AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

England vs Australia : बेन स्टोक्स याने पकडला अफलातून झेल, व्हिडीओ Viral

Ben Stokes Catch Video : पाचव्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 283 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारूंनी 295 धावा करत 12 दिवसांची आघाडी घेतली आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 71 धावांची महत्त्वाची खेळी केली. तर बेन स्टोक्सनेही एक नंबर झेल घेतला.

England vs Australia : बेन स्टोक्स याने पकडला अफलातून झेल, व्हिडीओ Viral
| Edited By: | Updated on: Jul 29, 2023 | 4:29 PM
Share

मुंबई : अॅशेसमधील शेवटचा म्हणजेच पाचवा कसोटी सामना सुरू आहे. या सामन्यामधील स्टीव्ह स्मिथच्या रन आऊटचा दिलेला निर्णय वादग्रस्त ठरलाय. क्रिकेट वर्तुळात तिसरे पंच नितीन मेनन यांच्या या निर्णयावरून नाराजी व्यक्त केली जात आहे. या रन आऊटचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहेच त्यासोबतच आणथी एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सने अफलातून झेल घेतला आहे.

सामन्याच्या दुसऱ्या दिवशीच्या शेवटच्या ओव्हरमध्ये इंग्लंडचा खेळाडू जो रूट बॉलिंग करत होता. तर ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्सने सिक्स मारण्यासाठी मोठा फटका खेळला. सीमारेषेवर बेन स्टोक्स  तैनात होता. पठ्ठ्याने हवेच उडी मारत झेल घेतला मात्र त्याचा तोल गेला. त्यावेळी स्टोक्सने सीमारेषेवर उडी मारत चेंडू आतमध्ये फेकला आणि परत आतमध्ये येवून झेलला.

पाहा व्हिडीओ -:

दरम्यान, पाचव्या कसोटी सामन्यामध्ये इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना 283 धावा केल्या. त्यानंतर फलंदाजीसाठी उतरलेल्या कांगारूंनी 295 धावा करत 12 धावांची आघाडी घेतली आहे. यामध्ये स्टीव्ह स्मिथने सर्वाधिक 71 धावांची महत्त्वाची खेळी केली.

ऑस्ट्रेलिया (प्लेइंग इलेव्हन): डेव्हिड वॉर्नर, उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, स्टीव्हन स्मिथ, ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, अॅलेक्स कॅरी (W), मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स (C), जोश हेझलवूड, टॉड मर्फी

इंग्लंड (प्लेइंग इलेव्हन): झॅक क्रॉली, बेन डकेट, मोईन अली, जो रूट, हॅरी ब्रूक, बेन स्टोक्स (C), जॉनी बेअरस्टो (W), ख्रिस वोक्स, मार्क वुड, स्टुअर्ट ब्रॉड, जेम्स अँडरसन

वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!
मालवणमध्ये फिरायला जाताय? सिंधुदुर्गात जाणाऱ्या जेटीची अवस्था बघा!.
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?
नटरंगी नार.... रुपाली ठोंबरेंचा रोख कुणावर? कोणाचा घेतला खरपूस समाचार?.
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला
फडणवीसांचा दरिंदा, जल्लाद अन् गजनी उल्लेख, काँग्रेस नेता पुन्हा बरळला.
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन
इंदू मिल स्मारकाबाबत CM फडणवीसांची मोठी घोषणा, थेट सांगितली डेडलाईन.