LSG च्या मालकाने सर्वांसमोर केएल राहुलला सुनावल्यानंतर पाठिशी उभा राहिला ‘हा’ क्रिकेटपटू
फक्त केएल राहुलनेच संजीव गोयनका यांच्या रागाचा सामना केला नाहीय. 2016 नंतर संजीव गोयनका यांनी धोनीला पुणे सुपरजायंट्सच्या कॅप्टनशिपवरुन हटवलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या टीमच प्रदर्शन खराब झालेलं.

हैदराबाद विरुद्ध एकतर्फी पराभवानंतर लखनऊ टीमचे मालक संजीव गोयनका यांचं केएल राहुलसोबतच वर्तन चर्चेचा विषय बनलं आहे. संजीव गोयनका यांनी ज्या पद्धतीने केएल राहुलला सर्वांसमोर सुनावलं, ते कोणालाही पटलेलं नाहीय. केएल राहुल लखनऊ सुपर जायंट्स टीमचा कॅप्टन आहे. आता टीम इंडियातील खेळाडू सुद्धा या मुद्यावरुन संजीव गोयनका यांच्यावर टीका करत आहेत. मोहम्मद शमी या मुद्यावर म्हणाला की, “सर्वांसमोर अशा पद्धतीने बोलणं ही लाजिरवाणी बाब आहे. या सगळ्या गोष्टी ड्रेसिंग रुमच्या आत झाल्या पाहिजेत” आता गौतम गंभीर सुद्धा केएल राहुलच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. गौतम गंभीरने संकेतांमध्ये बोलताना शाहरुख खानचा नाव घेऊन संजीव गोयनकांवर निशाणा साधला आहे.
“आपल्या देशात एक्सपर्ट्स, टीमचे मालक फक्त एका मिनिटात मॅच पाहून टीका करतात. टीक त्यावेळी केली पाहिजे, ज्यावेळी तुम्ही तो दबाव झेलला असेल. शाहरुख खानला या गोष्टी माहित आहेत. स्ट्रगल आणि प्रेशर काय असतो, हे शाहरुखला माहित आहे” असं गौतम गंभीर संजीव गोयनका आणि केएल राहुल यांचं नाव न घेता इशाऱ्यांमध्ये बोलून गेला.
अजून कोणी संजीव गोयनका यांच्या रागाचा सामना केलाय?
कोलकाता नाइट रायडर्स टीमच या सीजनमध्ये दमदार प्रदर्शन सुरु आहे. या सीजनमध्ये चॅम्पियन बनण्यासाठी ही टीम दावेदार आहे. मागच्या काही सीजनमध्ये या टीमने खूप खराब प्रदर्शनाचा सामना केलाय. मात्र, तरीही शाहरुख खान नेहमीच आपल्या टीमच्या पाठिशी उभा राहिला आहे. पराभवानंतर आपल्याच नाही, प्रतिस्पर्धी टीमच्या खेळाडूंची सुद्धा शाहरुख गळाभेट घेतो. त्याचवेळी संजीव गोयनका यांनी वर्तणूक थोडी वेगळी दिसते. फक्त केएल राहुलनेच संजीव गोयनका यांच्या रागाचा सामना केला नाहीय. 2016 नंतर संजीव गोयनका यांनी धोनीला पुणे सुपरजायंट्सच्या कॅप्टनशिपवरुन हटवलं होतं. धोनीच्या नेतृत्वाखाली पुण्याच्या टीमच प्रदर्शन खराब झालेलं. त्यानंतर स्टीव्ह स्मिथला नेतृत्व देण्यात आलं. त्याने टीमला फायनल पर्यंत पोहोचवलं होतं.