AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup : उगाच नाही हुकूमाचा एक्का! जसप्रीत बुमराह याच्याबाबत राहुल द्रविड याचं मोठं वक्तव्य!

Asia Cup : आशिया कप सुरू व्हायला अवघे काही तास बाकी आहेत, त्याआधी कोच राहुल द्रविडने पत्रकार परिषद घेत यॉर्कर किंग जसप्रीत बुमराह याच्यासंदर्भात मोठं वक्तव्या केलं आहे. राहुलच्या या वक्तव्यामुळे बुमराहला हुकूमाचा एक्का का म्हणतात हे दिसून आलं.

Asia Cup : उगाच नाही हुकूमाचा एक्का! जसप्रीत बुमराह याच्याबाबत राहुल द्रविड याचं मोठं वक्तव्य!
| Updated on: Aug 29, 2023 | 6:36 PM
Share

मुंबई : टीम इंडिया आशिया कप 2023 साठी सज्ज झाली असून अवघ्या काही तासांनी या स्पर्धेला सुरूवात होणार आहे. टीम इंडियाचा कोच राहुल द्रविड याने पत्रकार परिषद घेत चार नंबरबाबत इतका संभ्रम का झाला? याबाबत जाहीपणे सांगितलं. इतकंच नाहीतर टीम इंडियाचा स्टार खेळाडू जसप्रीत बुमराहबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. राहुलच्या या वक्तव्यामुळे बुमराहला हुकूमाचा एक्का का म्हणतात हे दिसून आलं.

राहुल द्रविड काय म्हणाला?

राहुल द्रविड याने पत्रकार परिषदेमध्ये पत्रकारांनी मिडल ऑर्डरमध्ये केलेल्या प्रयोगांवरून प्रश्नांचा भडीमार केला. मात्र राहुलने चार आणि पाच नंबरबाबत अजुनही काहीच का निश्चित नाही यामागचं कारण सांगितलं. ऋषभ पंत,  के. एल. राहुल आणि श्रेयस अय्यर हे तिन्ही खेळाडू पाठोपाठ दुखापती झाल्याने त्या नंबरवर युवा खेळाडूंना संधी दिल्याचं राहुलने सागितलं.

बुमराहबाबत काय म्हणाला राहुल?

जसप्रीत बुमराहल दुखपातीतून सावरत माघारी परतला ही चांगली गोष्ट आहे. गेल्या दोन वर्षांमध्ये तो टीमसाठी जास्त सामने खेळला नाही. आम्ही त्याला घाईघाईने मैदानात त्याला उतरवणार नाही. आयर्लंड दौऱ्यावर त्याने चांगली गोलंदाजी केली. वर्ल्डकपसाठी त्याला तयार करण्यासाठी आमच्याकडे आणखी एक महिन्याचा वेळ असल्याचं राहुल द्रविड म्हणाला.

आयर्लंड दौऱ्यावर कमबॅक करताना बुमराहकडे कर्णधारपदाची जबाबदारी देण्यात आली होती. या दौऱ्यामध्ये बुमराहने दमदार कामगिरी केली. राहुल द्रविड याने या पत्रकार परिषदेमध्ये  के.एल. राहुलच्या फिटनेसची माहिती दिली. नेपाळ आणि पाकिस्तानविरूद्धच्या सामन्यात खेळण्यात नसल्याचं सांगितलं.

आशिया कपसाठी टीम इंडियाचा संघ : रोहित शर्मा (C), शुभमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, इशान किशन, हार्दिक पंड्या (VC), रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. शमी, मोहम्मद. सिराज, प्रसिद्ध कृष्णा.

इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा
जसं पार्थ पवारांना माफ केलं तसं तपोवनातील झाडांना...मनसेकडून थेट इशारा.