AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

SRH Practice Match: सराव सामन्यात अभिषेक शर्माकडून षटकारांचा वर्षाव, पण शतक हुकलं

आयपीएल 2026 स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. सनरायझर्स हैदराबादने सराव सामन्यातून आपल्या तयारीचा आढावा घेतला. यावेळी अभिषेक शर्माच्या फलंदाजीची धार पुन्हा एकदा अनुभवायला मिळाली.

SRH Practice Match: सराव सामन्यात अभिषेक शर्माकडून षटकारांचा वर्षाव, पण शतक हुकलं
SRH Practice Match: सराव सामन्यात अभिषेक शर्माकडून षटकारांचा वर्षाव, पण शतक हुकलंImage Credit source: IPL/BCCI
| Updated on: Mar 21, 2026 | 8:36 PM
Share

टी20 वर्ल्डकप 2026 स्पर्धेत अभिषेक शर्माची बॅट शांत होती. पहिल्या तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्याने त्याच्या फलंदाजीवर अनेकांनी शंका घेतली. सुपर 8 फेरीत झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात अर्धशतकी खेळी केली. पण त्यानंतर पुन्हा एकदा फलंदाजीला ग्रहण लागलं. असं असताना अंतिम सामन्यात त्याची बॅट चांगलीच तळपली. त्यामुळे टीम इंडियाला मोठी धावसंख्या करण्यास मदत झाली. असं असताना अभिषेक शर्मा आता आयपीएल 2026 स्पर्धेत आपल्या फलंदाजीची धार दाखवण्यास सज्ज आहे. त्याची झलक त्याने सराव सामन्यात दाखवून दिली. आयपीएल स्पर्धेची तयारी अंतिम टप्प्यात असताना सनरायझर्स हैदराबादने सराव सामना खेळला. या सराव सामन्यात कर्णधार इशान किशन काही खास करू शकला नाही. पण अभिषेक शर्माचं वादळ मात्र घोंघावलं. त्याने 94 धावांची खेळी आणि त्याचं शतक फक्त 6 धावांनी हुकलं.

सनरायझर्स हैदराबादने होमग्राउंड राजीव गांधी आंतरराष्ट्रीय स्टेडियममध्ये पहिला सराव सामना खेळला. हा सामना स्कॉडमधील खेळाडू दोन संघात विभागून खेळण्यात आला. यावेळी अभिषेक शर्मा, इशान किशन, हेनरिक क्लासेन, लियाम लिव्हिंगस्टोनसारखे दिग्गज फलंदाज एकाच संघात होते. इशान किशन आणि अभिषेक शर्मा ही जोडी मैदानात उतरली होती. पहिल्यांदा फलंदाजी करताना या संघाने आक्रमक फटकेबाजी केली. पण इशान किशन 14 चेंडूत फक्त 18 धावा करून बाद झाला. त्यानंतर अभिषेक शर्माने गोलंदाजांना आपला इंगा दाखवला. त्याने गोलंदाजांना सळो की पळो करून सोडलं. त्याने फक्त 27 चेंडूत शतक ठोकलं.

अभिषेक शर्माने 42 चेंडूत 94 धावांची खेळी केली. त्याने स्ट्रेट आणि कव्हरच्या दिशेने सर्वाधिक फटकेबाजी केली. पण लाँग ऑफच्या दिशेने फटका मारताना चुकला आणि झेल बाद झाला. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ब्रायडन कार्सच्या गोलंदाजीवर विकेट गेली. हेनरिक क्लासेन आणि अभिषेक शर्मा हे दोघंही 15 धावांच्या आसपास होते. पण अभिषेक शर्माने गिअर टाकला आणि धावांची गती वाढवली. त्यामुळे एका बाजूने हेनरिक क्लासेन फक्त पाहात राहिला. या संघाने फक्त 13 षटकात 160 धावांचा पल्ला गाठला. सनरायझर्स हैदराबादचा पहिला सामना 28 मार्च रोजी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूशी होणार आहे. हा सामना चिन्नास्वामी स्टेडियममध्ये होणार आहे. त्यामुळे कोण बाजी मारते? याची उत्सुकता आहे.

Follow Us
आजपासून लागू झाले 11 नियम! बँक, ITR, HSRP...अपडेट्स एका क्लिकमध्ये
New Rules | आजपासून लागू झाले 11 मोठे नियम! बँक, ITR, पासपोर्ट, HSRP ते LPG... सर्व अपडेट्स एका क्लिकमध्ये
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा
सचिन अहिरांबाबत मोठी अपडेट समोर; शिंदेंच्या शिवसेनेतून उपसभापती पदाचा अर्ज दाखल करताच, सरकारने थेट....
सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! अहिरांवर राऊतांचा संताप
Sanjay Raut Full Press | सर्व काही दिलं... तरी पक्ष सोडला! विश्वासाला तडा देणाऱ्यांना जनता ओळखते; अहिरांवर राऊतांचा संताप
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील
महिन्याच्या पहिल्याच दिवशी सर्वसामान्यांना दिलासा! इराण-अमेरिकेतील कराराचा भारतीयांना थेट फायदा; आता पेट्रोल...
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा
“मी आधीच चार खून केलेत, पुढचा नंबर...” मुंबई लोकलमध्ये सनकी व्यक्तीचा धिंगाणा; मद्यधुंद अवस्थेत... पुढे भयंकर घडलं?
शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राऊतांचा अहिरांवर घणाघात
Sanjay Raut | शरद पवारांचे झाले नाहीत, आमचे काय होणार?; राजकीय प्रवास कलंकित, राऊतांचा सचिन अहिरांवर घणाघात
नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात
Nashik | हरी मुखे म्हणा! नाशिक भक्तिरसात न्हालं; संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचं जल्लोषात स्वागत
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय
मोठी बातमी! सचिन अहिर यांनी उपसभापती पदाचा अर्ज दाखल केल्यानंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; थेट म्हणाले...
मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड....
Marine Drive Rain Updates | मुंबईत मुसळधार पावसाची दमदार हजेरी; मरीन ड्राईव्हवर उसळल्या प्रचंड लाटा, पर्यटकांची गर्दी वाढली
24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार;
Latest Rain Update | 24 तास महत्त्वाचे रेड आणि ऑरेंज अलर्ट जारी... धो धो पाऊस कोसळणार; तुमच्या शहरात कोणता अलर्ट?