AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Commonwealth Games 2022 Medal Tally: राष्ट्रकुल स्पर्धेत भारत टॉप-10 मध्ये, ऑस्ट्रेलिया नंबर वन, पदकतालिकेत इतर देश कोणत्या स्थानी? जाणून घ्या…

Commonwealth Games 2022 Medal Tally : ऑस्ट्रेलिया 13 सुवर्णांसह एकूण 32 पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सुवर्ण आणि एकूण पदकांमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या यशाचे एक मोठे कारण नेहमीप्रमाणे जलतरण आहे.

Commonwealth Games 2022 Medal Tally: राष्ट्रकुल स्पर्धेत भारत टॉप-10 मध्ये, ऑस्ट्रेलिया नंबर वन, पदकतालिकेत इतर देश कोणत्या स्थानी? जाणून घ्या...
मीराबाई चानूने भारतासाठी सुवर्णपदक जिंकले.Image Credit source: tv9
| Updated on: Jul 31, 2022 | 9:18 AM
Share

नवी दिल्ली : बर्मिंगहॅम कॉमनवेल्थ गेम्स 2022 (Commonwealth Games 2022)चा काल दुसरा दिवस पूर्ण झाला आहे. भारतानेही आपलं खातं उघडलं आहे. शनिवारी 30 जुलैला खेळांच्या दुसऱ्या दिवशी भारतानं वेटलिफ्टिंगच्या मदतीने सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदक जिंकलं. अशा प्रकारे भारतीय संघानं पदकतालिकेतही (Commonwealth Games 2022 Medal Tally) प्रवेश केला. त्याचबरोबर अपेक्षेनुसार ऑस्ट्रेलियानं पहिलं स्थान कायम राखलं आहे. जलतरणाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने एकूण 13 सुवर्णपदकांसह अव्वल स्थानावर चांगली आघाडी मिळवली आहे. शनिवारी भारताने (India) वेटलिफ्टिंगच्या (Weightlifting) चारही स्पर्धांमध्ये पदकांसह पदार्पण केले. भारताने आतापर्यंत 1 सुवर्ण, 2 रौप्य आणि 1 कांस्य पदके जिंकली आहेत. अशाप्रकारे भारताने टॉप 10 मध्ये आपले स्थान निश्चित केले असून सध्या ते आठव्या स्थानावर आहे. स्टार वेटलिफ्टर मीराबाई चानूने 49 किलो गटात भारतासाठी एकमेव सुवर्णपदक जिंकले.

ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर

ऑस्ट्रेलिया 13 सुवर्णांसह एकूण 32 पदकांसह पहिल्या क्रमांकावर आहे. सुवर्ण आणि एकूण पदकांमध्ये ऑस्ट्रेलिया पहिल्या क्रमांकावर आहे. ऑस्ट्रेलियाच्या यशाचे एक मोठे कारण नेहमीप्रमाणे जलतरण आहे. ज्यामध्ये त्यांना 8 सुवर्णांसह एकूण 22 पदके मिळाली आहेत. न्यूझीलंड दुसऱ्या स्थानावर असून यजमान इंग्लंड तिसऱ्या स्थानावर आहे. दुसऱ्या दिवसाच्या अखेरपर्यंत एकूण 115 पदकांचे वितरण करण्यात आले असून त्यात 22 देशांनी आपले खाते उघडले आहे. या 115 पदकांपैकी 39 सुवर्ण, 39 रौप्य आणि 37 कांस्य पदके जिंकली आहेत.

पदतालिका पाहा

हे भारताचे पदकविजेते

संकेत सरगरने भारतासाठी पहिले पदक जिंकले. 21 वर्षीय वेटलिफ्टरने 55 किलो गटात रौप्य पदक जिंकले. यानंतर गुरुराजा पुजारीने पुरुषांमध्ये 61 किलो गटात कांस्यपदक जिंकले. मीराबाई चानूला तिसरे पदक आणि सर्वात मोठे यश मिळाले. टोकियो ऑलिम्पिक पदक विजेती मीराबाईने सलग दुसऱ्या खेळात सुवर्ण आणि सलग तिसरे पदक जिंकून तिची यशोगाथा सुरू ठेवली. त्यानंतर दिवसाच्या शेवटच्या स्पर्धेत बिंदियारानीने महिलांच्या 55 ​​किलोमध्ये 202 किलो वजनासह रौप्यपदक जिंकले आणि भारतासाठी दिवसाचा शेवट चांगला केला.

बिंदियाची चमक

बिंदियानं या फेरीत खरं आश्चर्य दाखवलं. या फेरीत तिनं कोणत्याही वेटलिफ्टरपेक्षा जास्त वजन उचललं. बिंदियानं 110 किलो वजन उचलून यशस्वी सुरुवात केली परंतु दुसऱ्या प्रयत्नात 114 किलो वजन उचलण्यात ती अपयशी ठरली. मात्र, असं असूनही तिनं हार मानली नाही. यावेळी ती तिसऱ्या स्थानावर होती. पहिल्या स्थानावर येण्यासाठी त्याला 8 किलो वजन उचलावे लागलं. तर दुसऱ्या स्थानावर येण्यासाठी तिला 3 किलो वजन उचलावं लागलं.

डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?
डोंबिवलीत मराठी मुलीच्या एकाच स्टॉलवर कारवाई, नेमकं काय घडलं?.
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर
मालाडमध्ये प्राध्यापक आलोक सिंग यांची हत्या, सीसीटीव्ही फुटेज समोर.
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप
संजय राऊतांचा न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्यावर खटल्यात दिरंगाईचा आरोप.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक; काय असणार रेल्वेचं वेळापत्रक.
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी
मुंबईत बिहार भवनवरुन बिहारच्या मंत्र्याची चिथावणी.
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका
महापौरपदाचा विषय 'सूनबाई' आणि 'नवरी'पर्यंत!; संजय राऊतांची टीका.
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी
नाशिकच्या सिंहस्थ कुंभमेळ्याच्या कामावर साधू महंतांची नाराजी.
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट
मुंबईला नवा महापौर कधी मिळणार? तारखेबाबत मोठी अपडेट.
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात
शेतकरी संकटात, बदलत्या हवामानामुळे रब्बी हंगामातील पिके धोक्यात.
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक
परप्रांतीयांना मुभा, मराठी माणसावर कारवाई... डोंबिवलीत मनसे आक्रमक.