ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल 'या' भारतीय मुलीशी लग्न करणार ?

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारणही खास आहे. ग्लेन लवकरच एका भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचे म्हटलं जात आहे.

ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल 'या' भारतीय मुलीशी लग्न करणार ?

मुंबई : ऑस्ट्रेलियन क्रिकेटर ग्लेन मॅक्सवेल सध्या खूप चर्चेत आहे. त्याच्या चर्चेचे कारणही खास आहे. ग्लेन लवकरच एका भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न करणार असल्याचे म्हटलं जात आहे. ग्लेन आणि त्याची प्रेयसी विनी रामन (Australian cricketer glenn maxwell with vini raman) गेल्या दोन वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. विनी आणि ग्लेन इन्स्टाग्राम अकाऊंटवरही विनी नेहमी एकमेकांचे फोटो पोस्ट करत असतात. त्यामुळे सध्या ग्लेन लवकरच विवाहबंधनात (Australian cricketer glenn maxwell with vini raman) अडकणार असल्याची चर्चा सुरु आहे.

ग्लेन मॅक्सवेल ऑस्ट्रेलियाचा ऑलराऊंडर खेळाडू आहे. नुकतेच ग्लेनने अचानक क्रिकेट विश्वातून ब्रेक घेतला आहे. त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्यामुळे ग्लेनने ब्रेक घेतला आहे. त्यामुळे त्याच्या सर्व चाहत्यांना धक्का बसला आहे. ग्लेनची तब्येत ठीक असून तो सध्या त्याच्या कुटुंबियांसोबत वेळ घालवत आहे.

 

View this post on Instagram

 

Irish bartenders are the friendliest people we’ve ever met ☘️?? #tommytourist #dublin @gmaxi_32

A post shared by VINI (@vini.raman) on

ग्लेन मॅक्सवेल आणि भारतीय मुलगी विनी रामन गेल्या दोन वर्षांपासून एकत्र आहेत. मॅक्सवेल विनीसोबत लग्न करण्यासाठी इच्छुक आहे, असं म्हटलं जात आहे. पण त्यांच्या लग्नाबद्दल अजून काही अधिकृत माहिती आलेली नाही. जर ग्लेन मॅक्सवेलने भारतीय वंशाच्या मुली सोबत लग्न केले, तर तो ऑस्ट्रेलियाच्या शॉन टेटनंतर दुसरा ऑस्ट्रेलियन खेळाडू असेल ज्याने भारतीय वंशाच्या मुलीसोबत लग्न केले.

यापूर्वी 2014 मध्ये ऑस्ट्रेलियाचा माजी गोलंदाज शॉन टेटने भारतीय वंशाची मुलगी मासूम सिंघासोबत लग्न केले होते. हे दोघे एकमेकांना आयपीएल पार्टी दरम्यान भेटले होते. लग्नाआधीच हे दोघे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर आता ग्लेन मॅक्सवेलचा नंबर लागू शकतो.

 

View this post on Instagram

 

Missing this angel of mine @gmaxi_32 ? bring on summer & date nights ? #throwback

A post shared by VINI (@vini.raman) on

विनी ही भारतीय वंशाची आहे. पण गेले काही वर्ष ती ऑस्ट्रेलियामध्ये वास्तव्य करत आहे. विनी मेलबर्नमध्ये सेटल आहे. तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाईलनुसार ती फार्मासिस्ट आहे. विनी रामनने आपल्या इनस्टाग्राम अकाऊंटवर ग्लेनसोबतचे अनेक फोटो पोस्ट केले आहेत.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *