्यात आलं. त्यावर तो म्हणाला की, “सध्या ठीक आहे. कुठलीही अडचण नाहीय. शमीबद्दल तो काही बोलला नाही”
श्रेयस अय्यर दुखापतीबद्दल काय म्हणाला?
दुसरीकडे श्रेयस अय्यरने मॅचनंतर पत्रकार परिषदेत शमी आणि रोहितच्या दुखापतीच्या प्रश्नांवर उत्तर दिली. अय्यरने सांगितलं की, “दोन्ही खेळाडू ठीक आहेत. टीममध्ये दुखापतीची काही समस्या नाहीय. मी जे पाहिलं, त्यानुसार दोघे ठीक आहेत. माझ्या माहितीप्रमाणे मला नाही वाटत की, टीममध्ये काही इंजरी आहे”
भारतीय फॅन्स चिंतेत
रोहित आणि शमी मैदानाबाहेर गेल्यामुळे भारतीय फॅन्स चिंतेत होते. कारण टुर्नामेंटमध्ये आता महत्त्वाचे सामने बाकी आहेत. टीम इंडियाला आधी न्यूझीलंडचा सामना करायचा आहे. टीम इंडियाच सेमीफायनलमध्ये खेळणं जवळपास निश्चित आहे. तिथे दोघांची आवश्यकता आहे. पण टीम इंडियाच्या फॅन्सनी जास्त चिंता करण्याची आवश्यकता नाहीय. कारण दोघे फिट असल्याच सहकाऱ्याने सांगितलय.
भारताचा पुढचा सामना आता काही दिवसांनी
चांगली बाब म्हणजे भारत आपला पुढचा सामना 6 दिवसांनी खेळणार आहे. टीम इंडिया दुबईत 2 मार्चला न्यूझीलंड विरुद्ध उतरणार आहे. दोन्ही खेळाडूंनी थोडा त्रास झाला, तर त्यांच्याकडे सावरण्यासाठी मध्ये 6 दिवस आहेत. त्याशिवाय टीम इंडियाच्या खेळाडूंना आराम करण्याची संधी मिळेल. त्यामुळे मॅच आधी टीमचे खेळाडू फ्रेश होतील.
