Ben Stokes… मी इतकी छोटी शिवी देत नाही, लाईव्ह शो दरम्यान आशिष नेहरा काय बोलून गेला
भारत इंग्लंड कसोटी मालिकेतील शेवटच्या सामन्यादरम्यान एका कार्यक्रमात आशिष नेहराने एक विचित्र वक्तव्य केलं. बेन स्टोक्सचं नाव घेत त्याने इतकी छोटी शिवी देत नाही असं सांगितलं. नेमकं काय झालं ते समजून घेऊयात..

अँडरसन तेंडुलकर कसोटी मालिकेत माजी क्रिकेटपटू आशिष नेहरा एक क्रिकेट तज्ज्ञ म्हणून कार्यक्रमात भाग घेत आहे. या मालिकेचं तो त्याच्या पद्धतीने विश्लेषण करत आहे. पाचव्या कसोटी सामन्याचा निकाल हा शेवटचा दिवशी लागणार हे स्पष्ट आहे. इंग्लंडला विजयासाठी 35, तर भारताला विजयासाठी 4 विकेटची गरज आहे. असं असताना आशिष नेहराचं एक वक्तव्य चर्चेचा विषय ठरत आहे. आशिष नेहरा कायम त्याच्या बिनधास्त अंदाजासाठी ओळखला जातो. एका कार्यक्रमात इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्सचं नाव घेत त्याने विचित्र वक्तव्य केलं. त्याला कारणंही तसंच आहे. त्याला प्रश्नच असा विचारला गेला की त्याचं उत्तर नेहरा त्याच अंदाजात देणार हे स्पष्ट आहे. चला जाणून घेऊयात आशिष नेहराने नेमकं काय सांगितलं ते..
बेन स्टोक्स… आणि नेहराने दिलं असं उत्तर
आशिष नेहरा सोनी स्पोर्ट्सच्या कार्यक्रमात विश्लेषणासाठी बसला होता. यात एक भागात ‘असं झालं असतं तर काय’ हा प्रश्नोत्तरांचा तास सुरु झाला. या भागात अँकर गौरव कपूर सर्वांना प्रश्न विचारत होता. त्याने या सामन्यातील एका क्षणाबाबत विचारलं की जर तसं झालं असतं तर काय? यावर आशिष नेहराने सांगितलं की, बेन स्टोक्स… हे नाव घेतल्यानंतर आशिष नेहरा गप्प बसला. त्यामुळे गौरव कपूरने पुन्हा विचारलं की तुम्ही शिवी देत आहात का? त्यावर आशिष नेहराने सांगितलं की हे शब्द माझी शिवी नाही. हा खूपच खालता स्तर आहे. ही छोटी शिवी आहे. नेहराने जेव्हा असं उत्तर दिलं तेव्हा सर्वच हसू लागले.
नेहराने पुढे सांगितलं की, बेन स्टोक्स पाचव्या कसोटी सामन्यातून बाहेर नसता तर या सामन्याचं चित्र काही वेगळं असतं. पूर्ण चित्रच बदलेलं असतं. दुसरीकडे, अजय जडेजाच्या मते या मालिकेत कुलदीप यादवला संधीच दिली नाही. जर तसं केलं असतं तर आज स्थिती चांगली असतील. कुलदीप यादवला या मालिकेत एकाही सामन्यात संधी मिळाली नाही. कुलदीप यादवने कसोटी चांगली कामगिरी केली आहे. त्याने अनेक सामन्यात विजयाची चव चाखण्यात मदत केली आहे. कुलदीप यादवने 13 सामन्यात 56 विकेट घेतल्या आहेत. मात्र असं असूनही त्याला संघात स्थान मिळालं नाही.
