AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आशिया कप स्पर्धेवर क्रिकेटप्रेमींच्या मनात राग? भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट फुकटात वाटली

आशिया कप स्पर्धेला सुरुवात झाली असून प्रत्येक सामन्यानंतर ही स्पर्धा पुढे चालली आहे. असं असताना दुसरीकडे वेगळंच चित्र आहे. दुबईतील स्टेडियमकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवल्याचं दिसलं. भारत युएई सामन्यातही स्टेडियम रिकामी होतं. नेमकं असं का ते जाणून घ्या.

आशिया कप स्पर्धेवर क्रिकेटप्रेमींच्या मनात राग? भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट फुकटात वाटली
आशिया कप स्पर्धेवर क्रिकेटप्रेमींच्या मनात राग? भारत पाकिस्तान सामन्याची तिकीट फुकटात वाटलीImage Credit source: Francois Nel/Getty Images
| Updated on: Sep 11, 2025 | 7:36 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धा सुरळीतपणे सुरु आहे. पहिल्या दोन सामन्यांचा खेळ संपला. पण चाहत्यांचा उत्साह काही दिसला नाही. पहिल्या दोन सामन्यात मैदान रिकामी दिसली. भारतासारखा दिग्गज संघ मैदानात असताना क्रिकेटप्रेमींनी पाठ फिरवल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. भारताचा माजी क्रिकेटपटू आणि समालोचक आकाश चोप्रा यानेही याबाबत आश्चर्य व्यक्त केलं. तसेच युट्यूब चॅनेलवर या संदर्भाचा पोस्टमार्टम केलं. आकाश चोप्रा म्हणाला की, ‘दुबईमध्ये भारत आणि युएई यांच्यात सामना खेळला गेला. पण आशिया कपच्या पहिल्या सामन्यात गर्दी कुठे आहे? असा प्रश्न आहे. सहसा असं म्हंटलं जातं की भारत चंद्रावरही क्रिकेट खेळला तरी लोक निळी जर्सी घालून तिथे पोहोचतील. पण या सामन्यातील दृश्य पूर्णपणे वेगळं होतं. मैदान जवळजवळ रिकामे होते आणि इतक्या दिवसांनी भारतीय संघ दुबईमध्ये खेळत होता आणि तरीही चाहते स्टेडियममध्ये उपस्थित नव्हते हे पाहून आश्चर्य वाटले. कोणत्याही क्रिकेटप्रेमीसाठी हे एक विचित्र दृश्य होते.’

आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, ‘यामागील एक प्रमुख कारण म्हणजे स्पर्धेचा प्रचाराचा अभाव मानता येईल. दुबईमध्ये क्रिकेटचा अतिरेक झाला असण्याची शक्यता आहे. येथे ILT20 आणि इतर अनेक स्पर्धा देखील खेळल्या गेल्या आहेत. तिकिटांच्या किमती जास्त असण्याची शक्यता आहे किंवा स्थानिक पातळीवर प्रचाराचा अभाव असण्याची शक्यता आहे. आगामी भारत-पाकिस्तान सामन्यासाठी लोक नक्कीच जमतील, परंतु इतर सामन्यांसाठी चाहत्यांना आकर्षित करण्यासाठी रणनीती आखावी लागेल. अन्यथा गर्दी कुठे आहे हा प्रश्न नेहमीच राहील.’ दुसरीकडे, सामन्यादरम्यान स्टँड रिकामे असण्याचे कारण सोशल मीडियावर सुरू असलेली ‘बहिष्कार आशिया कप’ मोहीम असल्याचे मानले जात आहे.

भारत पाकिस्तान सामन्याची तिकीटे फुकट वाटली

दुबईतील एका व्यावसायिकाने आशिया कप स्पर्धेसाठी 700 तिकिटं विकत घेतली आहे. अर्थात पॅकेज पॅटर्न असल्याने सात सामन्यांची तिकीटे आहेत. ही तिकीटे त्यांनी कर्मचाऱ्यांना फुकट दिली. डॅन्यूब ग्रुपचे उपाध्यक्ष अनीस साजन यांनी सांगितलं की, ब्लू-कॉलर कर्मचाऱ्यांमध्ये ही तिकिटे वाटली जात आहेत. त्यामुळे या कर्माचाऱ्यांना थेट मैदानात सामन्यांचा अनुभव घेता येणार आहे. पॅकेजमधील 100 तिकिटे ही भारत पाकिस्तान सामन्यांची आहेत.

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.