AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Pak, Haris Rauf : प्लेन पाडण्याची ॲक्शन.. माजोरड्या हारिस रौफला चाहत्यांनी दाखवली जागा

Haris Rauf Plane Crashed Gesture VIDEO : भारताविरुद्धच्या सुपर-4च्या सामन्यात पाकिस्तानी खेळाडूंचा माज दिसून आला. आधी साहिबजादा फरहानने गन सेलिब्रेशन केलं, त्यानंतर हारिस रौफने प्लेन पाडण्याची केलेली ॲक्शन चर्चेत होती. पण त्याला चाहत्यांनी त्याची जागा दाखवून दिली.

Ind vs Pak, Haris Rauf :  प्लेन पाडण्याची ॲक्शन.. माजोरड्या हारिस रौफला चाहत्यांनी दाखवली जागा
हारिस रौफसमोर दिल्या कोहलीच्या नावाच्या घोषणाImage Credit source: social media
| Updated on: Sep 22, 2025 | 12:21 PM
Share

India vs Pakistan : आशिया कप 2025 स्पर्धेत काल सुपर-4 मध्ये भारत-पाकिस्तानचा सामना झाला. भारताने जोरदार विजय मिळवत पाकड्यांना धूळ चारली . मात्र या सामन्यात पाकिस्तान खेळाडूंचं जे वागणं होतं ते काही वेगळंच दर्शवत होतं. आधी साहिबजादा फरहानचे गन सेलिब्रेशन आणि त्यानंतर हारिस रौफने प्लेन पाडण्याची ॲक्शन केली. हारिस रौफचा प्लेन क्रॅश व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. तर त्यापूर्वी याच हारिस रौफचा अभिषेक शर्मा आणि शुबमन गिलशी मोठा वादही झाला. त्यानंतरच त्याचा प्लेन क्रॅश व्हिडीओ असल्याचं बोललं जात आहे.

हारिस रौफने का केली ती हरकत ?

काल झालेल्या भारताविरुद्धच्या सुपर-4 सामन्यात सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करताना हरिस रौफने विमानातून खाली पडणारी ॲक्शन केली. पण त्याने असं का केलं असा प्रश्न सध्या उपस्थित होत आहे. ती ॲक्शन म्हणजे विजयी सेलिब्रेशन करण्याची त्याची पद्धत होती का ? याचं उत्तर हो असं असे तर मॅच संपण्यापूर्वीच, तयाचा निकाल लागण्यापूर्वीच असं सेलिब्रेशन कोण करतं ? त्यामुळे त्याची ही ॲक्शन म्हणजे, त्याच्या मनात साठलेला राग होता, बाकी काही नाही, हे अगदी स्पष्ट होतं.

चाहत्यांनी दाखवली जागा, कोहलीच्या नावाचे दिले नारे

पाकिस्तानी खेळाडू हरिस रौफच्या प्लेन ड्रॉप परफॉर्मन्सचा व्हिडिओ समोर येताच, आणखी एक घटना घडली. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करणाऱ्या रौफला स्टेडियममधील भारतीय चाहत्यांनी थेट त्याची जागा दाखवून दिली. त्यांनी त्याला विराट कोहलीची आठवण करून दिली. रौफची ॲक्शन पाहताच चाहत्यांनी थेट “कोहली, कोहली!” असे जयघोष करायला सुरुवात केली. ते ऐकून मात्र रौफच्या तोंडावर 12 वाजल्याचे भाव होते, चाहत्यांचा जयघोष ऐकूनीह त्याने काहीच ऐकल्यासारखं केलं, पण त्याचा चेहरा मात्र चांगलाच पडला होता.

रौफच्या प्रदर्शनावर भारताने फेरलं पाणी

कालच्या भारताविरुद्धच्या सुपर 4 सामन्यात हरिस रौफच्या कामगिरीबद्दल बोलायचे झाले तर, त्याने 4 षटकांत 26 धावा देत 2 बळी घेतले. तो पाकिस्तानचा सर्वात किफायतशीर आणि सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. मात्र, भारताने 7 चेंडू शिल्लक असताना 6 गडी राखून सामना जिंकला तेव्हा त्याच्या कामगिरीवर पाणी फिरलं.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.