AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

PAK vs BAN : पाकिस्तान-बांगलादेश सामना रद्द झाल्यास फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध कोण? जाणून घ्या

PAK vs BAN Asia Cup 2025: टीम इंडियानंतर आता आशिया कप 2025 अंतिम फेरीतील दुसरा संघ निश्चित होणार आहे. अंतिम फेरीत पोहचण्यासाठी पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश आमनेसामने आहेत. हा सामना कोणत्याही कारणामुळे रद्द झाल्यास दोघांपैकी कोणत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल? जाणू घ्या.

PAK vs BAN : पाकिस्तान-बांगलादेश सामना रद्द झाल्यास फायनलमध्ये टीम इंडिया विरुद्ध कोण? जाणून घ्या
PAK vs BAN Asia Cup 2025Image Credit source: PTI
| Updated on: Sep 25, 2025 | 5:46 PM
Share

टीम इंडियाने बुधवारी 24 सप्टेंबरला सुपर 4 फेरीत बांगलादेशला पराभूत करत आशिया कप 2025 स्पर्धेतील एकूण आणि सलग पाचवा विजय मिळवला. भारतीय संघाने या विजयासह अंतिम फेरीत प्रवेश मिळवला आहे. आता टीम इंडिया विरुद्ध अंतिम फेरीत कोणता संघ भिडणार? हे गुरुवारी 25 सप्टेंबरला निश्चित होणार आहे. या सामन्यात पाकिस्तान विरुद्ध बांगलादेश दोन्ही संघ आमनेसामने असणार आहेत. दोन्ही संघांचा हा सुपर 4 फेरीतील तिसरा आणि अंतिम सामना असणार आहे. दोन्ही संघांनी सुपर 4 फेरीतील 2 पैकी 1 सामना जिंकला आहे. तर 1 सामन्यात पराभूत व्हावं लागलंय. त्यामुळे हा सामना जिंकणारा संघ थेट अंतिम फेरीत पोहचणार आहे. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना सेमी फायनलप्रमाणेच आहे. त्यामुळे येत्या काही तासांत अंतिम फेरीतील दुसरा संघ निश्चित होणार आहे.

पाकिस्तान विरुद्ध श्रीलंका यांच्यातील सामन्याचं आयोजन हे दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये होणार आहे. मात्र हा सामना पावसामुळे किंवा अन्य कारणामुळे रद्द झाला तर कोणत्या संघाला अंतिम फेरीचं तिकीट मिळेल? हे जाणून घेऊयात.

तर नेट रनरेट ठरणार निर्णायक

पाकिस्तान-बांगलादेश सामन्यासाठी राखीव दिवसाची (Reserve Day) तरतूद करण्यात आलेली नाही. त्यामुळे उभयसंघातील सामना रद्द झाल्यास दोन्ही संघांना समसमान 1-1 गुण देण्यात येईल. तसेच या दोन्ही संघांनी प्रत्येकी 1-1 सामना जिंकला असल्याने त्यांच्या खात्यात 2-2 गुण आहेत. तसेच सामना रद्द झाल्यानंतर बांगलादेश आणि पाकिस्तान दोन्ही संघांचे प्रत्येकी 3-3 पॉइंट्स होतील. समसमान पॉइंट्स असल्याने दोघांपैकी अंतिम फेरीत पोहचणाऱ्या संघाचा निकाल हा नेट रनरेटच्या आधार घेतला जाईल.

टीम इंडिया सुपर 4 फेरीतील पॉइंट्स टेबलमध्ये पहिल्या स्थानी विराजमान आहे. श्रीलंका सर्वात शेवटी अर्थात चौथ्या स्थानी आहे. पाकिस्तान दुसऱ्या आणि बांगलादेश तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे पाऊस किंवा इतर कारणामुळे सामना रद्द झाल्यास पाकिस्तान नेट रनरेच्या आधारावर अंतिम फेरीत पोहचणार हे निश्चित आहे. त्यामुळे क्रिकेट चाहत्यांना साखळी, सुपर 4 नंतर अंतिम फेरीत 2 कट्टर प्रतिस्पर्धी संघात पुन्हा महामुकाबला पाहायला मिळेल.

पाकिस्तान आणि बांगलादेशचा नेट रनरेट

ताज्या आकडेवारीनुसार, पाकिस्तानचा नेट रनरेट हा बांगलादेशच्या तुलनेत कित्येक पटीने चांगला आहे. पाकिस्तानचा नेट रनरेट +0.226 असा आहे. तर बांगलादेशचा नेट रनरेट -0.969 असा आहे. त्यामुळे सामना रद्द झाल्यास बांगलादेशचं स्पर्धेतून पॅकअप होईल. तर पाकिस्तान अंतिम फेरीसाठी पात्र ठरेल.

पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत
पुतीन यांना दिल्लीत 'गार्ड ऑफ ऑनर', राष्ट्रपती भवनात मोदींकडून स्वागत.
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप
निवडणूक आयोग झोकांड्या खातोय की..., उत्तम जानकर यांचा गंभीर आरोप.
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं...
'स्थानिक' निवडणुकांच्या निकालावरही सुप्रीम कोर्टानं स्पष्टच म्हटलं....
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप
राणीच्या बागेत शक्ती वाघाआधीच रुद्रचा मृत्यू; माहिती लपवल्याचा आरोप.
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा
...तर आत्मदहन करणार अन् देवाभाऊ जबाबदार तुम्हीच असाल, मुंडेंचा इशारा.
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी
हिवाळी अधिवेशनात 33 हून अधिक मोर्चे विधानभवनावर धडकणार, पहिल्याच दिवशी.
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले...
इंडिगो विमानसेवेचा अमोल कोल्हे यांना फटका, संताप व्यक्त करत म्हणाले....
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?
राज्य निवडणूक आयोगाला कोर्टानं झापलं, निवडणुका पुढं ढकलणं पडल महागात?.
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप
महाराष्ट्रात शिक्षकांच राज्यव्यापी आंदोलन, या मागण्यांसाठी पुकारला संप.
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन
ऐतिहासिक सारंगखेडा यात्रेला सुरूवात, कोट्यवधीच्या घोड्यांची विक्री अन.