सचिन तेंडुलकर प्लेन प्रवासात भडकला! ऐकत नसल्याचं पाहून डोळे तपासण्याचा दिला सल्ला Video
क्रिकेटच्या मैदानात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर हा शांत स्वभावासाठी ओळखला जातो. त्याने आपल्या प्रतिस्पर्ध्यांना कायमच बॅटने उत्तर दिलं आहे. मात्र सचिन तेंडुलकरचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. यात ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेटपटूसोबत प्लेनमध्ये वाद घालताना दिसत आहे.

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर आणि वाद… असं कसं होईल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. पण सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमुळे या चर्चेला उधाण आलं आहे. मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरची वेगवान गोलंदाज ग्लेन मॅक्ग्रासोबत प्लेन प्रवासात वाद झाला. हा वाद काही खरा नाही. हा व्हिडीओ एका जाहीरातीचा असून सोशल मीडियावर अनेकदाना हा वाद खरा असल्याचं वाटलं. पण सचिन तेंडुलकर आणि ग्लेन मॅक्ग्रा यांच्यात प्लेनमधील झालेला वाद काही खरा नाही. हा एक जाहीरातीचा भाग आहे. मॅक्ग्रासोबत जाहीरात शूटींगचा व्हिडीओ सचिन तेंडुलकरने आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. प्लेनमध्ये सचिन तेंडुलकर आणि ग्लेन मॅक्ग्रा जाहीरातीचं शूटींग करत होते इथपर्यंत तुम्हाला कळलं असेल. पण सचिनने मॅक्ग्राला डोळे तपासण्याचा सल्ला देण्याचं कारण काय? दोन्ही खेळाडूंमध्ये एडिलेडच्या एका डिलिवरीवरून वाद झाला. हाच या जाहीरातीचा भाग आहे.
जाहीरातीच्या शूट दरम्यान मॅक्ग्रा एडिलेट कसोटीशी निगडीत एका चेंडूचा व्हिडीओ दाखवताना दिसत आहे. व्हिडीओ पाहून सचिन तेंडुलकरने सांगितलं की आऊट नव्हतो. पण मॅक्ग्रा त्याच्या म्हणण्यावर ठाम राहत सांगतो की आऊट होता. जेव्हा वाद वाढतो तेव्हा सचिन मॅक्ग्राला डोळे तपासण्याचा सल्ला देतो. सचिनचा हा सल्ला ऐकून मॅक्ग्राही प्रत्युत्तर देतो आणि म्हणतो माझे डोळे ठीक आहेत. इतक्यात एक महिला तिथे येते आणि मॅक्ग्राला सांगते की तो बसलाय ती सीट माझी आहे.
View this post on Instagram
सचिन तेंडुलकर आणि ग्लेन मॅक्ग्रा यांच्यातील क्रिकेट मैदानातील द्वंद्व क्रीडाविश्वाने पाहिलं आहे. भारत ऑस्ट्रेलिया सामन्यात या दोघांच्या खेळीची कायम चर्चा व्हायची. कोणता खेळाडू कोणावर भारी पडतो याची उत्सुकता असायची. कधी सचिन भारी पडायचा तर कधी ग्लेन मॅक्ग्रा.. पण आता दोघांतील द्वंद्व जाहीरातीच्या माध्यमातून पाहता येणार आहे. अभिनयाच्या माध्यमातून या दोघांनी आता का होईना थोडाफार वाद घातला.