कोरोनाबाधित बापासाठी चिमुकल्या लेकीचा खास मेसेज, मेसेज वाचून बापही गहिवरला, म्हणतो, ‘हे माझं संपूर्ण जग…!’

ऋद्धिमान साहाने आपल्या लेकीने काढलेलं एक स्केच ट्विटरवर शेअर केलं आहे. या स्केचमध्ये चिमुकल्या मियाने आपल्या बापाला सुपरमॅनची उपमा देत तो कोरोना व्हायरसची लढत असल्याचं दाखवलं आहे. (Corona Positive SRH Wriddhiman Saha Received Special Message From Daughter)

कोरोनाबाधित बापासाठी चिमुकल्या लेकीचा खास मेसेज, मेसेज वाचून बापही गहिवरला, म्हणतो, 'हे माझं संपूर्ण जग...!'
कोरोनाबाधित बापासाठी लेकीचा खास मेसेज...

मुंबई :  आयपीएलमधील (IPL) सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hydrabad) संघाचा विकेट कीपर फलंदाज ऋद्धिमान साहाला (Wriddhiman Saha) कोरोनाची लागण झाली आहे. बायो बबसमध्ये असताना देखील कोरोनाने एन्ट्री करत ऋद्धिमान साहाला घेरलं आहे. सद्य स्थितीत आयपीएल स्पर्धा स्थगित करण्यात आलेली आहे तर कोरोनाबाधित साहावर उपचार सुरु आहेत. साहाच्या चिमुकल्या लेकीने बापाला बरं वाटावं म्हणून खास संदेश पाठवला आहे. तो संदेश वाचून वृद्धिमान साहाला गहिवरायला झालं. (Corona Positive SRH Wriddhiman Saha Received Special Message From Daughter)

चिमुकल्या लेकीचा बापासाठी मेसेज

कोरोनाबाधित साहावर सध्या उपचार सुरु आहेत. तो उपचारांना योग्य प्रतिसाद देतोय. अशातच त्याला लवकर बरं वाटावं म्हणून त्याचे सहकारी खेळाडू तसंच क्रिकेटप्रेमी त्याला शुभेच्छा देत आहेत. मात्र या सगळ्यात एका मेसेजने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलंय. तो मेसेज आहे साहाची चिमुकली लेक मियाचा…!

बाबा, लवकर बरा हो…

ऋद्धिमान साहाने आपल्या लेकीने काढलेलं एक स्केच ट्विटरवर शेअर केलं आहे. या स्केचमध्ये चिमुकल्या मियाने आपल्या बापाला सुपरमॅनची उपमा देत तो कोरोना व्हायरसची लढत असल्याचं दाखवलं आहे. त्याचबरोबर स्केचच्या वरच्या भागात बापाला लवकर बरं होण्यासाठी Get Well Soon Baba अशा शब्दात शुभेच्छाही दिल्या आहेत.

लेकीच्या स्केचने बाप गहिवरला

चिमुकल्या लेकीने साहाला बरं वाटावं म्हणून खास संदेश पाठवला. तो संदेश वाचून वृद्धिमान साहाला गहिवरायला झालं. सध्याच्या प्रसंगी हीच माझी संपूर्ण दुनिया आहे. मियाने बरं होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तुम्हा सगळ्यांच्या शुभेच्छांसाठी धन्यवाद, आपल्या सगळ्यांचे आभार!

बायो बबलमध्ये असतानाही कोरोनाची लागण

मंगळवारी 4 मे रोजी ऋद्धिमान साहाला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं. सद्यस्थितीत साहा आयपीएलच्या मेडिकल फॅसिलिटीच्या आयसोलेशनमध्ये आहे. बायो बबलमध्ये असताना देखील त्याला कोरोनाची लागण झाली.

ऋद्धिमान साहा केवळ 2 सामने खेळला

आयपीएलच्या 14 व्या पर्वात साहा केवळ 2 सामने खेळला. साहा सनरायजर्स हैदराबादकडून खेळताना विकेट कीपिंग तसंच डावाची सुरुवात करतो. सध्या साहाचा फॉर्म ठीक नाहीय. त्यामुळे संघाने त्याला अंतिम 11 मधून वगळलं होतं. परंतु यंदाच्या मोसमात त्याने 2 सामने खेळले होते.

(Corona Positive SRH Wriddhiman Saha Received Special Message From Daughter)

हे ही वाचा :

आयपीएल सुरु झाल्यानंतर पुन्हा ‘पिवळं प्रेम’, चेन्नईची जर्सी परिधान केलेली ही महिला क्रिकेटपटू कोण?

बायो बबलला रामराम करत खेळाडूंचा ‘मोकळा श्वास’, विराट अनुष्काचे घरी परततानाचे फोटो व्हायरल

चहलची पत्नी धनश्रीला आयपीएलची आठवण, खास फोटो शेअर करत लिहिला इमोशनल मेसेज!

Published On - 9:18 am, Thu, 6 May 21

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI