चेन्नई सुपर किंग्सचा पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

चेन्नई सुपर किंग्सचा पुलवामा शहिदांच्या कुटुंबियांना मदतीचा हात

चेन्नई : चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) त्यांच्या होम ग्राउंडवर होणाऱ्या आयपीएलच्या पहिल्या सामन्याचं उत्पन्न पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांच्या कुटुंबांना देणार आहे. संघाचा कर्णधार महेंद्र सिंग धोनी हा मदत निधीचा चेक शहिदांच्या कुटुंबियांना देईल.

आयपीएलच्या 12 व्या सीझनचा पहिला सामना गेल्या वर्षीचा विजयी संघ चेन्नई सुपर किंग्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु यांच्यामध्ये खेळला जाणार आहे. येत्या शनिवारी 23 मार्चला चेन्नईच्या एमए चिदंबरम मैदानावर सामना खेळला जाणार आहे.

चेन्नई सुपर किंग्सचे संचालक राकेश सिंग यांनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली. “या सामन्याच्या तिकीट विक्रीतून मिळणारं उत्पन्न पुलवामा हल्ल्यातील शहिदांच्या कुटुंबियांना देण्यात येणार आहे. कर्णधार महेंद्र सिंग धोनी शहिदांच्या कुटुंबियांना चेक प्रदान करतील.” आयपीएलच्या या पहिल्या सामन्याच्या तिकिटांची विक्री सुरु होताच काहीच तासात सर्व तिकिटं विकल्या गेली आहेत.

यापूर्वी किंग्स इलेवन पंजाबने (KXIP) फेब्रुवारी महिन्यात पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या पंजाब आणि हिमाचल प्रदेशच्या पाच जवानांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 5 लाखांची मदत केली होती.

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI