AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ind vs Sri Lanka, super over Drama : सुपर ओव्हरचा ड्रामा.. दासुन शनाका Out होऊनही का दिलं नॉट आऊट ?

आशिया कपमध्ये भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान एक अशी घटना घडली की सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर मोठा ड्रामा पहायला मिळाला. सुरुवातीला अम्पायरने दासुन शनाकाला बाद घोषित केले तरीही तो तो फलंदाजीला परतला. दासुन शनाका एकाच चेंडूवर दोन वेगवेगळ्या प्रकारे बाद झाला, तरीही तो वाचला. आयसीसीच्या नियमांनुसार हा निर्णय घेण्यात आला, काय होता तो नियम ?

Ind vs Sri Lanka, super over Drama : सुपर ओव्हरचा ड्रामा.. दासुन शनाका Out होऊनही का दिलं नॉट आऊट ?
भारत वि. श्रीलंका
| Updated on: Sep 27, 2025 | 10:19 AM
Share

आशिया कप 2025 च्या सुपर-4 मधील भारत विरुद्ध श्रीलंकेचा शेवटचा सामना अतिशय रोमांचक झाला, त्यात सुपर ओव्हरमध्ये टीम इंडियाने बाजी मारत विजय मिळवला. या सामन्यात दोन्ही संघांनी 200 पेक्षा जास्तधावा केल्या, पण 40 ओव्हर्स खेळूनही सामन्याचा निर्णय आला नाही, म्हणून अखेर सुपर ओव्हर खेळवण्यात आली. त्यामध्ये श्रीलंकेच्या संघाने फक्त 2 धावा केल्या, आणि मग भारताने हा सामना जिंकला. पण याच सुपर ओव्हरमध्ये श्रीलंकेच्या फलंदाजीदरम्यान एक हैराण करणारी घटना घडली, तिथे दोन्ही फिल्ड अंपायर्सनी फलंदाजाला बाद घोषित केलं, पण तरीही तो पॅव्हेलियनमधअये परत गेला नाही. आयसीसीच्या एका नियमामुळे तो फलंदाज वाचला.

दोन्ही अंपायरनी आऊट देऊनही वाचला फलंदाज

दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील सामन्यादरम्यान एक धक्कादायक घटना घडली. सुपर ओव्हरच्या चौथ्या चेंडूवर श्रीलंकेचा फलंदाज दासुन शनाका अर्शदीप सिंगच्या गोलंदाजीवर झेलबाद झाला. त्याच दरम्यान संजू सॅमसनने एक शानदार थ्रो मारला, तो थेट स्टंपवर आदळला. त्यानंतर दुसऱ्या पंचाने दासुन शनाकाला बाद घोषित केले. तथापि, दासुन शनाकाने रिव्ह्यू घेऊन सर्वांना आश्चर्यचकित केले.

ICC नियमामुळे वाचला दासुन शनाका

दासुन शनाकाने कॅच आउटविरुद्ध हा रिव्ह्यू घेतला आणि तेव्हाच, अल्ट्राएज तंत्रज्ञानाने स्पष्टपणे दाखवले की चेंडू आणि बॅटमध्ये कोणताही संपर्क झाला नाही, परिणामी कॅच आउटचा निर्णय रद्द करण्यात आला. मात्र, त्यानंतर संजू सॅमसनचा रन आउट देखील अवैध घोषित करण्यात आला. त्याचं कारण म्हणजे पंच गाजी सोहेल यांनी धावबाद होण्यापूर्वीच दासुन शनाकाला झेलबाद दिले होते. जेव्हा जेव्हा पंच सामन्यात आऊटचा निर्णय घेतात तेव्हा तो डेड बॉल मानला जातो आणि डेड बॉलवर विकेट दिली जात नाही किंवा फलंदाजाने केलेल्या धावाही जोडल्या जात नाहीत.

आयसीसीचा हा नियम दासुन शनाकासाठी वरदान ठरला. पंच गाजी सोहेल यांनी भारतीय संघाला हा नियम समजावून सांगितला की एकदा बाद घोषित झाल्यानंतर आणि रिव्ह्यू घेतला की, चेंडू डेड होतो आणि म्हणूनच शनाका धावबाद होण्यापासून वाचला. या घटनेने सर्वच आश्चर्यचकित झाले, कारण जर अर्शदीपने कॅचसाठी अपील केले नसते तर शनाका आणि त्याचा साथीदार खेळपट्टीच्या मध्यभागी अडकले असते आणि श्रीलंकेचा डाव सुपर ओव्हरमध्ये संपू शकला असता. पण एवढं होऊनही श्रीलंकेला याचा कोणताच फायदा झाला नाही कारण पुढच्याच चेंडूवर दासुन शनाका बाद झाला.

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.