AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 3: मलानची हाफ सेंचुरी, इंग्लंड ऑस्ट्रेलियावर पलटवार करणार?

सामन्यात आव्हान निर्माण करण्यासाठी एक मोठी भागीदारी होणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडचा संघ आधीच पिछाडीवर पडला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

AUS vs ENG, Ashes 2nd Test, Day 3: मलानची हाफ सेंचुरी, इंग्लंड ऑस्ट्रेलियावर पलटवार करणार?
| Edited By: | Updated on: Dec 18, 2021 | 11:01 AM
Share

मेलबर्न: अ‍ॅडलेड ओव्हलच्या मैदानावर इंग्लंड-ऑस्ट्रेलियामध्ये (England vs Australia) अ‍ॅशेस मालिकेतील (Ashes series) दुसऱ्या कसोटी सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु आहे. इंग्लंडने कालच्या दोन बाद 17 धावसंख्येवरुन पुढे डाव सुरु केला आहे. कर्णधार जो रुट (Joe Root) आणि डेविड मलान (David malan) यांनी सावध सुरुवात केली आहे. हळूहळू ते डावाला आकार देत आहेत. सकाळच्या सत्रात खेळाला सुरुवात केल्यानंतर ऑस्ट्रलियन गोलंदाज वरचढ ठरणार नाहीत, याची काळजी घेऊन दोघे फलंदाजी करत आहेत.

मलानने अर्धशतकी खेळी केली असून दोघांमध्ये 80 पेक्षा जास्त धावांची भागीदारी झाली आहे. इंग्लंडचा संघ अजूनही 350 पेक्षा जास्त धावांनी पिछाडीवर आहे. दुसऱ्या कसोटीतील पहिल्या दोन दिवसांच्या खेळावर ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवले. ऑस्ट्रेलियाने त्यांचा पहिला डाव 473 धावांवर घोषित केला. सामन्यात आव्हान निर्माण करण्यासाठी एक मोठी भागीदारी होणे आवश्यक आहे. या मालिकेत इंग्लंडचा संघ आधीच पिछाडीवर पडला आहे. ऑस्ट्रेलियाने पहिली कसोटी जिंकून 1-0 अशी आघाडी घेतली आहे.

काल दुसऱ्या दिवसाचा खेळ नियोजित वेळेआधीच संपवण्यात आला. दिवसाच्या अखेरच्या सत्रात वीजा चमकून ढगाळ वातावरण झाल्याने खेळ थांबवावा लागला. दिवसअखेरीस इंग्लंडची अवस्था नाजूक होती. निराशाजनक सुरुवातीनंतर इंग्लंडच्या दोन बाद 17 धावा झाल्या होत्या. मार्नस लाबुशेनचे शतक (103) आणि ऑस्ट्रेलियन कॅप्टन स्टीव स्मिथच्या 93 धावा कालच्या दिवसाच्या खेळाचं वैशिष्ट्य ठरलं. मिचेल स्टार्क आणि नीसरने वेगाने धावा करुन ऑस्ट्रेलियाला 473 धावसंख्येपर्यंत पोहोचवले. इंग्लंडकडून बेन स्टोक्सने सर्वाधिक तीन आणि जेम्स अँडरसनने दोन विकेट घेतल्या.

संबंधित बातम्या: Eknath Shinde : बंगळुरुतल्या गुंडांचा तीव्र निषेध, कर्नाटक सरकारनं लाल पिवळ्या ध्वजाचं स्तोम थांबवावं, एकनाथ शिंदेंचा इशारा NH48 | दिल्ली अब बहुत दूर नही ! मुंबई दिल्ली 12 तासात प्रवास, नितीन गडकरी यांची महत्वकांक्षी योजना ‘किंग कोहली का अपमान, नहीं सहेगा हिंदुस्तान’, #WorldStandsWithKohli ट्रेंडिंगमध्ये

वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार
धनुष्यबाण कोणाला मिळणार ठाकरेंना कि शिंदेंना? उद्या फैसला होणार.
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार
भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा मोर्चा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन
नितीन नबीन भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष, पंतप्रधान मोदींकडून अभिनंदन.
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा
मुंबई महापालिकेवर महायुतीचाच महापौर बसणार; अमित साटम यांचा दावा.
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान
दिल्लीतून मुंबईचा महापौर ठरणं हा महाराष्ट्राचा अपमान.
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?
महापालिकांमध्ये सत्तेचा पेच; महाराष्ट्रात पुन्हा ‘घोडेबाजार’ रंगणार?.
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास
निष्ठावंतांची कोंडी, फडणवीसांच्या निकटवर्तीय नेत्याचा संन्यास.
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा
मुंबईत बिहार भवन उभारणीवरून नवा वाद; मनसेचा थेट इशारा.
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा
चंद्रपूर महापौर पदावर मोठा ट्विस्ट; काँग्रेसच्या गटबाजीचा भाजपला फायदा.