AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

IND vs PAK : इंग्लंडमध्ये स्मृतीला आऊट करणं पाकिस्तानसाठी अवघड, ओपनरला रेकॉर्ड ब्रेकची संधी, नक्की काय?

Smriti Mandhana, India vs Pakistan : स्मृती मंधाना हीने आतापर्यंत पाकिस्तान विरुद्ध टी 20i क्रिकेटमधील 10 डावांत बॅटिंग केली आहे. मात्र स्मृती पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडमध्ये खेळलेल्या सामन्यात एकदाही आऊट झालेली नाही.

IND vs PAK : इंग्लंडमध्ये स्मृतीला आऊट करणं पाकिस्तानसाठी अवघड, ओपनरला रेकॉर्ड ब्रेकची संधी, नक्की काय?
Smriti Mandhana Team IndiaImage Credit source: PTI
| Updated on: Jun 14, 2026 | 5:19 PM
Share

आयसीसी वुमन्स टी 20i वर्ल्ड कप 2026 स्पर्धेला 12 जूनपासून सुरुवात झाली. तर आज 14 जूनपासून टीम इंडिया हरमनप्रीत कौर हीच्या नेतृत्वात वर्ल्ड कप मोहिमेची सुरुवात करण्यासाठी सज्ज आहे. टीम इंडिया या मोहिमेतील आपल्या पहिल्या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध 2 हात करणार आहे. सामन्याला संध्याकाळी बर्मिंगहॅममधील एजबेस्टन स्टेडियममध्ये 7 वाजता सुरुवात होणार आहे. क्रिकेट चाहत्यांना या सामन्याची प्रतिक्षा लागून आहे. मात्र अवघ्या काही तासांमध्ये चाहत्यांची ही प्रतिक्षा संपणार आहे. या सामन्यात टीम इंडियाची ओपनर स्मृती मंधाना हीच्या कामगिरीकडे लक्ष असणार आहे.

स्मृतीला या पहिल्याच सामन्यात मोठा विक्रम करण्याची संधी आहे. तसेच स्मृती इंग्लंडमध्ये पाकिस्तान विरुद्ध एकदाही आऊट झालेली नाही. तसेच स्मृतीने पाकिस्तान विरुद्धची सर्वात मोठी खेळी इंग्लंडमध्येच केली आहे. त्यामुळे स्मृतीला रोखण्याचं मोठं आव्हान पाकिस्तानसमोर असणार आहे.

स्मृतीची पाकिस्तान विरुद्धची आकडेवारी

स्मृतीने पाकिस्तान विरुद्ध 10 टी 20i सामन्यांमधील 10 डावांत 239 धावा केल्या आहेत. तसेच स्मृती भारत-पाकिस्तान सामन्यांत सर्वाधिक टी 20i धावा करणारी सक्रीय फलंदाज आहे. त्यामुळे स्मृतीकडे स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात मोठी खेळी करुन भारत-पाकिस्तान टी 20i सामन्यांत सर्वाधिक धावा करणारी फलंदाज हा बहुमान मिळवण्याची संधी आहे.

स्मृतीच्या निशाण्यावर मिताली राजचा विक्रम

भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी 20i सामन्यांमध्ये सर्वाधिक 315 धावांचा विक्रम हा माजी कर्णधार मिताली राज हीच्या नावावर आहे. स्मृतीला हा रेकॉर्ड आपल्या नावावर करण्यासाठी 77 धावांची गरज आहे. स्मृतीने पाकिस्तान विरुद्ध 1 मोठी खेळी केल्यास तिच्या नावावर हा विक्रम होऊ शकतो. तसेच स्मृतीने हा विक्रम केल्यास भारत विरुद्ध पाकिस्तान यांच्यातील टी 20i सामन्यांत ती 300 पेक्षा अधिक धावा करणारी एकूण आणि दुसरी भारतीय फलंदाज ठरेल.

पाकिस्तान स्मृतीला आऊट करणयात अपयशी

दरम्यान पाकिस्तानचे गोलंदाज स्मृती मंधाना हीला इंग्लंडमध्ये आऊट करण्यात अपयशी ठरले आहेत. स्मृती पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडमध्ये आतापर्यंत एका डावात खेळली आहे. स्मृतीने 2022 साली खेळलेल्या एकमेव डावात नाबाद 63 धावा केल्या होत्या. त्यामुळे स्मृती पाकिस्तान विरुद्ध इंग्लंडमध्ये 4 वर्षांआधी केलेला सर्वात मोठ्या धावांचा आपलाच विक्रम मोडीत काढण्यात यशस्वी ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Follow Us
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
आठ दिवसांत कांदा दुपटीने महागला, लसूणही २०० रुपये किलोपर्यंत पोहोचला
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
साखरेच्या दरात मोठी वाढ; सणासुदीत सर्वसामान्यांच्या खिशाला फटका
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील ठाम; 29 ऑगस्टचे आंदोलन निर्णायक होणार...
आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब
Chandrashekhar Bawankule : आगामी निवडणुका एकत्र लढण्यावर शिक्कामोर्तब, बावनकुळेंनी दिली महायुती बैठकीची माहिती
विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
'विद्यार्थी भीक नाही हक्क मागतायत', पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणावरून राहुल गांधींचं फडणवीसांना उद्देशून ट्विट
धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
Dharashiv | धाराशिवमध्ये ठाकरेंना धक्का; 4 नगरसेवक भाजपमध्ये प्रवेश करणार
निधीवरुन मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा काढला जाणार
महायुतीच्या समन्वय समितीची बैठक: निधीवरून मतभेद झाल्यास आयुक्तांमार्फत तोडगा, फडणवीस-शिंदेंकडे अंतिम निर्णय
पुण्यात राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीने मांडले आदिवासींचे प्रश्न
Rahul Gandhi : राहुल गांधींसमोर विद्यार्थीनीनं आदिवासींच्या समस्यांचा पाढा वाचला
नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी नवी इलेक्ट्रिक बुलेटप्रूफ कार ताफ्यात दाखल
खान्देशात कानबाई विसर्जन २०२४; उत्साही सोहळा
खान्देशात कानबाई मातेचं विसर्जन: लोकसंस्कृतीचा उत्साही सोहळा