BAN vs SL Toss : बांगलादेश विरुद्ध टॉस जिंकला, श्रीलंकेची बॉलिंग, मॅचविनर ऑलराउंडरचं कमबॅक, प्लेइंग ईलेव्हनमध्ये कोण?
Bangladesh vs Sri Lanka Toss and Playing 11 Asia Cup 2025 : आशिया कप 2025 स्पर्धेतून श्रीलंकेच्या स्टार खेळाडूचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे श्रीलंकेला मोठा दिलासा मिळाला आहे. जाणून घ्या.

टी 20 आशिया कप 2025 स्पर्धेतील पाचव्या सामन्यात आज 13 सप्टेंबर रोजी बांगलादेश विरुद्ध श्रीलंका हे बी ग्रुपमधील 2 संघ आमनेसामने आहेत. श्रीलंकेचा हा या मोहिमेतील पहिला तर बांगलादेशचा हा दुसरा सामना आहे. हा सामना अबुधाबातील शेख झायेद स्टेडियममध्ये आयोजित करण्यात आला आहे. चरिथ असलंका याच्याकडे श्रीलंकेच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे. तर लिटन दास बांगलादेशचा कॅप्टन आहे. सामन्याला रात्री 8 वाजता सुरुवात होणार आहे. त्याआधी 7 वाजून 30 मिनिटांनी टॉस झाला. श्रीलंकेच्या बाजूने नाणेफेकीचा कौल लागला. चरिथने बॉलिंग करण्याचा निर्णय घेतला आहे.
बांगलादेश या सामन्यासाठी प्लेइंग ईलेव्हनमध्ये एकमेव बदल केला आहे. तर श्रीलंका संघात स्टार ऑलराउंडरचं कमबॅक झालं आहे. त्यामुळे श्रीलंकेची ताकद वाढली आहे. बांगलादेश संघात तास्किन अहमद याच्या जागी शोरिफूल इस्लाम याचा समावेश करण्यात आल्याची माहिती कर्णधार लिटनने दिली. तर श्रीलंकेचा मॅचविनर बॉलिंग ऑलराउंडर वानिंदू हसरंगा याचं दुखापतीनंतर अनेक महिन्यांनी टी 20i संघात कमबॅक झालं आहे.
वानिंदूचं 8 महिन्यांनंतर कमबॅक
वानिंदूला हॅमस्ट्रिंगमुळे झिंबाब्वे विरूद्धच्या टी 20i मालिकेला मुकावं लागलं होतं. मात्र त्यानंतरही त्याची आशिया कप स्पर्धेसाठी निवड करण्यात आली. वानिंदू या स्पर्धेआधी दुखापतीतून पूर्णपणे फिट होईल, असा विश्वास निवड समितीला होता. वानिंदूने निवड समितीचा विश्वास सार्थ ठरवला. वानिंदुच्या कमबॅकमुळे श्रीलंकेची ताकद आणखी वाढली. वानिंदूचं टी 20i संघात तब्बल 8 महिन्यांनी कमबॅक झालं आहे. वानिंदूनने अखेरचा टी 20i सामना न्यूझीलंड विरुद्ध 2 जानेवारीला खेळला होता. त्यामुळे वानिंदू हसरंगा याच्याकडून या सामन्यात चमकदार कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे.
श्रीलंका बांगलादेशला रोखणार?
दरम्यान बांगलादेशने या स्पर्धेत विजयाने सुरुवात केली आहे. त्यामुळे बांगलादेशला श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवून सुपर 4 मध्ये सुरक्षित पोहचण्याची संधी आहे. तर श्रीलंकेला जिंकायचं असेल तर बांगलादेशला पराभूत करावं लागणार आहे. त्यामुळे या दोन्ही संघांमध्ये चढाओढ पाहायला मिळण्याची शक्यता आहे.
श्रीलंका प्लेइंग ईलेव्हन : पथम निसांका, कुसल मेंडिस (विकेटकीपर), कामिल मिशारा, कुसल परेरा, चरिथ असलांका (कर्णधार), कामिंदु मेंडिस, दासुन शनाका, वानिंदु हसरंगा, दुश्मंथा चमीरा, मथीशा पाथिराना आणि नुवान तुषारा.
बांगलादेश प्लेइंग ईलेव्हन : परवेझ हुसेन इमोन, तांझिद हसन तमिम, लिट्टन दास (कॅप्टन आणि विकेटकीपर), तॉहिद हृदॉय, झाकेर अली, शमीम हुसेन, महेदी हसन, रिशाद हुसेन, तांझिम हसन साकीब, शोरिफूल इस्लाम आणि मुस्तफिजूर रहमान.
