AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयपीएल स्पर्धेपूर्वी बीसीसीआयचा नियम मोडला, कर्णधारानंतर या खेळाडूवर होणार कारवाई

आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी आता अंतिम टप्प्यात आली आहे. मात्र या स्पर्धेपूर्वी एका खेळाडूने नियमाचं उल्लंघन केलं आहे. त्यामुळे त्याच्यावर बंदीची टांगती तलवार आहे. जर तसं झालं तर दोन वर्षांची बंदी लागणार हे निश्चित आहे.

आयपीएल स्पर्धेपूर्वी बीसीसीआयचा नियम मोडला, कर्णधारानंतर या खेळाडूवर होणार कारवाई
आयपीएल स्पर्धेपूर्वी बीसीसीआयचा नियम मोडला, कर्णधारानंतर या खेळाडूवर होणार कारवाईImage Credit source: PTI
| Updated on: Mar 24, 2026 | 10:02 PM
Share

आयपीएल 2026 स्पर्धेसाठी आता फक्त 4 दिवसांचा अवधी शिल्लक आहे. असं असताना प्रत्येक फ्रेंचायझी जेतेपदाच्या दृष्टीने रणनिती आखत आहे. असं असताना दिल्ली कॅपिटल्स संघाला या स्पर्धेच्या चार दिवसाआधी मोठा धक्का बसला आहे. कारण या संघाच्या मॅच विनर आणि सलामीसाठी निश्चित असलेल्या खेळाडूने माघार घेतली आहे. इंग्लंडचा ओपनर बेन डकेटने अचानकपणे या स्पर्धेत खेळणार नसल्याचं सांगितलं आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सची ऐनवेळी धावाधाव सुरू झाली आहे. कारण बेन डकेटमुळे तितक्याच ताकदीचा सलामीवीर उतरवणं कठीण होईल. मागच्या वर्षी झालेल्या लिलावात दिल्ली कॅपिटल्सने बेन डकेट्सला 2 कोटींच्या बेस प्राइसवर घेतलं आहे. तसेच त्याचं प्लेइंग 11 मधील स्थानही पक्कं मानलं जात होतं.असं असताना बीसीसीआय आता या खेळाडूवर कारवाईचा बडगा उचलू शकते.

बेन डकेटच्या या निर्णयामुळे त्याच्यावर कारवाई होणार हे निश्चित आहे. कारण बीसीसीआयने 2024 पर्वानंतर विदेशी खेळाडूंसाठी एक नियमावली तयार केली होती. आयपीएल लिलावात बोली लागली आणि त्यानंतर स्पर्धेपूर्वी त्याने माघार घेतली तर त्या खेळाडूवर कारवाई केली जाईल. त्या खेळाडूवर दोन वर्षांची बंदी घातली जाईल. या दरम्यान खेळाडू लिलावातही भाग घेऊ शकत नाही. बेन डकेट आता 2026 स्पर्धेत तर खेळणार नाही. तसेच त्याला 2027 आणि 2028 स्पर्धेत भाग घेता येणार नाही. आता त्याला थेट 2029 मध्ये खेळता येणार आहे. पण त्यातही त्याचा फॉर्म चांगला असेल तर ठीक.. नाही तर कधीच खेळू शकणार नाही.

आयपीएल स्पर्धेतून अचानक माघार घेण्याचा निर्णय यापूर्वी इंग्लंडचा वनडे आणि टी20 कर्णधार हॅरी ब्रूकने घेतला होता. त्याने आयपीएल 2025 स्पर्धा सुरू होण्यापूर्वी हा निर्णय घेतला होता. त्यामुळे त्याच्या दोन वर्षांनी बंदी घालण्यात आली आहे. 2025 स्पर्धेत खेळला नाही. आता त्याला 2026 आणि 2027 स्पर्धेत भाग घेता येणार नाही. त्याला आता 2028 मध्ये भाग घेता येईल. योगायोग म्हणजे हॅरी ब्रूकसाठी दिल्ली कॅपिटल्सने पैसे मोजले होते. तेव्हा त्याने टीमची फसवणूक केली. आता इंग्लंडच्या बेन डकेट्सने तसंच केलं. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्स भविष्यात इंग्लंडच्या खेळाडूंना विकत घेताना दहा वेळा विचार करेल.

Follow Us
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा
उद्धव ठाकरेंचा विधानपरिषदेचा शेवटचा दिवस, एकनाथ शिंदेंकडून शुभेच्छा.
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती....
भोंदूबाबाच्या संपत्तीबाबात फडणवीसांचा मोठा खुलासा, एकूण संपत्ती.....
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी
खरातकडून फोटो व्हायरल होण्याची धमकी देत पाच कोटींच्या खंडणीची मागणी.
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती
5 नरबळी, हरणाची शिकार, अशोक खरात प्रकरणात धक्कादायक माहिती.
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती
भोंदूबाबा अशोक खरातच्या तपासाला वेग, सरकारी वकिलांची नियुक्ती.
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या
दरवाज्यात अडकून जखमा? चाकणकर-तटकरेेंचे नाव घेत सुषमा अंधारे म्हणाल्या.
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष
हॉटेलसाठी फक्त एक व्यावसायिक LPG सिलेंडर; प्रशासनाने ठरवले निकष.
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार
ज्या भुयारी खोलीत महिलांच्या किंकाळ्या घुमल्या, भोंदूबाबाकडून अत्याचार.
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले....
बोटाला जखम कशी झाली? सुनील तटकरे पहिल्याांदा बोलले, म्हणाले.....
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत
लोकशाहीचा खून झाला म्हणणाऱ्यांचेच हात रक्ताने माखलेत.