AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Asian Games 2023 साठी टीम इंडिया सज्ज, कधी आणि कुठे पाहता येणार सामने?

Asian Games 2023 Cricket Schedule | एशियन गेम्स स्पर्धेत क्रिकेटचाही समावेश करण्यात आलेला आहे. त्यासाठी टीम इंडिया, पाकिस्तान आणि श्रीलंका टीमची घोषणा करण्यात आलेली आहे. हे सामने टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

Asian Games 2023 साठी टीम इंडिया सज्ज, कधी आणि कुठे पाहता येणार सामने?
| Updated on: Sep 18, 2023 | 7:01 PM
Share

मुंबई | क्रिकेट चाहत्यांना एशियन गेम्स 2023 स्पर्धेचे वेध लागले आहेत. या स्पर्धेत तिसऱ्यांदा क्रिकेटचा समावेश करण्यात आला आहे. टीम इंडिया मेन्स आणि वूमन्स टीम या स्पर्धेत सहभागी होणार आहेत. बीसीसीआयने जुलै महिन्यातच एशियन गेम्ससाठी महिला आणि पुरुष क्रिकेट संघाची घोषणा केली. एशियन गेम्समध्ये टी 20 सामने पार पडणार आहेत. पुण्याचा ऋतुराज गायकवाड याच्याकडे टीम इंडियाची धुरा देण्यात आली आहे. तर हरमनप्रीत कौर वूमन्स टीम इंडियाची कॅप्टन आहे. या स्पर्धेत क्रिकेट सामन्यांना केव्हा सुरु होणार, सामने कुठे पाहता येणार हे जाणून घेउयात.

क्रिकेट सामने केव्हा?

एशियन गेम्स स्पर्धेत मेन्स क्रिकेट सामन्यांचं आयोजन हे 28 सप्टेंबर ते 8 ऑक्टोबर दरम्यान करण्यात आलंय. तर 19 सप्टेंबर ते 28 सप्टेंबर दरम्यान वूमन्स क्रिकेट सामने पार पडतील. मेन्स क्रिकेट स्पर्धेत साखळी फेरीसाठी एकूण सर्व संघांना 4 ग्रुपमध्ये विभागण्यात आलंय. त्यानुसार प्रत्येक ग्रुपमध्ये 2-3 टीम आहेत. अफगाणिस्तान आणि मंगोलिया ए ग्रुपमध्ये आहेत. कंबोडिया, जपान आणि नेपाळ टीम बी ग्रुपमध्ये आहेत.

सी ग्रुपमध्ये हाँगकाँग, सिंगापूर आणि थायलंड टीमचा समावेश आहे. तर डी ग्रुपमध्ये मलेशिया, बहरीन आणि मालदीव संघ आहेत. तर टीम इंडिया, पाकिस्तान, श्रीलंका आणि बांगलादेश या चार संघांनी थेट क्वार्टर फायनलमध्ये स्थान मिळवलंय.

क्रिकेट मॅच टीव्ही आणि मोबाईलवर कुठे पाहता येणार?

एशियन गेम्स स्पर्धेतील क्रिकेट सामन हे भारतात टीव्हीवर सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येतील. तसेच मोबाईलवर पाहण्यासाठी सोनी लिव एपचं सबस्क्रीपशन घ्यावं लागले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी बीसीसीआयने एशियन गेम्ससाठी मेन्स आणि वूमन्स टीममध्ये काही बदल केलेत. पूजा वस्त्राकर हीचा राखीव संघातून मुख्य संघात समावेश केलाय. तर मेन्स टीममधील दुखापतग्रस्त शुभम मावी याच्या जागी आकाश दीप याला संधी दिली आहे.

एशियन गेम्स 2023 साठी मेन्स टीम इंडिया | ऋतुराज गायकवाड (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, राहुल त्रिपाठी, तिलक वर्मा, रिंकू सिंग, जितेश शर्मा (विकेटकीपर), वॉशिंग्टन सुंदर, शाहबाज अहमद, रवी बिश्नोई, आवेश खान, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार, आकाश दीप, शिवम दुबे आणि प्रभसिमरन सिंग (विकेटकीपर)

राखीव खेळाडू | यश ठाकूर, साई किशोर, व्यंकटेश अय्यर, दीपक हुडा आणि साई सुदर्शन.

एशियन गेम्ससाठी वूमन्स टीम इंडिया | हरमनप्रीत कौर (कॅप्टन), स्मृती मानधना, शफाली वर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, दीप्ती शर्मा, ऋचा घोष (विकेटकीपर), अमनजोत कौर, देविका वैद्य, तितस साधू, राजेश्वरी गायकवाड, मिन्नू मणी, कनिका आहुजा, उमा चेत्री (विकेटकीपर), अनुषा बरेड्डी आणि पूजा वस्त्राकर.

राखीव खेळाडू | हरलीन देओल, काशवी गौतम, स्नेह राणा, सायका इशाक.

Follow Us
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान
जय पवार यांची प्रतिक्रिया:निर्णय बारामतीकरांचा, विरोधकांना खुलं आव्हान.
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!
बारामती पोटनिवडणुकीत ठाकरेंचा पाठिंबा कोणाला? मोठी माहिती समोर!.
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप
दमानिया यांच्या खुलाशांवरून जयश्री खाडिलकर यांनी व्यक्त केला संताप.
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?
बारामती पोटनिवडणुकीवरून मुख्यमंत्री फडणवीस यांचं आवाहन काय?.
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या....
दमानियांकडे कॉल्स डिटेल्स आल्या कुठून? राऊतांनी या मंत्र्याच्या.....
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?
ठाकरेंची सेना बारामतीत उमेदवार देणार की नाही?.
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू
शरद पवारांच्या भेटीला जयंत पाटील, सिल्व्हर ओकवर खलबतं सुरू.
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग
सुनेत्रा पवारांनी केला उद्धव ठाकरेंना फोन, राजकीय हालचालींना वेग.
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू
नाशिकच्या दिंडोरीत भीषण अपघात; विहिरीत कार कोसळून 9 जणांचा मृत्यू.
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण
सिलेंडरसाठी संघर्ष सुरूच; नागपूर, अमरावती, मुंबईत नागरिक हैराण.