AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup PAK vs NEP : नेपाळचा ‘हा’ मॅचविनर चालला तर पाकिस्तानचा पराभव फिक्स, कोण आहे?

Asia Cup 2023 PAK vs NEP : आशिया कपमधील पहिला सामन आज होणार आहे. यजमान पाकिस्तान आणि नेपाळमध्ये सामना रंगणार असून पाकिस्तानचं पारडं जड असलं तरी नेपाळकडे एक मॅचविनर खेळाडू आहे. जर तो चालला तर पाकिस्तानचं अवघड होऊ शकतं.

Asia Cup PAK vs NEP : नेपाळचा 'हा' मॅचविनर चालला तर पाकिस्तानचा पराभव फिक्स, कोण आहे?
| Updated on: Aug 30, 2023 | 8:44 AM
Share

मुंबई : अखेर काही तासांनी आशिया कप 2023च्या थराराला सुरूवात होणार आहे. या स्पर्धेतील पहिला सामना नेपाळ आणि पाकिस्तान यांच्यात असून आज दुपारी तीन वाजता सामना सुरू होईल. नेपाळ हा लिंबूटिंबू संघ असून भारत आणि पाकिस्तानसारख्या तगड्या गटात आहे. पाकिस्तान संघ कागदावर वाघ असला तरीसुद्धा त्यांनी जर नेपाळ संघाला कमी समजलं तर त्यांची ही चूक ठरू शकते. नेपाळ संघात एक असा खेळाडू आहे जर तो चालला तर एकटा पाकिस्तान संघाला धूळ चारू शकतो.

नेमका कोण आहे तो खेळाडू?

क्रिकेट अनिश्चिततेचा खेळ आहे, कधी कोणता संघ बाजी मारेल काही सांगता येत नाही. मागे युएई संघाने न्यूझीलंडसारख्या संघाला पराभूत केलं होतं. याच युएई संघाला नेपाळने हरवलं होतं. नेपाळने आशिया कपमध्ये स्थान मिळवण्यासाठी चांगल्या-चांगल्या संघाना पराभवाचं पाणी पाजलंय.  पात्रता फेरीमध्ये युएईला 7 गडी राखून पराभूत केलं होतं.

नेपाळमध्ये असा कोणता खेळाडू आहे जो एकट्याच्या जोरावर सामना जिंकून देण्याची क्षमता आहे. हा खेळाडू दुसरा तिसर कोणी नसूना संदीप लामिछाने आहे. वयाच्या 23 व्या वर्षी या खेळाडूने जागतिक क्रिकेटमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. कमी वयात त्याने नेपाळसाठी दर्जेदार कामगिरी केली आहे.

संदीप लामिछाने याने तीनवेळा पाच विकेट घेण्याचा पराक्रम केला आहे. अकरा धावांमध्ये त्याने सहा विकेट घेतल्या होत्या. ही त्याची वनडे सर्वोत्तम कामगिरी असून नेपाळचा तो 100 विकेट घेणारा एकमेव गोलंदाज आहे.

दरम्यान,  आशिया चषक 2023 यावेळी एकदिवसीय फॉर्मेटमध्ये आयोजित केला जात आहे. अशा परिस्थितीत लामिछानेच्या एकदिवसीय कारकिर्दीबद्दल बोलायचे तर, तो नेपाळसाठी येथे एकूण 49 सामने खेळला आहे. दरम्यान, त्याने 48 डावात 17.26 च्या सरासरीने 111 विकेट्स घेतल्या आहेत.

आशिया कपसाठी नेपाळ टीम | रोहित पौडेल (कॅप्टन), आसिफ शेख, कुशल भुर्टेल, ललित राजबंशी, भीम सार्की, कुशल मल्ला, दीपेंद्र सिंह ऐरी, संदीप लामिछाने, करण केसी, गुलशन झा, सोमपाल कामी, आरिफ शेख, प्रतीस जीसी, किशोर महतो, संदीप जोरा, अर्जुन सऊद आणि श्याम ढकाल.

चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला...
चुनाभट्टीजवळ आंबेडकर अनुयायी अन् पोलिसांमध्ये वाद, थेट रस्ताच रोखला....
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर
इंडिगोची आजही 500 विमानं रद्द, प्रवाशांचा आक्रोश, कुठं काऊंटवर चढलं तर.
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती
तपोवनातील प्रस्तावित प्रदर्शन केंद्राच्या निविदा प्रक्रियेला स्थगिती.
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ
शिंदेंमुळे 2022ला भाजप सत्तेत, शिवसेनेच्या मंत्र्याच्या दाव्यानं खळबळ.
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?
भाजप पदाधिकाऱ्यांनी मनसे पदाधिकाऱ्याला जबर धुतलं; उरणमध्ये घडलं काय?.
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट...
वलसाडच्या ‘हापूस’ नामांकनाला कोकणचा कडाडून विरोध थेट....
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला
BMC इज नॉट फॅमिली बिझनेस... भाजप नेत्याचा उद्धव ठाकरे यांना खोचक टोला.
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको
चुनाभट्टी येथे चैत्यभूमीकडे जाणाऱ्या आंबेडकर अनुयायांचा रास्ता रोको.
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा
तिन्ही पक्षाचा मालिक एक, अ‍ॅनाकोंडा गिळल्याशिवाय... ठाकरेंचा निशाणा.
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी
अमित ठाकरे यांच्या मेहुण्याच्या दिल्लीत विवाह, मोदींची सोहळ्याला हजेरी.