ऑस्ट्रेलियाच्या एलीसा हीलीची विश्वविक्रमाला गवसणी, महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडीत

एलिसाने महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड ब्रेक केला आहे. | (Alyssa Healy breaks Mahendra Singh Dhoni Record)

ऑस्ट्रेलियाच्या एलीसा हीलीची विश्वविक्रमाला गवसणी, महेंद्रसिंह धोनीचा रेकॉर्ड मोडीत

सिडनी : न्यूझीलंडचा महिला क्रिकेट संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड ( Australia Women vs New Zealand Women ) यांच्यात 3 सामन्यांची टी 20 मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज 27 सप्टेंबरला खेळण्यात आला. दुसऱ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने न्यूझीलंडवर 8 विकेट्सने मात केली. यासह ऑस्ट्रेलियाने 2-0 च्या फरकाने मालिकाही जिंकली. यासह ऑस्ट्रेलियाच्या विकेटकीपर एलिसा हीलीने (Alyssa Healy) वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी घातली आहे. एलिसाने टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा टी 20 क्रिकेटमधील रेकॉर्ड ब्रेक केला आहे. ( Alyssa Healy breaks Mahendra Singh Dhoni Record )

काय आहे रेकॉर्ड ?

एलिसाने या दुसऱ्या टी 20 सामन्यात न्यूझीलंडच्या 2 खेळाडूंना स्टंपमागे बाद केले. एलिसाने लॉरेन डॉनची झेल घेत धोनीचा टी 20 क्रिकेटमधील सर्वाधिक स्टंपिंगचा रेकॉर्ड मोडीत काढला आहे. त्यामुळे आता एलिसाच्या नावावर टी 20 मध्ये 42 कॅच आणि 50 स्टंपिंगची नोंद आहे. तर धोनीच्या नावावर 57 झेल आणि 34 स्टंपिंगची नोंद आहे.

विकेटकीपर म्हणून सर्वाधिक सामने

एलिसाने टी 20 क्रिकेटमध्ये विकेटकीपर म्हणून सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम केला आहे. न्यूझीलंड विरुद्धचा दुसरा टी 20 सामना एलिसाच्या कारकिर्दीतील 99 वा टी 20 सामना ठरला. यासोबत एलिसाने धोनीला पछाडले आहे. धोनीने टी 20 मध्ये विकेटकीपर म्हणून 98 सामन्यात भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे.

दरम्यान या टी 20 मालिकेनंतर ऑस्ट्रेलिया विरुद्ध न्यूझीलंड यांच्यात 3 सामन्यांची वनडे मालिका खेळण्यात येणार आहे. या वनडे मालिकेला 3 ऑक्टोबरपासून सुरुवात होणार आहे.

एलिसा हीलीची क्रिकेट कारकिर्द

एलिसी हीलीने 4 टेस्ट, 73 एकदिवसीय आणि 114 टी-20 सामन्यात ऑस्ट्रेलियाचं प्रतिनिधित्व केलं आहे. एलिसाचं टी 20 मध्ये नाबाद 148 ही सर्वोच्च खेळी आहे. एलिसाने टी 20 मध्ये 1 हजार 586 धावा केल्या आहेत. एलिसी हीली ही ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू मिचेल स्टार्कची पत्नी आहे.

संबंधित बातम्या :

आयसीसीच्या मुख्यालयातील अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा, आयपीएल स्पर्धेवर परिणाम ?

नीतू डेव्हिड भारतीय महिला क्रिकेटपटूंच्या राष्ट्रीय निवड समितीच्या प्रमुखपदी

( Alyssa Healy breaks Mahendra Singh Dhoni Record )

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *