IPL 2020: चेन्नईसाठी खुशखबर…अंबाती रायडू आणि ब्राव्हो फिट, पुनरागमनासाठी सज्ज

IPL 2020: चेन्नईसाठी खुशखबर...अंबाती रायडू आणि ब्राव्हो फिट, पुनरागमनासाठी सज्ज

अंबाती रायडू (Ambati Rayudu) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) फिट झाले आहेत. चेन्नईच्या संघासाठी दोन्ही खेळाडू महत्वाचे आहेत. (ambati rayudu and dwayne bravo fit)

Yuvraj Jadhav

| Edited By: Namrata Patil

Sep 30, 2020 | 7:54 AM

नवी दिल्ली: चेन्नई सुपर किंग्जचे दोन महत्वाचे खेळाडू अंबाती रायडू (Ambati Rayudu) आणि ड्वेन ब्राव्हो (Dwayne Bravo) फिट झाले आहेत. दोन्ही खेळाडू पुनरागमन करण्यासाठी सज्ज असल्याच्या वृत्ताला चेन्नईचे सीईओ के. विश्वनाथन यांनी दुजोरा दिलाय. विजयाने सुरुवात करणाऱ्या चेन्नईला सलग 2 पराभवांना सामोरे जावे लागले होते. (ambati rayudu and dwayne bravo fit)

आयपीएलच्या 13 व्या हंगामातील पहिल्या सामन्यात अंबाती रायडूने चेन्नईसाठी विजयी खेळी केली होती. मात्र, दुखापत झाल्यानंतर रायडूला संघाबाहेर बसावे लागले होते. अंबाती रायडू संघात नसल्याचा परिणाम चेन्नईच्या मधल्या फळीवर झाल्याचे दिसून आले. परिणामी संघाला दोन सामन्यांमध्ये पराभव स्वीकारावा लागला.

वेस्टइंडीजचा अष्टपैलू खेळाडू चेन्नईसाठी महत्वाचा खेळाडू ठरला आहे. फलंदाजी आणि गोलंदाजीमुळे ब्राव्होचा चेन्नईला फायदा होत आला आहे. येत्या शुक्रवारी चेन्नईचा सामना हैदराबाद विरुद्ध होणार आहे.

चेन्नई सुपर किंग्जने पहिल्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा 5 विकेटसने पराभव केला होता. दुसऱ्या सामन्यात राजस्थान रॉयल्स कडून 16 धावांनी पराभवाचा सामना चेन्नईला करावा लागला. दिल्ली कॅपिटल्सने चेन्नईचा 44 धावांनी पराभव केला.

आयपीएलच्या पहिल्या 10 सामन्यांमध्ये दिल्ली पहिल्या स्थानावर तर चेन्नई सातव्या स्थानावर आहे.

संबंधित बातम्या :

IPL 2020, DC vs SRH Live Score Update: हैदराबादचे दिल्लीसमोर 163 धावांचे आव्हान, बेयरस्टोचे अर्धशतक

अवघ्या 22 वर्षांचा इशान, 58 चेंडूत 99 धावा ठोकून ‘विराट’ सेनेचा घाम फोडला

(ambati rayudu and dwayne bravo fit)

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें