Aus vs India 4 Th Test | बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? प्रशिक्षक विक्रम राठोर म्हणाले…

ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया यांच्यात 15 जानेवारीला ब्रिस्बेनमध्ये चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे.

Aus vs India 4 Th Test | बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही? प्रशिक्षक विक्रम राठोर म्हणाले...
यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह

ब्रिस्बेन : ऑस्ट्रेलिया विरुद्ध टीम इंडिया  (Australia vs India 4th Test) यांच्या 15 जानेवारीपासून चौथा कसोटी सामना खेळण्यात येणार आहे. हा सामना ब्रिस्बेनमध्ये खेळला जाणार आहे. चौथ्या सामन्याआधी टीम इंडियाच्या अनेक खेळाडूंना दुखापतीने ग्रासले आहे. त्यामुळे अनेक खेळाडू या कसोटी मालिकेतून बाहेर पडले आहेत. तर हनुमा विहारी (Hanuma Vihari) आणि रवींद्र जाडेजा (Ravindra Jadeja) यांना दुखापतीमुळे चौथ्या कसोटीला मुकावे लागले. दरम्यान यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) याच्या खेळण्याबाबतही अजून अनिश्चितता आहे. बुमराह चौथ्या कसोटीत खेळणार की नाही, याबाबत बॅटिंग कोच विक्रम राठोर (Batting Coach  Vikram Rathore) यांनी माहिती दिली आहे. (aus vs ind Will Jaspreet Bumrah play in the 4th test against Australia Batting coach Vikram Rathore said)

राठोर काय म्हणाले?

बुमराहच्या पोटाच्या भागाला दुखापत आहे. त्यामुळे तो खेळणार की नाही, याबाबत अनिश्चिचतात आहे. बुमराह 50 टक्के फीट असला तरी तो चौथ्या कसोटीत खेळेल, अशी माहिती काही मीडिया रिपोर्टनुसार देण्यात आली आहे. “बुमराहवर वैद्यकीय पथक लक्ष ठेवून आहे. बुमराह प्लेइंग इलेव्हनमध्ये असणार की नाही, याबाबतचा निर्णय हा सामन्याआधी घेतला जाईल”, अशी माहिती विक्रम राठोर  यांनी दिली.

बॅटिंग कोच विक्रम राठोर

फिट झाल्यास खेळणार :  राठोड

“वैद्यकीय पथक बुमराहच्या प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवून आहे. मेडिकल टीम बुमराहवर बारिक लक्ष देत आहे. 15 जानेवारीला पुन्हा एकदा बुमराहची फिटनेस चाचणी घेण्यात येईल. यानंतर बुमराह खेळणार की नाही, याबाबत अंतिम निर्णय घेतला जाईल” असंही राठोरने म्हटलं.

बुमराहला या दुखापतीतून सावरण्यासाठी आवश्यक कालावधी लागेल. तो कालावधी आम्ही बुमराहला देऊ शकतो. सामन्याच्या दिवशी म्हणजेच 15 डिसेंबरला चौथ्या सामन्यासाठीच्या अंतिम संघाची घोषणा करणार असल्याची माहितीही राठोरने दिली.

दुखापतग्रस्त टीम इंडिया

टीम इंडियाच्या मागे दुखापतीचं ग्रहण लागलं आहे. ऑस्ट्रेलिया दौऱ्यात आणि त्याआधी टीम इंडियाचे एकूण खेळाडू हे दुखापतग्रस्त आहेत. या दुखापतींमुळे टीम इंडियाला चांगलाच फटका बसला आहे. तिसऱ्या कसोटीत रवींद्र जाडेजा आणि हनुमा विहारी दुखापतग्रस्त झाले. जाडेजाला पहिल्या डावात फलंदाजी करताना दुखापत झाली.

या दुखापतीचा फायदा कांगारुंना झाला. कदाचित जाडेजा दुखापतग्रस्त नसता तर सामना नक्कीच टीम इंडियाने जिंकला असता, अशी चर्चा टीम इंडियाच्या समर्थकांमध्ये आहे. टीम इंडियाला या दुखापतीचा मोठा फटका बसला आहे.

मालिका बरोबरीlत

या मालिकेत आतापर्यंत एकूण 3 सामने खेळण्यात आले आहेत. या 3 पैकी दोन्ही संघांनी प्रत्येकी 1 सामना जिंकला आहे. तर तिसरा सामना हा अनिर्णित राहिला आहे. यामुळे ही मालिका 1-1 ने बरोबरीत आहे. यामुळे या मालिकेतील चौथा सामना हा मालिकेच्या आणि दोन्ही संघांच्या दृष्टीने महत्वाचा असणार आहे.

संबंधित बातम्या :

Aus vs Ind, 4th Test | चौथ्या कसोटीआधी कांगारुंना मोठा धक्का, ‘हा’ खेळाडू संघाबाहेर

Aus vs Ind, 4th Test | ब्रिस्बेन कांगारुंचा बालेकिल्ला, टीम इंडियाला ऐतिहासिक कामगिरी करण्याची संधी

(aus vs ind Will Jaspreet Bumrah play in the 4th test against Australia Batting coach Vikram Rathore said)

Published On - 5:35 pm, Thu, 14 January 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI