CWG 2022 Live Updates: Weightlifting मध्ये विकास ठाकूरला रौप्यपदक

| Updated on: Aug 03, 2022 | 12:11 PM

कॉमनवेल्थ गेम्स लाइव: भारताने सध्या 9 मेडल्स जिंकली आहेत. पदक तालिकेत भारत 6 व्या स्थानावर आहे.

CWG 2022 Live Updates: Weightlifting मध्ये विकास ठाकूरला रौप्यपदक
भारतीय महिला टीम

कॉमनवेल्थ गेम्स (CWG) लेटेस्ट न्यूज: भारतीय खेळाडूंनी राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आतापर्यंत चांगली कामगिरी केली आहे. नऊ मेडल्स जिंकली आहेत. आजही भारताच्या खात्यात जास्तीत जास्त पदकं जमा होतील, अशी अपेक्षा आहे. लॉन बॉल्स मध्ये भारतीय महिला टीमने पदक निश्चित केलं आहे. ते आज फायनल मध्ये खेळतील. दक्षिण आफ्रिकेला हरवून सुवर्णपदक जिंकण्याचा त्यांचा प्रयत्न असेल.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 02 Aug 2022 10:22 PM (IST)

    Weightlifting: विकास ठाकूरने मिळवलं रौप्यपदक

    भारताच्या विकास ठाकूरने 96 किलो वजनीगटात रौप्यपदक जिंकलं आहे. त्याने स्नॅच मध्ये 155 किलो वजन उचललं. त्यानंतर क्लीन अँड जर्क मध्ये 191 किलो वजन उचललं. एकूण 346 किलो वजनासह तो दुसऱ्या स्थानावर राहिला. समोराच्या डॉन ओपलोगने गोल्ड मेडल मिळवलं.

  • 02 Aug 2022 09:19 PM (IST)

    टेबल टेनिसमध्ये भारताने जिंकले आणखी एक गोल्ड मेडल

    भारताने २०१८च्या गोल्ड कोस्टमध्ये कॉमनवेल्थ गेम्समध्ये या इव्हेंटमध्ये दुसऱ्यांदा गोल्ड मिळवले होते. आता तिसऱ्यांदा हे गोल्ड मिळवण्याची कामगिरी भारताने केली आहे. २०१८ सालाप्रमाणेच यावेळीही भारतीय टीममध्ये अंचरता शरत कम, जी साथीयन, हरमीत देसाई आणि सुनील शेट्टी होते.

  • 02 Aug 2022 07:42 PM (IST)

    भारत पदकतालिकेत सहाव्या स्थानावर

    10 मेडल्ससह भारत सध्या पदकतालिकेत सहाव्या स्थानावर आहे. चार सुवर्ण, 3 रौप्य आणि 3 ब्राँझ मेडल्स भारताने मिळवली आहेत.

  • 02 Aug 2022 06:56 PM (IST)

    भारतीय महिला टीमचा ऐतिहासिक विजय

    ऐतिहासिक. भारतीय महिला टीमने पहिल्यांदाच Lawn Bowl मध्ये गोल्ड मेडल जिंकलं आहे. भारताने दक्षिण आफ्रिकेवर 17-10 असा विजय मिळवला.

  • 02 Aug 2022 06:45 PM (IST)

    लॉन बॉल फायनल, भारताची पुन्हा आघाडी

    भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये लॉन बॉलची फायनल सुरु आहे. 14 व्या एन्ड मध्ये भारतीय संघाने 3 पॉइंटस मिळवले आहेत. भारताची आता दक्षिण आफ्रिकेवर 15-10 अशी आघाडी झाली आहे.

  • 02 Aug 2022 06:42 PM (IST)

    टेबल टेनिस फायनल

    टेबल टेनिस फायनल: भारताची सिंगापूरवर 1-0 आघाडी.

  • 02 Aug 2022 06:29 PM (IST)

    टेबल टेनिसची फायनल सुरु

    पुरुष दुहेरीत भारत आणि सिंगापूर मध्ये टेबल टेनिसची फायनल सुरु आहे.

  • 02 Aug 2022 06:25 PM (IST)

    Lawn Bowl: IND vs SA: 10-10 दोन्ही टीम्स बरोबरीत

    12 व्या राऊंड नंतर भारताने पुनरागमन केलं आहे. दोन्ही संघांचे स्कोर आता 10-10 असे बरोबरीत आहेत.

  • 02 Aug 2022 06:03 PM (IST)

    Lawn Bowl: IND vs SA: 8-8 बरोबरी

    भारत आणि दक्षिण आफ्रिकेमधील अंतिम सामना रोमांचक झाला आहे. 10 व्या राऊंड नंतर दक्षिण आफ्रिकेने 8-8 अशी बरोबरी केली आहे.

  • 02 Aug 2022 05:30 PM (IST)

    द्युती चंद चौथ्या स्थानावर

    एथलॅटिक्स: महिलांच्या धावण्याच्या 100 मीटर शर्यतीत राऊंड 1 मध्ये भारताच्या द्युती चंदला चौथ्या स्थानावर समाधान मानाव लागलं. ती सेमी फायनलसाठी प्रवेश करण्यात अपयशी ठरली.

  • 02 Aug 2022 05:26 PM (IST)

    CWG 2022 Live भारत गोल्ड मेडल जिंकण्याच्याजवळ

    लॉन बॉल मध्ये भारतीय महिला संघ इतिहास रचण्याच्या जवळ पोहोचला आहे. तिसऱ्या राऊंड मध्ये स्कोर बरोबरीत होता. त्यानंतर महिला संघाने आघाडी वाढवायला सुरुवात केली. आता 6 राऊंड नंतर स्कोर 7-2 आहे. म्हणजे मजबूत आघाडी आहे.

  • 02 Aug 2022 04:56 PM (IST)

    ज्या शिवसैनिकांनी अडीच वर्षे त्रास भोगला आहे, एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावला जाणार नाही; मुख्यमंत्री शिंदे

    - ज्या शिवसैनिकांनी अडीच वर्षे त्रास भोगला आहे, एकाही शिवसैनिकाच्या केसाला धक्का लावला जाणार नाही

    - राज्याला कुठेही पैसा कमी पडू देणार नाही, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आश्वासन

    - आम्ही अडीच वर्षांपूर्वी जे केले ते आता केलं

    - बाळासाहेबांच्या विचारांचे सरकार आणायला पाहिजे होते ते आम्ही केलं

    - मग विश्वासघात कुणी केला आम्ही केला का हे जनता ठरवेल

  • 02 Aug 2022 04:55 PM (IST)

    CWG 2022 Live भारत आणि दक्षिण आफ्रिकेत अटी-तटीचा सामना

    भारत आणि दक्षिण आफ्रिकेत लॉन बॉलची फायनल सुरु आहे. अटी-तटीचा सामना सुरु आहे. तिसऱ्या राऊंड नंतर दोन्ही टीम्स 2-2 अशा बरोबरीत आहेत. पहिल्या राऊंड मध्ये भारताने आघाडी मिळवली होती. पण दुसऱ्या राऊंड मध्ये दक्षिण आफ्रिकेने आघाडी घेतली. तिसऱ्या राऊंड मध्ये भारताने बरोबरी साधली.

  • 02 Aug 2022 04:22 PM (IST)

    Shotput: मनप्रीत कौर फायनलमध्ये

    भारताच्या मनप्रीत कौरने महिला शॉटपुटच्या फायनलसाठी क्वालिफाय केलं आहे. 16.78 मीटरचा तिचा बेस्ट थ्रो होता. ती सातव्या स्थानावर होती.

  • 02 Aug 2022 04:17 PM (IST)

    उद्धवसाहेब तुम्हाला एसटी स्टँडसाठी बारामतीला देण्यासाठी 200 कोटी होते, मग पाणी पुरवठा योजनेसाठी का पैसे दिले नाहीत; विजय शिवतारेंची टीका

    - उद्धवसाहेब तुम्हाला एसटी स्टँडसाठी बारामतीला देण्यासाठी 200 कोटी होते, मग पाणी पुरवठा योजनेसाठी का पैसे दिले नाहीत

    - उद्धवसाहेब तुम्ही मतदारांचा अपमान केला।

    - भाईंच्या रूपाने देव मिळला, पुढच्या अडीच वर्षे काय झालं असतं माहीत नाही

    - महाविकास आघाडीचे नतद्रष्ट सरकार होते

    - यांनी जे 3 वर्षात अन्याय केला भाईंनी ते 30 दिवसात मिटवला

    - मावळमध्ये मी काम केलं त्यानंतर अजित पवारांनी भर सभेत विजय शिवातरे कसा निवडून येतो बघतोच म्हणालेत

    - संजय राऊत आणि मिर्लेकर यांनी हवेलीत पैसे घेतले आणि पालिका निवडणुकीत चुकीचा माणसाला तिकीट दिलं

  • 02 Aug 2022 04:00 PM (IST)

    वेटलिफ्टिंग: पूनम यादव फेल

    पूनम यादव पूर्णपणे फेल झाली आहे. क्लीन अँड जर्क मध्ये तीन पैकी एकाही प्रयत्नात ती यशस्वी झाली नाही.

  • 02 Aug 2022 03:49 PM (IST)

    लांब उडी: अनस फायनल मध्ये

    पुरुषांच्या लांब उडीत भारताचा मोहम्मद अनस याहियाने 7.68 मीटर अंतरावर उडी मारली. त्याने अंतिम फेरीत प्रवेश केलाय. त्याने आपल्या हीट मध्ये तिसरं स्थान मिळवलं.

  • 02 Aug 2022 03:32 PM (IST)

    जलतरण: श्रीहरी नटराज तिसऱ्या स्थानावर

    जलतरणात श्रीहरी नटराजने 200 मीटर बॅकस्ट्रोक मध्ये तिसरं स्थान मिळवलं.

  • 02 Aug 2022 03:19 PM (IST)

    लांब उडी मध्ये भारताचा श्रीशंकर अंतिम फेरीसाठी पात्र

    भारताच्या श्रीशंकरने 8.05 मीटर लांब उडी मारली. पुरुषांच्या लांब उडी मध्ये अंतिम फेरीसाठी तो पात्र ठरलाय.

  • 02 Aug 2022 03:17 PM (IST)

    लॉन बॉल मध्ये भारताला आघाडी

    महिला ट्रिपल्स मध्ये भारतीय टीमने न्यूझीलंडवर 13 राऊंडस संपल्यानंतर 12-8 अशी आघाडी घेतली आहे.

  • 02 Aug 2022 03:17 PM (IST)

    विकासकामांसाठी शासन पाठीशी, जनहिताची कामे थांबणार नाहीत- मुख्यमंत्री एकनाथ शिेंदे

    पुणे विभागातील जनहिताच्या विकासकामांसाठी कोणत्याही प्रकारे निधीची कमतरता भासू दिली जाणार नाही.

    जनतेच्या कामांसाठी क्रियान्वयनातील टप्पे कमी करून विकासकामे वेगाने पूर्ण करावी.

    विकासकामांसाठी प्रशासनाला शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील

    पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात पाऊस, अतिवृष्टी, पीक पाहणी आणि विकासकामांबाबत आयोजित आढावा बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचना

    पूरग्रस्त भागातील नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम त्वरित पूर्ण करावे.

    शासनाच्या मदतीपासून कुणीही वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी.

    दरड प्रवण गावातील तात्पुरते स्थलांतर केलेल्या नागरिकांना सर्व प्रकारच्या मूलभूत सुविधा देण्यात याव्यात.

    प्राणहानी व घरांच्या नुकसानीची भरपाई देण्याबाबत आवश्यक निधीची मागणी करण्यात यावी

  • 02 Aug 2022 03:15 PM (IST)

    वेटलिफ्टिंग: खराब सुरुवातीनंतर पूनमच पुनरागमन

    पूनम 76 किलो वजनी गटात चांगली सुरुवात करु शकली नाही. ती 95 किलो वजन उचलण्याच्या पहिल्या प्रयत्नात अयशस्वी ठरली. तिसऱ्या प्रयत्नात तिने 98 किलो वजन उचललं.

Published On - Aug 02,2022 3:12 PM

Follow us
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट
2017 ला कुठे बैठक झाली? हे सांगू शकतो, मुंडेंचा पवारांबाबत गौप्यस्फोट.
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि...
मतदान करावं म्हणून न्हाव्याची भन्नाट ऑफर, बोटावरची शाई दाखवा आणि....
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण
बूथवर मतदारांच्या रांगा अन् मतदान बंद ठेऊन कर्मचारी करतायत जेवण.
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा
म्हातार लय खडूस, तिजोरीची किल्ली कंबरेला.., शरद पवारांवर कुणाचा निशाणा.
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?
मतदारच नाही, मतदान केंद्र पडली ओस; मतदारांचा मतदानावर का बहिष्कार?.
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप
हे मोदीकृत भाजपाचे षडयंत्र, EVM वर शंका व्यक्त करत राऊतांचा गंभीर आरोप.
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या..
राणा दाम्पत्याची बुलेटस्वारी, किती मतांनी विजय? नवनीत राणा म्हणाल्या...
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान
दुसऱ्या टप्प्यात अनोख्या मतदाराची चर्चा, थेट माकड कडेवर घेऊन केल मतदान.
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?
पुन्हा मरायला तयार... मतदानासाठी निघालेले जरांगे पाटील काय म्हणाले?.
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल
हातांची झोळी केली...सोपे नव्हते मला हरविणे म्हणून...तुपकरांचा हल्लाबोल.