ICC ची जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूवर बंदी, शाकीब अल हसन आऊट

आंतरराष्ट्री क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने बांगलादेशचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनवर (ICC banned Shakib Al Hasan) बंदी घातली आहे.

ICC ची जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडूवर बंदी, शाकीब अल हसन आऊट

ढाका : आंतरराष्ट्री क्रिकेट परिषद अर्थात आयसीसीने बांगलादेशचा कर्णधार आणि जगातील सर्वोत्तम अष्टपैलू खेळाडू शाकीब अल हसनवर (ICC banned Shakib Al Hasan) बंदी घातली आहे. शाकीब अल हसन (ICC banned Shakib Al Hasan) दोन वर्षे आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळू शकणार नाही. भ्रष्टाचार किंवा मॅच फिक्सिंगसंबंधात बुकींनी साधलेल्या संपर्काची माहिती आयसीसीला न दिल्याने त्याच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.त्यामुळे शाकीब अल हसनला आता 24 महिने मैदानाबाहेर राहावं लागणार आहे.

याप्रकरणी शाकीबने अतिव दु:ख झाल्याचं म्हटलं आहे. “मी ज्या खेळावर प्रेम केलं, त्यामध्येच माझ्यावर बंदी घातल्याने मला खूपच वाईट वाटत आहे. मात्र मी आयसीसीला माहिती द्यायला हवी होती, ती माझी चूक मान्य करतो. आयसीसचं भ्रष्टाचारविरोधी पथक हे खेळाडू आणि खेळातील भ्रष्टाचार रोखण्यासाठी काम करत आहे, मात्र मी माझं कर्तव्य पार पाडू शकलो नाही” असं शाकीब अल हसनने म्हटलं आहे.

नेमकं प्रकरण काय?

एका बुकीने मॅच फिक्सिंगसाठी बांगलादेशी अष्टपैलू शाकीब अल हसनशी संपर्क साधला होता. मात्र शाकीबने त्याबाबतची माहिती आयसीसीला देणं अपेक्षित होतं. ती त्याने न दिल्याने आयसीसीने त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारला.

आयसीसीच्या निर्देशानुसार शाकीब हसनला बांगलादेश क्रिकेट बोर्डाने अभ्यास दौऱ्यापासून दूर ठेवलं. त्यामुळे तो ना अभ्यास दौऱ्यात सहभागी होऊ शकला, ना सराव करु शकला. शाकीबवरील बंदीमुळे बांगलादेशला भारताविरुद्धच्या मालिकेपूर्वी धक्का बसला आहे.

दोन वर्षापूर्वी ऑफर

बांगलादेशी वृत्तपत्रांनुसार शाकीबला दोन वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंगची ऑफर मिळाली होती. मॅचपूर्वी एका बुकीने त्याच्याशी संपर्क साधला होता. नियमानुसार बुकीने संपर्क साधताच खेळाडूने आयसीसीशी संपर्क साधणे आवश्यक असतं. मात्र शाकीबने आयसीसीला याबाबतची माहितीच दिली नाही. शाकीबने ही माहिती लपवल्याने तो चौकशीच्या घेऱ्यात अडकला. चौकशीदरम्यान त्याने आपला गुन्हा कबूल केला होता.

भारत दौऱ्याला मुकणार

बांगलादेशी संघ भारत दौऱ्यावर येणार आहे. मात्र आता बंदीमुळे शाकीब अल हसन या दौऱ्याला मुकणार आहे. बांगलादेश भारताविरुद्ध तीन टी 20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. शाकीब टी 20 चा कर्णधार आहे. मात्र आता त्याची हकालपट्टी झाली आहे. 3 नोव्हेंबरपासून ही मालिका सुरु होईल. त्यानंतर कसोटी मालिका खेळवली जाणार आहे.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *