AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभव

UP Brij Stars, Big Cricket League Champion: यूपी बृज स्टार्सने अंतिम सामन्यात गुजरात डायमंड्सला पराभूत करून बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या जेतेपदावर नाव कोरलं. यूपी बृज स्टार्सने अंतिम सामन्यात गुजरात डायमंड्सला पाच धावांनी मात दिली.

BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभव
BCL 2026: यूपी बृज स्टार्सने पटकावलं जेतेपद, गुजरात डायमंड्स अंतिम सामन्यात पराभवImage Credit source: TV9 Network/Hindi
| Updated on: Jun 14, 2026 | 5:23 PM
Share

बिग क्रिकेट लीग स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वात जेतेपदाचा मानकरी ठरला तो यूपी बृज स्टार्स संघ… या स्पर्धेचा अंतिम सामना ग्रेटर नोएडाच्या शहीद विजय सिंह पथिक स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्य़े पार पडला. या सामन्यातक यूपी बृज स्टार्सने गुजरात डायमंड्सला पाच धावांनी पराभूत केलं. पण हा सामना यूपी बृज स्टार्सने सहज जिंकला नाही, तर विजयासाठी खूप घाम गाळावा. गुजरात डायमंड्सने शेवटच्या षटकांपर्यंत यूपी स्टार्सला विजयासाठी झुंजवलं. अखेर या अतितटीच्या सामन्यात यूपी बृज स्टार्सने 5 धावांनी विजय मिळवला. नाणेफेकीचा कौल गुजरात डायमंड्सच्या बाजूने लागला होता. त्यांनी प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि यूपी बृज स्टार्सला फलंदाजीचं निमंत्रण दिलं. यूपी बृज स्टार्सने 20 षटकात 8 गडी गमवून 166 धावा केल्या. यूपी बृज स्टार्सकडून चिराग गांधीने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 46 चेंडूत 76 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळे यूपी बृज स्टार्सचा विजय झाला असं म्हणायला हरकत नाही.

गुजरात डायमंड्सचा डाव

बिग क्रिकेट लीग टी20 स्पर्धेत यूपी बृज स्टार्सने विजयासाठी दिलेल्या 167 धावांचा पाठलाग करताना गुजरात डायमंड्स सघ फक्त 161 धावा करू शकला. हा सामना यूपी बृज स्टार्सने 5 धावांनी जिंकला. गुजरात डायमंड्सकडून जेसल कारियाने 40 चेंडूत 48 धावा केल्या. तर एडेला गुरूरत्नेने 25 चेंडूत 35 धावांची खेळी केली. पण विजयाच्या उंबरठ्यावर पोहोचू शकले नाहीत.

अंतिम सामन्यात बजर चॅलेंज

अंतिम सामन्यात काही रोमांचक असे बजर चॅलेंज पाहायला मिळेल. हार्दिकने दोन वेळा सलग तीन निर्धाव चेंडू टाकण्याचं चॅलेंज घेतलं. मनोजने 30 धावांचं चॅलेंज घेतलं होतं. तर विशाल गुर्जर आणि जतिन सैनीने तीन डॉट चेंडू टाकण्याचं आव्हान घेतलं. जतिन मावीने विकेट आणि तीन विकेटचं चॅलेंज स्वीकारलं. त्याने तीन विकेटचं चॅलेंज यशस्वीरित्या पूर्ण केलं आणि अंतिम फेरीत छाप सोडली.

अंतिम सामना पाहण्यासाठी मनोज तिवारी आणि किरेन रिजिजू यांच्यासारखे अनेक मान्यवर स्टेडियममध्ये उपस्थित होते. भाजप नेते मनोज तिवारी म्हणाले, “बिग क्रिकेट लीग देशभरातील उदयोन्मुख क्रिकेटपटूंसाठी एक उत्कृष्ट व्यासपीठ ठरली आहे. संपूर्ण स्पर्धेदरम्यान खेळाडूंचा जोश आणि स्पर्धात्मक वृत्ती प्रेरणादायी ठरली आहे. खेळाडूंना आपली क्षमता दाखवण्याची आणि आपली स्वप्ने साकार करण्याची अशी संधी मिळणे, ही त्यांच्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे.”

केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांच्या मते, “राष्ट्र उभारणीत खेळ महत्त्वाची भूमिका बजावतात आणि बिग क्रिकेट लीगसारखे उपक्रम तळागाळातील क्रीडा प्रतिभा जोपासण्यासाठी महत्त्वपूर्ण योगदान देतात. खेळाडू आणि प्रेक्षकांचा उत्साह भारताच्या सशक्त क्रीडा परिसंस्थेचे प्रतिबिंब आहे.” सोमेंद्र तोमर म्हणाले की, “बिग क्रिकेट लीग ही केवळ एक स्पर्धा नाही, तर क्रिकेट आणि क्रीडा उत्कृष्टतेचा एक उत्सव आहे. या अंतिम सामन्याने देशाच्या विविध भागांतील प्रतिभावान खेळाडूंना एकत्र आणले आहे, ज्यामुळे त्यांना मौल्यवान अनुभव आणि संधी मिळाल्या आहेत.”

Follow Us
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू
मोठी अपडेट! रोहित पवारांची तब्येत खालावली तर पत्नी कुंती यांना अश्रू अनावर, व्हिडीओ आला समोर
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद
ठाकरे गटाच्या बैठकीनंतर मोठी घडामोड! खासदार आष्टीकरांची पत्राकार परिषद अन् तो व्हिडीओ.. पहा नेमकं काय घडलं?
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळं
ठाकरे गटाची बैठक संपली; कोण उपस्थित कोण नॉट रिचेबल, संजय राऊतांनी सगळंच सांगितलं
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
NCP नेते जितेंद्र आव्हाड अचानक राज ठाकरेंच्या भेटीला; नेमकं कारण काय?
पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ व्हायरल
Pune News | पुण्यात पाणीटंचाई दूर व्हावी म्हणून थेट पर्जन्य यज्ञ; व्हिडीओ तुफान व्हायरल
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की...विवाहितेसोबत
बीड पुन्हा हादरलं! मारहाणीनंतर इतका रक्तस्त्राव झाला की... विवाहितेसोबत भयंकर घडलं; अनैतिक संबंधामुळे...
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा
मी आज ठाकरे सेनेत उद्या.. हिंट देऊन नेता नॉट रिचेबल; बैठकी आधीच 'उबाठा'त मोठा भुकंप?
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली
ठाकरेंच्या बैठकीआधी मोठं घडतंय! कोणी नॉट रिचेबल कोणी व्हर्च्युअली उपस्थिती; नेमकी भानगड काय?
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्र
मोठी बातमी! ठाकरेंच्या आणखी एका बड्या नेत्याचं तळ्यात-मळ्यात; 'मातोश्री'वरील बैठकीआधीच नॉट रिचेबल
40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेल्या गावाचे
Video | 40 वर्षानंतर 'कोयना'चं पाणी आटलं; 1952 साली पाण्याखाली गेलेलं गाव अवशेषांसह आलं वर; पहा व्हिडीओ