AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कपच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह नको, नाही तर…! जडेजा असं का म्हणाला?

भारत आणि युएई यांच्यात आशिया कप स्पर्धेतील पहिला सामना होणार आहे. या सामन्यातील प्लेइंग इलेव्हनबाबत खूपच चर्चा रंगली आहे. या सामन्यात जसप्रीत बुमराह असणार यात काही शंका नाही. पण माजी क्रिकेटपटू अजय जडेजाने एक प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. तसेच आंदोलनाचा इशारा दिला आहे.

आशिया कपच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह नको, नाही तर...! जडेजा असं का म्हणाला?
आशिया कपच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह नको, नाही तर...! जडेजा असं का म्हणाला?Image Credit source: PTI
| Updated on: Sep 10, 2025 | 4:23 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेच्या जेतेपदासाठी टीम इंडिया प्रमुख दावेदार मानली जात आहे. कारण भारतीय संघात दिग्गज खेळाडू आहे. त्यामुळे भारतीय संघाची बाजू भक्कम आहे. असं असताना भारताचा या स्पर्धेतील पहिला सामना यजमान युएईसोबत होत आहे. या सामन्यापूर्वी भारतीय संघाने आयसीसी अकादमीत चांगलाच घाम गाळला आहे. या सराव शिबिरात वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह याने भाग घेतला नव्हता. पण युएई विरूद्धच्या पहिल्या सामन्यात जसप्रीत बुमराह खेळणार यात काही शंका नाही. पण माजी क्रिकेटपटू अजय जडेजा याने कमकुवत संघाविरुद्ध खेळण्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर आणि सूर्यकुमार यादव यांनी युएईविरुद्धच्या अंतिम इलेव्हनमध्ये बुमराहचा समावेश करण्याचा निर्णय घेतला तर आंदोलन करेन. जर तसं होत असेल तर मी तिथे जात आहे, असंही अजय जडेजा मजेशीर अंदाजात म्हणाला.

माजी भारतीय क्रिकेटपटू अजय जडेजाने सोनी स्पोर्ट्सशी बोलताना सांगितलं की, ‘जसप्रीत बुमराहा युएईविरुद्धच्या खेळवण्याची काय गरज आहे, यार? सहसा तुम्ही त्याला कापसाच्या लोकरीत गुंडाळून ठेवता. आता तुम्हाला यूएईविरुद्धही बुमराह हवा आहे का? एकतर त्याला अजिबात सांभाळू नका किंवा जर तुम्हाला त्याला सांभाळायचं असेलच तर अशा सामन्यात सांभाळा. तर्कशास्त्र असे म्हणते, पण आम्ही कधीही तर्कशास्त्राने काम करत नाही’

अजय जडेजा पुढे म्हणाला की, सामना युएईविरुद्ध आहे. मी त्यांचा कर्णधार मोहम्मद वसीम आणि त्याची प्रतिभा पाहिली आहे. तुम्ही कोणत्याही संघाला रँकिंग देऊ शकत नाही. पण ही टीम इंडिया आहे त्यांनी टी20 विश्वचषक जिंकला आहे. त्यामुळे, मी स्पष्ट आहे. जर बुमराह पहिला सामना खेळला तर मी आंदोलन करेन. दुसरीकडे, टीम इंडियाचा माजी अष्टपैलू खेळाडू इरफान पठाणने असा युक्तिवाद केला की एकदा एखाद्या खेळाडूची संघात निवड झाली की, वर्कलोड मॅनेजमेंटचा निवडीवर परिणाम होऊ नये. दरम्यान 2016 टी20 आशिया कप स्पर्धेत भारत आणि युएई यांच्यात एकमेव सामना झाला होता. या सामन्यात बुमराह खेळला होता. त्याने 4 षटकात एक विकेट घेत 23 धावा दिल्या होत्या.

'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.