AFG vs BAN : अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिली वनडे, कोण करणार विजयी सुरुवात?

Afghanistan vs Bangladesh 1st ODI : अफगाणिस्तानने दक्षिण आफ्रिकेला टी 20i मालिकेत हरवलं. तर दक्षिण आफ्रिकेने बांगलादेशला त्यांच्या घरात कसोटी मालिकेत लोळवलं. त्यामुळे बांगलादेशसाठी अफगाणिस्तानविरुद्धची मालिका आव्हानात्मक असणार आहे.

AFG vs BAN : अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिली वनडे, कोण करणार विजयी सुरुवात?
afghanistan vs bangladesh odi seriesImage Credit source: afghanistan cricket X Account
Follow us
| Updated on: Nov 05, 2024 | 11:29 PM

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश या 2 आशियाई क्रिकेट संघांमध्ये एकूण 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे. या मालिकेसाठी दोन्ही संघांनी नेट्समध्ये जोरदार सराव केला आहे. त्यामुळे दोन्ही संघ पहिल्या सामन्यासाठी सज्ज आहेत. नजमुल हुसैन शांतो बांगलादेशचं नेतृत्व करणार आहे. तर अफगाणिस्तानच्या कर्णधारपदाची जबाबदारी ही हशमतुल्लाह शाहीदी याच्याकडे आहे. अफगाणिस्तानने सप्टेंबरमध्ये दक्षिण आफ्रिकेवर वनडे सीरिजमध्ये 2-1 ने मालिक विजय मिळवला होता. त्यामुळे अफगाणिस्तानचा विश्वास वाढलेला आहे. तर दुसऱ्या बाजूला बांगलादेशला मायदेशात दक्षिण आफ्रिकेकडून कसोटी मालिकेत 0-2 ने व्हाईटवॉश स्वीकारावा लागला. त्यामुळे अशात बांगलादेशसमोर अफगाणिस्तानचं आव्हान असणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना केव्हा?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना हा बुधवारी 6 नोव्हेंबरला होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना कुठे?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना शारजाह क्रिकेट स्टेडियम येथे होणार आहे.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामन्याला किती वाजता सुरुवात होणार?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी सुरुवात होईल. तर 3 वाजता टॉस होईल.

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहायला मिळेल?

अफगाणिस्तान विरुद्ध बांगलादेश पहिला एकदिवसीय सामना भारतात टीव्हीवर दाखवण्यात येणार नाही. तर मोबाईलवर फॅनकोड एपद्वारे सामना पाहायला मिळेल.

बुधवारपासून एकदिवसीय मालिका

बांगलादेश क्रिकेट टीम: नजमुल हुसेन शांतो (कॅप्टन), तनजीद हसन, सौम्या सरकार, तॉहीद हृदोय, महमुदुल्ला, मुशफिकुर रहीम (विकेटकीपर), मेहदी हसन मिराझ, तस्किन अहमद, रिशाद हुसेन, मुस्तफिजुर रहमान, शरीफुल इस्लाम, झाकीर हसन, झाकेर अली, नसुम अहमद आणि नाहीद राणा.

अफगाणिस्तान क्रिकेट टीम : हशमतुल्ला शाहिदी (कॅप्टन), रहमानउल्ला गुरबाज (विकेटकीपर), रियाझ हसन, रहमत शाह, अजमतुल्ला ओमरझाई, गुलबदिन नायब, मोहम्मद नबी, राशीद खान, नांगेलिया खरोटे, अल्लाह गझनफर, फजलहक फारुकी, फरीद अहमद मलिक, इक्रम अलीखिल, दरविश रसूली, सेदिकुल्ला अटल, नूर अहमद, अब्दुल मलिक, बिलाल सामी आणि नवी झद्रान.

'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?
'वन नेशन वन इलेक्शन' वर काय म्हणाले डॉ.अमोल कोल्हे ?.
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार
'वन नेशन वन इलेक्शन' मुळे विरोधक...,' काय म्हणाले सुधीर मुनगंटीवार.
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'
'केंद्रीय गृहमंत्री अमित शाह शरद पवार यांच्या भेटीला'.
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला
उपमुख्यमंत्र्‍याच्या छातीला नंबरचा बॅच लावावा, वडेट्टीवार यांचा टोला.
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे
'लाडकी बहिण योजनेच्या निकषात...,' काय म्हणाल्या आदिती तटकरे.
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब
'...तोपर्यंत स्मार्ट मीटर... ', काय म्हणाले म्हणाले अनिल परब.
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?
7 नेते, 5 मूर्ती, देवेंद्र फडणवीस यांनी कोणाला काय भेट दिली?.
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !
राष्ट्रवादी-शिवसेना यांची खाती फिक्स, मात्र भाजपात अजूनही ट्वीस्ट !.
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?
फडणवीस मुख्यमंत्री होताच जातीय तणाव निर्माण केला जातो,कोणी केला आरोप?.
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?
...तर यापुढे ईव्हीएमवर निवडणूक लढविणार नाही, काय म्हणाले उत्तम जानकर?.