ठरलं! Ranji Trophy साठी पृथ्वी शॉकडे मुंबईची कमान, अजिंक्य रहाणे शॉच्या नेतृत्वात खेळणार

दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतातली मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा म्हणजेच रणजी स्पर्धेचा (Ranji Trophy) हंगाम सुरू होत आहे. बीसीसीआयने त्याचे दोन टप्प्यात आयोजन करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी सर्व राज्यांनी आणि संघांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईदेखील त्यापैकीच एक आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती लवकरच मुंबईच्या संघाची घोषणा करणार आहे.

ठरलं! Ranji Trophy साठी पृथ्वी शॉकडे मुंबईची कमान, अजिंक्य रहाणे शॉच्या नेतृत्वात खेळणार
Prithvi Shaw
Follow us
| Updated on: Feb 08, 2022 | 9:41 AM

मुंबई : दोन वर्षांच्या प्रतीक्षेनंतर भारतातली मोठी देशांतर्गत क्रिकेट स्पर्धा म्हणजेच रणजी स्पर्धेचा (Ranji Trophy) हंगाम सुरू होत आहे. बीसीसीआयने त्याचे दोन टप्प्यात आयोजन करण्याचा विचार केला आहे. त्यासाठी सर्व राज्यांनी आणि संघांनी तयारी सुरू केली आहे. मुंबईदेखील त्यापैकीच एक आहे. सलील अंकोला यांच्या अध्यक्षतेखालील निवड समिती लवकरच मुंबईच्या संघाची घोषणा करणार आहे. त्याआधी अशी माहिती समोर आली आहे की, रणजी ट्रॉफीमध्ये मुंबईची कमान युवा फलंदाज पृथ्वी शॉ (Prithvi Shaw) याच्याकडे असेल. तर भारतीय कसोटी संघाचा माजी उपकर्णधार अजिंक्य रहाणेला (Ajinkya Rahane) शॉच्या नेतृत्वात खेळावं लागेल अशी बातमी आहे. क्रिकबझ या वेबसाईटने आपल्या रिपोर्टमध्ये ही माहिती दिली आहे.

वेबसाइटच्या वृत्तानुसार, शॉला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णय निवड समिती, प्रशिक्षक अमोल मजुमदार आणि संघाने अजिंक्य रहाणेशी बोलल्यानंतर घेतला आहे. रहाणेने विराट कोहलीचा उपकर्णधार म्हणून काम केले आहे आणि त्याच्या अनुपस्थितीत सहा कसोटी सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. विशेष म्हणजे त्यापैकी एकही सामना भारताने गमावलेला नाही. त्याने कोहलीच्या अनुपस्थितीत ऑस्ट्रेलियातील कसोटी मालिकेत कर्णधारपद भूषवले आणि संघाला विजयापर्यंत नेले होते.

रहाणे मार्गदर्शक म्हणून खेळण्यास तयार

वेबसाईटने मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या (एमसीए) अधिकाऱ्याच्या हवाल्याने म्हटले आहे की, रहाणे संघासोबत एक मार्गदर्शक म्हणून खेळण्यास तयार आहे आणि मुंबईने रणजी स्पर्धेत गमावलेली विश्वासार्हता परत मिळवण्यास मदत करेल. एमसीए अधिकाऱ्याने म्हटले आहे की, “रहाणेसारख्या खेळाडूसाठी कर्णधारपद महत्त्वाचे नाही. एक कर्णधार म्हणून खेळाडूला जे काही मिळतं, ते सर्व त्याने आधीच मिळवलं आहे. संघासोबत मेंटॉर म्हणून खेळण्यासाठी आणि देशांतर्गत क्रिकेटमध्ये मुंबईचा नावलौकिक परत आणण्यासाठी तो तयार आहे. त्याला कर्णधारपदाबाबत कोणतीही समस्या नाही. त्याला कॅप्टन शॉचीदेखील काहीच अडचण नाही.

…म्हणून शॉला कर्णधार बनवण्याचा निर्णय

एमसीएच्या अधिकाऱ्याने सांगितले की, शॉला कर्णधारपदी कायम ठेवण्याचा निर्णयही घेण्यात आला होता कारण डिसेंबरमध्ये जेव्हा संघाची निवड करण्यात आली तेव्हा रहाणेच्या उपलब्धतेबाबत परिस्थिती स्पष्ट नव्हती. रहाणे त्यावेळी दक्षिण आफ्रिकेत होता आणि 13 जानेवारीपासून ही स्पर्धा सुरू होणार होती, पण कोरोनामुळे ती पुढे ढकलण्यात आली. आता रहाणे देशांतर्गत क्रिकेट खेळण्यासाठी उपलब्ध आहे आणि त्यामुळे मुंबई क्रिकेटच्या थिंक टँकने सर्व संबंधितांशी बोलून शॉला कर्णधारपदी कायम ठेवणेच संघाच्या हिताचे ठरेल, असा विचार केला आहे. शॉच्या नेतृत्वाखाली मुंबईने गेल्या वर्षी विजय हजारे ट्रॉफी जिंकली होती.

इतर बातम्या

Under 19 World cup: ‘हे’ आहेत वर्ल्डकप गाजवणारे महाराष्ट्राचे चार खेळाडू, गरज असताना मुंबई-पुणेकरांचा जबरदस्त परफॉर्मन्स

IND vs WI: सुर्य कुमार यादवला भडकवणारा तो जोडीदार कोण? मागच्या मॅचमध्ये काय झालं?

तालिबानची दहशत! अफगाणिस्तान क्रिकेटमध्ये खळबळ, U19 World Cup टीममधले चौघे मायदेशी परतलेच नाहीत

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.