AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asia Cup Super 4 : भारताने पाकिस्तानला दिल्या फुकटच्या 75 धावा, क्रीडाप्रेमींचा संताप

पाकिस्तानविरुद्धच्या या हायव्होल्टेज सामन्यात भारताकडून गचाळ क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. त्यामुळे भारतीय संघाला धावांचा मोठा भुर्दंड भरावा लागला. या सामन्यात एक नाही तर तीन झेल सोडले.

Asia Cup Super 4 : भारताने पाकिस्तानला दिल्या फुकटच्या 75 धावा, क्रीडाप्रेमींचा संताप
Asia Cup Super 4 : भारताने पाकिस्तानला दिल्या फुटकच्या 75 धावा, क्रीडाप्रेमींचा संतापImage Credit source: Twitter
| Updated on: Sep 21, 2025 | 9:36 PM
Share

आशिया कप 2025 स्पर्धेच्या सुपर 4 फेरीत पाकिस्तानचा संघ त्यांच्या डावात टीम इंडियावर भारी पडल्याचं दिसून आलं. पण आपल्याच चुकांमुळे पाकिस्तान संघाला ही संधी मिळाली. नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर भारताने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पाकिस्तानला कमी धावांवर रोखण्याचं आव्हान होतं. पण भारतीय खेळाडूंनी ही संधी गमावली. भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात गचाळ क्षेत्ररक्षणाचं दर्शन घडवलं. यामुळे भारतीय संघाला मोठा फटका बसला. अभिषेक शर्मा आणि कुलदीप यादव या दोघांमुळे भारतीय संघाला 75 धावांचा मोठा फटका बसला. त्यांनी केलेल्या चुकांमुळे पाकिस्तानला पॉवरप्लेमध्ये धावगती वाढवण्यात मदत झाली. इतकंच काय तर पॉवर प्लेनंतरही निर्भयपणे खेळले. जसप्रीत बुमराहला देखील पाकिस्तान खेळाडू बिनधास्त खेळले.

सुरुवात अभिषेक शर्माने केली. हार्दिक पांड्याने पहिल्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर विकेट काढली होती. पण अभिषेक शर्माने सोपा झेल सोडला. त्यामुळे शून्यावर असलेल्या साहिबजादा फरहान मोठी संधी मिळाली. त्याचा एक नाही तर दोन झेल सोडले. अभिषेक शर्माला बाउंड्री लाईनवर पुन्हा एक झेल पकडण्याची संधी होती. पण ही देखील त्याच्या हातून गेली. इतकंच काय तर या चेंडूवर षटकार आला. त्यामुळे क्रीडाप्रेमी चांगलेच नाराज झाले होते. साहिजाबादच्या खेळीमुळे भारताला 58 धावांचं नुकसान झालं. कारण तो 45 चेंडूत 5 चौकार आणि 3 षटकार मारून 58 धावा करून बाद झाला.

तर सैम आयुब सलग तीन सामन्यात शून्यावर बाद झाल्यानंतर या सामन्यात खातं खोलण्यात यशस्वी ठरला. जसप्रीत बुमराहला चौकार मारत त्याने खातं खोललं. वरुण चक्रवर्तीच्या गोलंदाजीवर विकेट गेलीच होती. त्याचा खेळ फक्त 4 धावांवर संपला असता. पण पुन्हा एकदा गचाळ क्षेत्ररक्षण आणि कुलदीप यादवने हातातला झेल सोडला. त्यामुळे भारतीय संघाला 17 धावांचा फटका बसला. सैम आयुब 17 चेंडूत एक चौकार आणि एक षटकार मारून 21 धावांवर बाद झाला. शिवम दुबेच्या गोलंदाजीवर अभिषेक शर्माने त्याचा झेल पकडला.

मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली
शरद पवारांना भारतरत्न देण्याची मागणी, सदावर्ते, पडळकरांनी उडवली खिल्ली.
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात
42 हजार मिळतात म्हणून पीएचडी? दादांच PhD शिष्यवृत्तीवरचं वक्तव्य वादात.
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?
पार्थ पवार घोटाळा प्रकरणी अधिकाऱ्यांवर ठपका, त्यांनी का रोखलं नाही?.
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका
पार्थ पवार काही छोटं बाळ... जमीन गैरव्यवहार प्रकरणी दमानियांची टीका.
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?
परबांचं विधानसभेत पेनड्राईव्ह बॉम्ब, 'त्या' अधिकाऱ्यांवर कारवाई होणार?.
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र
रस्त्यावरच्या मुलांची DNA टेस्ट करा, राज ठाकरेंचं थेट फडणवीसांना पत्र.
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा
आवास योजनेतल्या इमारतींना अधिकाऱ्यांची नाव, संभाजीनगर महापालिकेचा फतवा.
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला
तरुणांचं हिंसक आंदोलन, अधिवेशनावर जाणारा लोटांगण मोर्चा पोलिसानी रोखला.