AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pak vs Ind | टीममध्ये केएलची एन्ट्री, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी ‘या’ खेळाडूला डच्चू!

Pakistan vs India Asia Cup 2023 | केएल राहुल याला दुखापतीमुळे आशिया कप 2023 च्या साखळी फेरीतील सामन्यांना मुकावं लागलं. मात्र तो आता सज्ज झालाय. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध एकाला टीममधून कल्टी दिली जाणार असल्याचं म्हटलं जातंय.

Pak vs Ind | टीममध्ये केएलची एन्ट्री, पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी 'या' खेळाडूला डच्चू!
| Updated on: Sep 07, 2023 | 7:27 PM
Share

कोलंबो | आशिया कप 2023 मध्ये टीम इंडिया सुपर 4 मधील पहिला सामना हा 10 सप्टेंबरला खेळणार आहे. टीम इंडियात या सामन्यात कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तान विरुद्ध भिडणार आहे. हा सामना श्रीलंकेतील कोलंबोमधील आर प्रेमदासा स्टेडियममध्ये खेळवण्यात येणार आहे. या सामन्याला भारतीय वेळेनुसार दुपारी 3 वाजता सुरुवात होणार आहे. या सामन्यासाठी टीम इंडिया प्लेईंग ईलेव्हनमध्ये बदल करण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचं म्हटलं जात आहे.

विकेटकीपर बॅट्समन केएल राहुल याचं कमबॅक झालं आहे. केएल याची आशिया कपसाठी निवड करण्यात आली. मात्र त्याला दुखापतीमुळे पाकिस्तान आणि नेपाळ विरुद्धच्या सामन्यात खेळता आलं नाही. मात्र आता तो पूर्णपणे फीट झालाय. केएलने नेट्समध्ये जोरदार सरावही केला. त्यामुळे केएल पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात खेळणार असल्याचं समजलं जात आहे. त्यामुळे पाकिस्तान विरुद्ध प्लेईंग ईलेव्हनमधून ईशान किशन याचा पत्ता कट होणार असल्याचं निश्चित म्हटलं जातंय.

ईशान किशनची दमदार कामगिरी

ईशान किशन याने केएल राहुल याच्या अनुपस्थितीत दोन्ही सामन्यात दमदार कामगिरी केली. ईशानने विकेटकीपिंगसह बॅटिंगही दमदार केली. ईशानने पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यात निर्णायक क्षणी 82 धावांची अर्धशतकी खेळी केली. या ई’शानदार’कामगिरीनंतरही त्याला पाकिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी टीममधून डच्चू मिळू शकतो.

केएलचा नेट्समध्ये सराव

आशिया कपमधील आपल्या पहिल्या सामन्यात खेळण्यासाठी केएल राहुल सज्ज झाला आहे. त्याआधी केएलने नेट्समध्ये जोरदार तयारी केली. बीसीसीआयने केएलचे सरावाचे फोटो ट्विट केले आहेत. केएल ओपनिंगलाही खेळू शकतो. तसेच पाचव्या स्थानीही बॅटिंग करु शकतो. त्यामुळे केएलला संधी मिळणार असल्याचं निश्चितच आहे.

केएल पाकिस्तान विरुद्ध सामन्यासाठी सज्ज

आशिया कपसाठी टीम इंडिया | रोहित शर्मा (कॅप्टन), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, तिलक वर्मा, केएल राहुल, ईशान किशन, हार्दिक पंड्या, रविंद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, अक्षर पटेल, कुलदीप यादव जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि संजू सॅमसन (राखीव विकेटकीपर).

माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली
माणिकराव कोकाटे यांना मोठा दिलासा, जामीन मिळल्याने अटक टळली.
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं
ठाकरे सेनेच्या शिवतीर्थवर येण्याचं कारण मनसे नेत्यानं स्पष्टच सांगितलं.
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा
कोकाटेंनंतर आणखी एका मंत्र्याचा राजीनामा होणार, उद्धव ठाकरेंचा दावा.
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज
म्हणून सरकारी वकील उज्वल निकम यांना बदला, आरोपी घुलेचा कोर्टाकडे अर्ज.
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?
कोकाटे शिक्षेच्या स्थगितीसाठी कोर्टात, आतापर्यतच्या सुनावणीत काय घडलं?.
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद
मीरा भाईंदरमध्ये 6 तासांचा थरार, लोकवस्तीत शिरलेला बिबट्या अखेर जेरबंद.
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?
कोकाटे यांना अटक वॉरंट जारी पण अद्याप सरेंडर नाही, कोर्टात घडतंय काय?.
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक
लिओनेल मेस्सीची 'वनतारा'ला विशेष भेट अन् वन्यजीव संवर्धनाचं केलं कौतुक.
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा
ठाकरे बंधूंचं अस्तित्व 16 तारखेला संपलेलं असेल... भाजप नेत्याचा निशाणा.
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच
'या' 3 जागांची मनसेकडून मागणी, युतीच्या चर्चेदरम्यान जागावाटपावरून पेच.