AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच भूमीत लोळवलं, मालिकाही हातून गेली

ऑस्ट्रेलिया आणि बांग्लादेश यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका सुरू आहे. या मालिकेतील पहिल्याच सामन्यात बांगलादेशने विजय मिळवून 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता ही मालिकाही ऑस्ट्रेलियाच्या हातून गेली आहे.

बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच भूमीत लोळवलं, मालिकाही हातून गेली
बांगलादेशचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाला कसोटीत त्यांच्याच भूमीत लोळवलं, मालिकाही हातून गेलीImage Credit source: ICC Twitter
| Updated on: Aug 16, 2026 | 10:35 AM
Share

बांगलादेशच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात मोठा विजय मिळवला आहे. बांगलादेशने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत जाऊन लोळवलं आहे. ऑस्ट्रेलियाने विजयासाठी अवघ्या 56 धावांचं आव्हान दिलं होतं. हे आव्हान बांगलादेशने 1 गडी गमवून सहज पूर्ण केलं आणि ऐतिहासिक नोंद केली. या सामन्यात पूर्णपणे बांग्लादेश संघाची पकड दिसून आली. कांगारूंना कुठेच डोकं वर काढू दिलं नाही. पहिल्या डावापासून बांगलादेशी संघ वरचढ राहिला. त्याचा परिणाम या सामन्यात विजयाने झाला. बांगलादेशने दोन सामन्यांच्या मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. त्यामुळे आता ही मालिका ऑस्ट्रेलियाच्या हातून गेली आहे. आता मालिका वाचवण्यासाठी ऑस्ट्रेलियाला धडपड करावी लागणार आहे. कारण दुसरा सामना जिंकला तर मालिका बरोबरीत सुटेल. अन्यथा मालिका पराभवाचं सावट असणार आहे.

सामन्यात काय काय घडलं?

ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकली आणि मनासारखा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करून बांगलादेशला आरामात पराभूत करू असं वाटलं होतं. पण तसं काही घडलं नाही. उलट हा निर्णय ऑस्ट्रेलियाच्या अंगलट आला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ 198 धावांवर बाद झाला. त्यानंतर बांगलादेशने झुंजार खेळी करत 426 धावा केल्या. त्यामुळे पहिल्या डावात 228 धावांची मजबूत आघाडी मिळाली. ही आघाडी मोडून काढताना ऑस्ट्रेलियाच्या नाकी दम आला. ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ दुसऱ्या डावात कसा बसा 284 धावांवर पोहोचला. त्यामुळे बांगलादेशला 56 धावांचं सोपं आव्हान मिळालं. हे आव्हान बांगलादेशने सहज गाठलं. बांगलादेशचा ऑस्ट्रेलियातील हा पहिलाच कसोटी विजय आहे. त्यामुळे त्याची इतिहासात नोंद झाली आहे.

बांगलादेशच्या विजयाचे हिरो कोण?

बांगलादेशच्या विजयाचा मुख्य हिरो ठरला तो हसन महमुद.. त्याने पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाची दाणादाण उडवून दिली. त्याने 6 विकेट घेतल्या आणि ऑस्ट्रेलियाला 198 धावांवर रोखलं. त्यानंतर पहिल्या डावात बांगलादेशकडून तन्झिद हसन तमीमचं शतक, नजमुल होसेने शांतोच्या 84 धावा आणि मेहिदी हसनच्या 65 धावांमुळे बांगलादेशी संघ मजबूत स्थितीत आला. दुसऱ्या डावात मेहिदी हसन मिराजने दाणादाण उडवून दिली. पाच विकेट घेऊन ऑस्ट्रेलियाला बॅकफूटवर ढकललं. तर हसन महमुद पुन्हा एकदा दुसऱ्या डावात चमकला आणि 3 विकेट काढल्या.

Follow Us
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह? बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल...
ऑपरेशन टायगर ॲक्टिव्ह! बुलढाणा असेल बालेकिल्ला अन् तब्बल... शिवसेनेच्या कोर्टातील निकालाआधीच मोठा बॉम्ब
ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
कल्याणमध्ये ब्लिंकिटच्या आईस्क्रीम क्रेटमध्ये उंदीर आढळल्याने अन्नसुरक्षेचा प्रश्न
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता...
मुंडे भाऊ-बहिण पुन्हा चर्चेत; थेट म्हणाले, आमच्यातील वाद आता... बीडच्या राजकारणात नेमकं काय घडतंय?
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस
पान मसाल्याच्या जाहिरातीवरून FDA ची तीन बॉलीवूड कलाकारांना नोटीस.
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'
'प्रत्येक बहिणीला वाटते एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत'-ज्योति वाघमारे
रस्त्यांच्या दुरवस्थेवर सुजय विखे आक्रमक
'ट्रम्प सारखा वेडा माणूस मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिला नाही'-सुजय विखे
१६ ऑगस्ट २०२६ च्या ठळक बातम्या: महिला आरक्षण, देशातील प्रमुख घडामोडी
१६ ऑगस्ट २०२६: महाराष्ट्रातील आणि देशातील प्रमुख घडामोडी
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक
मुंबई लोकल: मध्य आणि हार्बर मार्गांवर आज मेगाब्लॉक, प्रवाशांना उशीर
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार
इंडोनेशियामध्ये भूकंपाचा हाहाकार: एकाच दिवशी दोन मोठे धक्के
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती
चाकण एमआयडीसीतील उद्योजक आणि वाहतूक समस्या सोडवण्यासाठी समिती: सीएम फडणवीस